agriculture news in Marathi, Sugarcane fertilizer management by Praksh Jadhav, Aurwad, Dist.Kolhapur | Agrowon

जमीन सुपीकतेतूून ऊस उत्पादनात वाढ

राजकुमार चौगुले
रविवार, 30 जून 2019

औरवाड (जि. कोल्हापूर) येथील प्रकाश जाधव हे प्रयोगशील ऊस उत्पादक आहेत. त्यांची सात एकर शेती आहे. साधारणपणे तीन एकर आडसाली लागवड आणि तीन एकर खोडवा पीक असते. शेणखत आणि संतुलित खतमात्रेच्या वापरातून जमीन सुपीकता जपत त्यांनी एकरी ८० टनांची सरासरी गाठली आहे. 

औरवाड (जि. कोल्हापूर) येथील प्रकाश जाधव हे प्रयोगशील ऊस उत्पादक आहेत. त्यांची सात एकर शेती आहे. साधारणपणे तीन एकर आडसाली लागवड आणि तीन एकर खोडवा पीक असते. शेणखत आणि संतुलित खतमात्रेच्या वापरातून जमीन सुपीकता जपत त्यांनी एकरी ८० टनांची सरासरी गाठली आहे. 

उसाच्या खत व्यवस्थापनाबाबत प्रकाश जाधव म्हणाले की, मी संतुलित खतमात्रेवर भर देतो. लागवडीसाठी जमीन तयार करताना शेणखत, गांडूळ खताचा वापर करतो. दर तीन वर्षांनी एकरी दहा ट्राली शेणखत जमिनीत मिसळतो. पाच फुटी सरी करून एक डोळ्याची दोन फुटांवर लागवड केली जाते. ऊस लागवडीअगोदर बेसल डोस देतो. यामध्ये एकरी सिंगल सुपर फॉस्फेट दीडशे किलो, सिलीकॉन, पोटॅश, एमओपी प्रत्येकी ५० किलो देतो. उसाला ठिबक सिंचन केले आहे. उसाची चांगली उगवण झाल्यानंतर एकरी १०० किलो १२:३२:१६ किंवा १०.२६.२६  ही खतमात्रा दिली जाते. ऊस एक ते दीड महिन्याचा झाल्यावर सूक्ष्म अन्नद्रव्यांची मात्रा शिफारशीनुसारच दिली जाते. बाळभरणी करताना एकरी १०० किलो १२:३२:१६ किंवा १०:२६:२६ तसेच ५० किलो युरिया, ५० किलो सिलिकॉन ही खतमात्रा दिली जाते. पक्क्‍या भरणीला एकरी १०० किलो डी.ए.पी. १०० किलो १२:३२:१६ आणि ५० किलो सिलिकॉन ही खतमात्रा दिली जाते. याचबरोबरीने निंबोळी पेंडदेखील दिली जाते. पीकवाढीच्या टप्प्यात ठिबक सिंचनातून विद्राव्य खताची मात्रा दिली जाते. तसेच गरज असेल तर सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी केली जाते. लागवडीचे एकरी ८० टन आणि खोडव्याचे ५५ ते ६० टनांपर्यंत उत्पादन मिळते.  

 संपर्क ः प्रकाश जाधव.९८२२४२०७७७

टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
भांडवली शेतीचा विळखा बघता बघता हरितक्रांतीला पन्नास वर्षे झाली. तसे,...
पशुखाद्य : नियोजन अन् नियंत्रणमहाराष्ट्रात २०१२ च्या दुष्काळापासून दुग्ध...
मराठवाड्यात साडेदहा हजार एकरांवर तुतीऔरंगाबाद : मराठवाड्यात यंदा ३० नोव्हेंबर...
विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सहा दिवस...मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या...
विठ्ठल मंदिरात मोबाईल बंदीपंढरपूर, जि. सोलापूर ः श्री विठ्ठल मंदिराच्या...
धानासाठी क्विंटलला पाचशे रुपये अनुदानमुंबई: राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा...
‘पीजीआर’ला मान्यतेचा मार्ग मोकळापुणे ः देशभरात शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या बिगर...
इथेनॉलसाठी मान्यता; पण प्रकल्पांसाठी...पुणे  : थेट साखरेपासून इथेनॉल तयार करण्यास...
उत्कृष्ट व्यवस्थापनातून पपईत मिळवली ओळखनंदुरबार जिल्ह्यात धमडाई येथील सुभाष व प्रनील या...
उद्या तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे ः बंगाल उपसागराच्या आग्नेय भागात कमी दाबाचे...
परिश्रमपूर्वक व्यवस्थापनातून...पुणे जिल्ह्यातील रिहे येथील सुनील शिंदे...
किरकोळ व्यापाऱ्यांकरिता कांदासाठा...मुंबई ः देशात कांद्याचे उत्पादन घटल्याने...
सर्वाधिक दर मोजक्याच कांद्यालानगर ः वाढलेल्या कांदादराचा गेल्या महिनाभरापासून...
पशुखाद्य दर गगणाला भिडलेसांगली ः दुष्काळ व अतिवृष्टीचा फटका पशुखाद्य...
शेवंतीचे तीन वाण लवकरच पुणेः शेतकऱ्यांना शेवंतीच्या पांरपरिक वाणांना...
उत्तर प्रदेशात ‘एसएपी’त बदल नाहीनवी दिल्ली: उत्तर प्रदेश सरकारने सलग दुसऱ्या...
उसाचे ३८ गुंठ्यांत तब्बल १४७ टन उत्पादनकोल्हापूर जिल्ह्यातील कवठेगुलंद (ता. शिरोळ) येथील...
कमी कालावधीचा दोडका देतोय चांगला नफागेल्या दोन, तीन महिन्यांत झालेल्या पावसामुळे पुणे...
तापमानात चढ-उतारपुणे ः अरबी समुद्राच्या आग्नेय भागात असलेले कमी...
जीवघेणा बाजारदेशात बोगस, भेसळयुक्त, अनधिकृत कीडनाशकांचा वापर...