agriculture news in marathi, sugarcane growers waiting for payment, satara, maharashtra | Agrowon

सातारा जिल्‍ह्यातील ऊस उत्पादकांना दुसऱ्या बिलाची प्रतीक्षा
टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 एप्रिल 2019

सातारा  ः जिल्ह्यातील सह्याद्री कारखान्याचा अपवाद वगळता इतर सर्व साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. मात्र, आजपर्यंत जिल्ह्यातील एकाही कारखान्याने एफआरपी पूर्ण अदा केली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. शिल्लक एफआरपी कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

सातारा  ः जिल्ह्यातील सह्याद्री कारखान्याचा अपवाद वगळता इतर सर्व साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. मात्र, आजपर्यंत जिल्ह्यातील एकाही कारखान्याने एफआरपी पूर्ण अदा केली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. शिल्लक एफआरपी कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

जिल्ह्यातील सह्याद्री कारखान्यांचा गाळप हंगाम अजूनही सुरू आहे. १५ एप्रिलअखेर जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांनी ८४ लाख ७९ हजार ७३९ टन उसाचे गाळप करून एक कोटी एक लाख २७ हजार ८८० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा ११.९४ टक्के आहे. या गाळप हंगामात गतवर्षीप्रमाणेच साखर निर्मितीची कोटींची उड्डाणे मारली आहे. यामुळे सर्व कारखान्यांकडे मोठ्या प्रमाणात साखर उपलब्ध आहे. ही साखर बहुतांशी कारखान्यांनी कारखाना परिसरातील मोकळ्या जागेत ताडपत्रीने झाकून ठेवली आहे.

ऐन गाळप हंगामात साखरेच्या दरात घसरण झाल्यामुळे जाहीर केलेली एकरकमी एफआरपी कारखान्यांना देता आली नाही. या वेळी साखर कारखान्यांनी दराचे ८०-२० हे सूत्र स्वीकारत पहिली उचल म्हणून एफआरपीच्या ८० टक्के रक्कम दिली होती. दरम्यान शेतकऱ्यांना दर देता यावा यासाठी शासनाने साखरेचे किमान विक्री मूल्य ३१०० रुपये क्विंटल निश्चित केल्याने उर्वरित एफआरपीबाबत शेतकऱ्यांच्या आशा निर्माण झाल्या होत्या.

हंगाम संपण्याअगोदर शिल्लक एफआरपीचा दुसरा हप्ता मिळेल असे शेतकऱ्यांना वाटत होते. मात्र, हंगाम संपला तरी साखर कारखान्यांनी शिल्लक एफआरपीबाबत मौन बाळगले असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली. ८०-२० च्या सूत्रामुळे प्रत्येक कारखान्याकडे प्रतिटन ५०० ते ६०० रुपये शिल्लक आहेत. एफआरपीचे तुकडे झाल्याने शेतकऱ्यांना अनेक अर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहेत. पीक कर्ज नवे जुने करण्यासाठी पैसे कमी पडत असल्याने हातउसने घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.  

प्रचाराच्या धामधुमीत ऊस बिल दुर्लक्षित
लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला आला असून आरोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. मात्र, जिल्ह्यात सर्वाधिक असलेल्या उसाच्या पिकांकडे दुर्लक्ष केले जात आहे. जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी एकरकमी एफआरपी दिलेली नाही. या मुद्याला प्रचारात स्थान दिलेले दिसत नसल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख...सोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११...
सोलापुरात यंदाही खरीप कोरडाचसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला....
नाशिक बाजार समितीची सुरक्षा वाढविण्याचा...नाशिक : नाशिक कृषी बाजार समितीत वाढलेल्या...
नाशिक जिल्ह्यात पावसाअभावी फळबागांवर...नाशिक : कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव,...
परभणी जिल्ह्यात १३ लघू तलावांतील...परभणी : यंदा पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी...
टंचाईस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती सादर...हिंगोली : टंचाईस्थितीत शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत...
जालना जिल्ह्यात दुधाचे पैसे दोन...जालना : जिल्ह्यातील जामवाडी, गणेशपूर, नळणी, येवता...
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली...औरंगाबाद  : मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर...
सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीपसांगली ः जिल्ह्यात जून आणि जुलैमध्ये झालेल्या...
कंडारी पाणी योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी...जळगाव ः कंडारी (ता. भुसावळ) येथील ग्राम...
शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित...नागपूर ः विकासाच्या संकल्पनांमध्ये रस्ते, नाले व...
सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेती...सातारा : जिल्ह्यात पश्चिमेकडे दमदार पाऊस, तर...
कापसाच्या हमीभावात ५०० रुपयांनी वाढ...अमरावती   ः राज्याची कमी असलेली कापूस...
दमदार पावसाअभावी पुणे जिल्ह्यातील पूर्व...पुणे  ः जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिरूर,...
नगर जिल्ह्यात ऐन पावसाळ्यातही...नगर  ः दुष्काळाने होरपळ झालेल्या नगर...
पावसाअभावी धुळे, जळगाव जिल्ह्यांत...जळगाव  ः खानदेशात सुरवातीला पावसाने जोरदार...
नागपूर विभागात पावसाअभावी पिकांची वाढ...नागपूर  ः निम्मा जुलै महिना संपत आला असतानाच...
सांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९००...सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक कमी झाली...
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत...मुंबई  : भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री...
सुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...