Agriculture news in marathi, Sugarcane FRP should be given within 14 days | Agrowon

`उसाची एफआरपी चौदा दिवसांत द्यावी` : भाजप किसान मोर्चा

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 8 ऑक्टोबर 2021

कोल्हापूर : या वर्षीच्या गळीत हंगामात येणाऱ्या उसाच्या बिलाची एफआरपी १४ दिवसांच्या आत द्यावी, या मागणीचे निवेदन भाजप किसान मोर्चाच्या वतीने प्रादेशिक साखर सहसंचालक एस. एन. जाधव यांना सादर केले. तर एकरकमी एफआरपी देण्याचे जाहीर न करणाऱ्या साखर कारखान्यांना गळीत हंगामास परवानगी देऊ नये, अशी मागणी भाजप किसान मोर्चाच्या वतीने करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे, की साखर नियामक मंडळाने कारखान्यांना ऊस पोहोचल्याच्या १४ दिवसांत सर्व एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर जा करण्याचा आदेश काढला आहे. मात्र असे असतानासुद्धा  राज्य सरकारने २०२१-२२ या गळीत हंगामात येणाऱ्या उसाचे शेतकऱ्यांचे बिल तीन टप्प्यांत करण्याचे चालवले आहे. त्यांचा एफआरपी फॉर्म्यूला ६०.२०.२० करण्याचे नियोजन आहे. यामुळे शेतकऱ्यांना एक हजार ३००  ते एक हजार ६०० रुपयांदरम्यान हातात पहिला हप्ता मिळणार आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडणार आहे.

सरकारच्या या धोरणामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे. १६  ते १८ महिने ऊस शेतकऱ्याला शेतात जोपासना करावा लागतो. त्याचे बिल तीन टप्प्यांत म्हणजे दोन ते अडीच वर्षांनी भेटणार असेल, तर शेतकरी आर्थिक संकटात सापडून त्याचे खूप मोठे आर्थिक नुकसान होईल. याचा विचार करून शेतकऱ्यांचे उसाचे बिल एक रकमी एफआरपी १४ दिवसांच्या आत ऊस उत्पादकाला द्यावी, अशी मागणी भाजप किसान मोर्चाच्या वतीने करण्यात आली. 

या वेळी माजी आमदार भगवानराव साळुंखे, भाजप किसान मोर्चा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष भगवान काटे, उपाध्यक्ष सतीश पाटील, जिल्हा सरचिटणीस नाना जाधव, हातकणंगले मंडळ अध्यक्ष राजेश पाटील, मंडल सरचिटणीस भुपाल कांबळे, मंडल समर्थ बूथ अभियान प्रमुख जिनेंद्र देसाई उपस्थित होते.

इतर बातम्या
किमान तापमानात घट होण्याची शक्यतापुणे : राज्यात पावसाने उघडिप दिल्यानंतर किमान...
‘महाडीबीटी’च्या कामात अडथळाअकोला ः कृषी खात्याच्या विविध योजनांचा लाभ...
कृषी निविष्ठा केंद्रांचे परवाने आता...पुणे ः राज्यातील कृषी सेवा केंद्रांना परवान्याची...
आयातीमुळे कडधान्य दर दबावातपुणे ः तुरीचा हंगाम पुढील काही दिवसांत सुरू होईल...
...तर द्राक्षाचे नुकसान टळले असतेनाशिक : गेल्या तीन वर्षांपासून कसमादे भागातील...
साहित्य संमेलनाचे अनुदान शेतकरी,...नाशिक : वामनदादा कर्डक जन्मशताब्दी साहित्यनगरी...
देशी वाणाने सकस उत्पादन ः राहीबाई पोपेरेसांगली : पारंपरिक बियाणाला रासायनिक खताच्या...
वीज पुरवठा सुरळीत न केल्यास  ढोरा...शेवगाव, जि. नगर : महावितरणने थकीत वीज बिलासाठी...
सहा हजार शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज परभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१-२२) रब्बी...
मॉन्सूनोत्तर पावसाचा सांगलीत  १२ हजार...सांगली : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील द्राक्ष,...
शिवरायांच्या स्वराज्यापासून महात्मा...कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी...
मराठवाड्यात आंब्यावर संकटाचे ढगऔरंगाबाद : यंदा आंब्यावर संकटाचे ढग कायम आहेत....
उचंगी प्रकल्पग्रस्तांचे शंभर टक्के...   कोल्हापूर : आजरा तालुक्यातील उचंगी...
श्रीरामपुरात बिबट्याचे चार तास...श्रीरामपूर, जि. नगर ः श्रीरामपूर शहरातील मोरगे...
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करू :...सांगली ः गेल्या काही दिवसापांसून संपूर्ण राज्यात...
क्षारपड जमीन सुधारण्यासाठी  केंद्राचे...कोल्हापूर : क्षारपड जमीन सुधारणा योजनेस केंद्र...
पावसामुळे द्राक्ष बागांचे  दोन हजार...पुणे ः जिल्‍ह्यात गेल्या आठवड्यात १ आणि २ डिसेंबर...
खानदेशात पुन्हा ढगाळ वातावरण कायम जळगाव ः  खानदेशात पावसाळी व ढगाळ वातावरण...
चाळीसगाव (जि.जळगाव) : अवकाळी पावसामुळे...चाळीसगाव, जि.जळगाव : चाळीसगाव, पाचोरा, भडगाव आदी...
जळगावः अॅग्रोवन व आयसीएल कंपनीतर्फे...जळगाव ः ॲग्रोवन आणि आयसीएल कंपनीच्या संयुक्त...