हार्वेस्टर मालकांकडून ऊस उत्पादकांची लूट; 'स्वाभिमानी'ची तक्रार

हार्वेस्टर मालकांकडून ऊस उत्पादकांची लूट; 'स्वाभिमानी'ची तक्रार
हार्वेस्टर मालकांकडून ऊस उत्पादकांची लूट; 'स्वाभिमानी'ची तक्रार

सोलापूर ः ऊसतोडणीसाठी शेतकरी हार्वेस्टर मशिनला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. परंतु या महिन्याच्या सुरुवातीपासून हार्वेस्टर मशिनचालकसुद्धा एकरी पाच ते दहा हजार रुपये तोडणीसाठी शेतकऱ्यांकडे मागणी करत आहेत. त्यामुळे दुष्काळ, अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांना आता या नवीन संकटाला तोंड द्यावे लागत आहे.  यंदाच्या गळीत हंगामातील ऊसतोड सध्या चालू आहे. या वर्षी ऊस क्षेत्र कमी प्रमाणात असल्यामुळे कारखान्यांनी वाहन करार कमी केले आहेत. ऊसतोडणीसाठी बहुतांश साखर कारखान्यांनी हार्वेस्टर मशिन घेतलेली आहे. यंदा दुष्काळ व उशिरा पाऊस आल्याने उसाच्या एकरी उताऱ्यात मोठी घट झाली आहे. त्यामुळे हंगाम लवकर संपणार आहे. परंतु, हार्वेस्टर मशिनचालकसुद्धा एकरी पाच ते दहा हजार रुपये तोडणीसाठी शेतकऱ्यांकडे मागणी करत आहेत.  हार्वेस्टर मशिनचालक व मालकांकडून ऊस उत्पादकांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. प्रादेशिक सहसंचालकांनी संबंधित कारखान्याच्या व्यवस्थापनाला पत्राद्वारे आदेश काढून शेतकऱ्यांची पिळवणूक थांबण्याबाबत उपाययोजना करावी; अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. या मागणीचे निवेदन सोलापूरच्या साखर सहसंचालक कार्यालयात देण्यात आले.  या वेळी जिल्हाध्यक्ष महमूद पटेल, युवाध्यक्ष विजय रणदिवे, इक्‍बाल मुजावर, उमाशंकर पाटील, पोपट साठे व शेतकरी उपस्थित होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com