agriculture news in marathi, Sugarcane has been available for crushing 82 thousand hectare | Agrowon

सातारा जिल्ह्यात ८२ हजार हेक्‍टरवरील ऊस उपलब्ध
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम गतवर्षीप्रमाणे लांबणार आहे. जिल्ह्यात आगामी गाळप हंगामासाठी ८२ हजार ४८४ हेक्‍टर क्षेत्रावरील ऊस उपलब्ध आहे. गतवर्षीच्या तुलनेत उसाचे क्षेत्र वाढले असले तरी उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी साखर कारखान्यांकडून हंगामाच्या सुरवातीपासून उसाची पळवापळवी सुरू होणार आहे.

सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम गतवर्षीप्रमाणे लांबणार आहे. जिल्ह्यात आगामी गाळप हंगामासाठी ८२ हजार ४८४ हेक्‍टर क्षेत्रावरील ऊस उपलब्ध आहे. गतवर्षीच्या तुलनेत उसाचे क्षेत्र वाढले असले तरी उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी साखर कारखान्यांकडून हंगामाच्या सुरवातीपासून उसाची पळवापळवी सुरू होणार आहे.
जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस गाळप हंगामाची तयारी सुरू केली आहे. सर्वच कारखान्यांकडून ऊसतोडणी यंत्रणा सक्षम करण्यासाठी ऊसतोडणी टोळ्या; तसेच टॅक्‍ट्ररचे करार करून ॲडव्हान्स देण्यात आले आहेत. काही कारखान्यांनी बॅायलर पूजन केले आहे. उसाचे क्षेत्र जास्त असल्याने राज्य शासनाकडून एक अॅाक्टोबरपासून गाळप परवाने दिले जाणार आहेत. यामुळे बहुतांशी कारखान्यांचे गाळप अॅाक्टोबर महिन्यात सुरू होणार आहे.

२०१६-१७ हंगामात ५० हजार ३२६ हेक्‍टर क्षेत्रावरील उसाचे गाळप झाले होते. २०१७-१८ हंगामात ८० हजार ६४४ हेक्‍टर क्षेत्रावरील ऊस गाळप करण्यात आला होता. या गाळप हंगामासाठी ८२ हजार ४८४ हेक्टर क्षेत्रावर ऊस उपलब्ध आहे. उसाचे क्षेत्र वाढल्यामुळे गतवर्षीप्रमाणे आगामी गाळप हंगाम मे महिन्यापर्यंत चालण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील अनेक कारखान्यांनी गाळप क्षमता वाढवली आहे. दोन कारखान्यांची भर पडली असल्याने १७ कारखाने पूर्ण क्षमतेने गाळप करण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातून ऊस नेणे सोपे पडत असल्यामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील अनेक कारखाने येथून ऊस नेतात. या वेळीदेखील या कारखान्यांकडून ऊस नेला जाणार आहे.

ऊसदर मुद्दा कळीचा ठरणार
मागील हंगामांच्या सुरवातीस साखरेचे दर चांगले असल्याने एफआरपी व अधिक दोनशे रुपये हा पॅटर्न साखर कारखान्यांनी मान्य केला होता. सुरवातीस या पॅटर्नप्रमाणे अनेक साखर कारखान्यांनी दर दिले होते. मात्र त्यानंतर साखरेचे दर कमी झाल्याने दरात घट करण्यात आली होती. काही कारखान्यांनी आजपर्यंत बिले दिलेली नाहीत. या कारखान्यांना शेतकरी ऊस देणार नाही. जो कारखाना जास्त आणि वेळेत पैसे देईल अशा कारखान्यांना ऊस दिला जाण्याची शक्यता आहे. जादा दर देणाऱ्या कारखान्यांना ऊस देण्याकडे शेतकऱ्यांचा कल राहणार असल्याने याही हंगामात दर हा कळीची मुद्दा ठरणार आहे.

तालुकानिहाय उसाचे क्षेत्र (हेक्‍टर)

तालुका    क्षेत्र
सातारा    १९,२५८.३६
कोरेगाव  १२,५११.६७
खटाव    ४८४९.०७
कऱ्हाड    १८,७९३
पाटण    ३९२३.१६
वाई   १७३४
जावली  ७३८
खंडाळा    २१४५
फलटण   १७,५७३
माण     ९५९

 

 

इतर बातम्या
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
यवतमाळ जिल्ह्यातील सात दुष्काळग्रस्त...यवतमाळ ः जनरेट्यामुळे दुष्काळ यादीत नव्याने...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...
केरळच्या धर्तीवर काजू प्रक्रिया ...रत्नागिरी  ः परदेशी चलन मिळवून देणाऱ्या काजू...
`गोकुळ` मल्टिस्टेटमुळे शेतकऱ्यांचा...मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
संगमनेर तालुक्यातील लिंबू बागांना घरघर संगमनेर, जि. नगर : दर्जेदार कागदी लिंबांच्या...
दूध वाहतुकीतून रेल्वेला ६ कोटी १२ लाख...दौंड, जि. पुणे  : दौंड रेल्वे स्थानकावरून...
कृषक विकिरण केंद्रातून अमेरिका, ...नाशिक  : जिल्ह्यातील लासलगाव येथील कृषक...
आसाम, बिहारमध्ये पुराचे ११४ बळीनवी दिल्ली: आसाम आणि बिहारमध्ये पुराचे थैमान...
सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना मुबलक वीज...कोल्हापूर ः शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त...
परीक्षा शुल्क परतीचा खर्च सात लाख रुपयेयवतमाळ ः परीक्षा रद्द झाल्यानंतर उमेदवारांचे पैसे...
दुबार पेरणीसाठी सरकारची तयारीः डाॅ....पुणे: पावसाचा काही प्रमाणात खंड पडला आहे....
डोणगावात होणार खजूर लागवडअकोला ः पारंपरिक पिकांना पर्याय शोधण्यासाठी...
रक्तक्षय दूर करण्यासाठी लोहयुक्त तांदूळनाशिक : दैनंदिन आहारातून अत्यल्प प्रमाणात लोह...
असंमत बियाणे लागवडीला बोंडअळी कारणीभूत...नवी दिल्ली : देशात २०१८ मध्ये गुलाबी...