Agriculture news in marathi, Sugarcane harvesting started in Kolhapur | Page 2 ||| Agrowon

उसाच्या तोडणीला कोल्हापुरात सुरुवात

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 ऑक्टोबर 2021

कोल्हापूर: जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम हळूहळू सुरू झाला आहे. शेतकरी संघटनांचा अडथळा दूर झाल्या नंतर यंदा कारखान्यांनी ठरवलेल्या वेळेत हंगाम सुरू होत आहे.

कोल्हापूर: जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम हळूहळू सुरू झाला आहे. शेतकरी संघटनांचा अडथळा दूर झाल्या नंतर यंदा कारखान्यांनी ठरवलेल्या वेळेत हंगाम सुरू होत आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली. त्यामुळे सध्या ऊसतोडणीसाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. 

दसऱ्यानंतर राज्याच्या विविध भागांतून ऊसतोडणी मजूर कारखाना परिसरात दाखल झाले. हंगाम वेळेवर सुरू होण्याची खात्री पटताच विविध कारखान्यातील शेती विभागाचा नियोजनात व्यस्त झाले आहेत. शेतकरी संघटनांची भूमिका जाणून घेण्यासाठी अनेक मजूर आपापल्या गावी थांबले होते, पण हंगाम सुरू होण्याची खात्री पटताच हे मजूर आता कारखान्याकडे येण्यास सुरवात झाली आहे.

काही कारखान्यांनी पुरात पूर्णपणे बुडालेला ऊस पहिल्यांदा देण्याचे नियोजन केले आहे. यानुसार नोंदी असलेल्या उसाची तोड करण्याबाबतचे नियोजन प्रत्येक कारखान्यांमध्ये सुरू आहे. गावाच्या ऊस तोडणी क्षेत्रानुसार संबंधित गावाकडे ऊस तोडणी कामगार रवाना होत आहेत.

कर्नाटकातील कारखान्यांनी यापूर्वीच ऊस तोडणी सुरू केली. त्यामुळे आता राज्यातील कारखान्यांनाही तातडीने ऊस तोडणी सुरू करून हंगाम वेळेत सुरु करावा लागणार आहे. गेल्या महिन्याभरात राज्यात सर्वत्र पाऊस पडला असला तरी जिल्ह्यात मात्र अपवाद वगळता कुठेच पावसाच्या फारशा सरी झाल्या नाहीत. यामुळे सध्या तरी ऊस तोडणीसाठी चांगला वापसा आल्याचे साखर कारखाना सूत्रांनी सांगितले. 

काही कारखान्यांचे व्यवस्थापन सध्या परवाने व तांत्रिक बाबी पूर्ण करण्यात गुंतले आहे. या बाबी पूर्ण झाल्यास तातडीने ऊस तोडणी सुरू करण्याचे आमचे नियोजन असल्याचे कारखाना प्रतिनिधींनी सांगितले.
 


इतर बातम्या
पुसदमध्ये ५००० क्विंटल कापसाचीच खरेदीआरेगाव, जि. यवतमाळ : यंदा सुरवातीपासूनच कापसाला...
धुळे : सोयाबीन बीजोत्पादनात सहभाग...धुळे : ‘‘उन्हाळी हंगाम २०२१-२२ मध्ये महाबीज...
नाशिकः २०२४ पर्यंत प्रति दिन,प्रति...नाशिकः ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत ‘हर घर नल से जल’...
खानदेशात गहू पेरणीला आला वेग जळगाव ः खानदेशात गेले दोन दिवस काहीसे कोरडे...
नांदेड जिल्ह्यात साडेतीन लाख शेतकरी...नांदेड : ई-पीक पाहणी प्रकल्पातंर्गत पीक पेरा...
नांदेडमध्ये सोयाबीनला साडेसहा हजारांचा...नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीतंर्गत...
तुर्कांबाद खराडीत करारावर बटाटा...औरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर तालुक्‍यातील...
शेतकऱ्यांनो एकरकमी भरा अर्धेच वीजबिल ः...नगर : राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे धोरण...
राज्याच्या किमान तापमानात घट पुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर आकाश...
शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळावे -...लातूर ः आज देशात गहू, तांदूळ, मका आणि साखर अधिकची...
शिंदीच्या झाडांचे आता जिओ टॅगिंग  नीरा...नागपूर ः राज्य शासनाने नीरा देणाऱ्या शिंदीच्या...
कंटेनर भाड्यात पाच पट वाढ नागपूर ः टाळेबंदीमुळे अमेरिका आणि युरोपियन देशात...
विमा योजनेकडे ७० टक्के शेतकऱ्यांनी...सांगली : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत...
कापड उद्योगाला खुपतोय कापसाचा दर पुणे : तमिळनाडूतील राजकीय पक्ष तसेच कापड...
काँग्रेसचे सतेज पाटील, भाजपचे अमरिश...मुंबई : राज्यातील विधान परिषदेच्या ६ जागा...
नाशिकमध्ये द्राक्ष परिषद घेणार : राजू...नाशिक : द्राक्ष पिकात शेतकरी कष्टातून उत्पादन घेत...
नगर जिल्ह्यात रब्बी पेरणीचा टक्का कमीचनगर ः जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीला अजूनही फारसा...
ई-पीक पाहणीचा पहिला टप्पा यशस्वीपुणेः देशातील पहिल्याच ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या...
किन्ही येथे धान पुंजणे जाळल्याने आठ...भंडारा ः साकोली तालुक्‍यातील किन्ही येथे १९...
पालघरचा मंजूर विकासनिधी सातव्यांदा...पालघरः मुंबईला लागून असलेल्या पालघर जिल्ह्याच्या...