agriculture news in Marathi, sugarcane machine subsidy scheme closed, Maharashtra | Agrowon

ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना बंद

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

पुणे: केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून ऊस तोडणी यंत्रासाठी (शुगरकेन हार्वेस्टर) दिले जाणारे अनुदान बंद करण्यात आले आहे. ही योजना पुन्हा सुरू करण्याची जोरदार मागणी राज्यातील साखर कारखान्यांनी केली आहे. 

राज्यात यंदा गेल्या हंगामापेक्षाही जादा क्षेत्रावर उसाची लागवड झाली आहे. गेल्या हंगामात ९ लाख हेक्टरवर ऊस होता. यंदा मजुराची टंचाई असताना उसाचे क्षेत्र मात्र ११ लाख हेक्टरच्या पुढे सरकले आहे. त्यामुळे तोडणीची मोठी समस्या उभी राहू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. 

पुणे: केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून ऊस तोडणी यंत्रासाठी (शुगरकेन हार्वेस्टर) दिले जाणारे अनुदान बंद करण्यात आले आहे. ही योजना पुन्हा सुरू करण्याची जोरदार मागणी राज्यातील साखर कारखान्यांनी केली आहे. 

राज्यात यंदा गेल्या हंगामापेक्षाही जादा क्षेत्रावर उसाची लागवड झाली आहे. गेल्या हंगामात ९ लाख हेक्टरवर ऊस होता. यंदा मजुराची टंचाई असताना उसाचे क्षेत्र मात्र ११ लाख हेक्टरच्या पुढे सरकले आहे. त्यामुळे तोडणीची मोठी समस्या उभी राहू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. 

‘ऊसतोड मजुरांची संख्या माेठ्या प्रमाणात घटली आहे. इतर उपलब्ध पर्याय, स्थलांतर यामुळे ऊसतोड कामगारांची टंचाई आहे. अशास्थितीत चालू हंगामात आम्हाला किमान ५०० ते ८०० हार्वेस्टरची गरज होती. तथापि, राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून (आरकेव्हीवाय) अनुदान बंद करण्यात आल्याने तोडणी कामात यंदा व्यत्यय येईल,’’ असे कारखाना सूत्रांचे म्हणणे आहे. 

सहकार विभागाच्या म्हणण्यानुसार, कर्ज काढून एक कोटी रुपयांचे हार्वेस्टर खरेदी केले जाते. त्यासाठी ४० टक्के किंवा ४० लाखांपर्यंत अनुदान देण्याचे धोरण आरकेव्हीवायचे होते. 

मुळात हार्वेस्टरधारक सध्या अडचणीत असून कर्जमाफीची मागणी करीत आहे. त्यामुळे अनुदान वाढवून देण्याची मागणी कारखाने करीत असून त्याबाबत केंद्र शासनाशी पत्रव्यवहार केला जाईल. 

साखर कारखान्यासोबत हार्वेस्टर मालकाने ऊसतोडीचा करार केल्यास ४० लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जात होते. गेल्या हंगामात ४५ हार्वेस्टरला अनुदान त्यामुळे आतापर्यंत केन हार्वेस्टरसाठी २५२ हार्वेस्टरचालकांशी करार केले.

"केन हार्वेस्टरसाठी अनुदान निधी कमी आणि अनुदान मागणाऱ्यांची संख्या जास्त झाल्यामुळे शासनासमोरील अडचणी वाढल्या होत्या. त्यामुळे ही योजना बंद करावी लागली,’’ असेही सूत्रांचे म्हणणे आहे.


इतर अॅग्रो विशेष
संगमनेर तालुका संघाकडून ५० टक्के...नगर: संगमनेर तालुका सहकारी दूध संघाने दूध...
उगाव येथे सामूहिक पातळीवर दशपर्णी अर्क...नाशिक: निफाड तालुक्यातील उगाव येथील श्री. श्री....
किसान क्रेडिट कार्डवर बिनव्याजी कर्ज...नाशिक: शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आर्थिक मदत करणे...
दुधाला दर नसल्याने, दुभती जनावरे ...सोलापूर ः दुधाला मागणी असूनही केवळ योग्य तो दर...
मराठा समाजाला विश्वासात घेणार : अशोक...मुंबई : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत राज्य...
पुण्यात शेतमाल पुरवठा देखील बंद पुणे: कोरोनाची उफाळून आलेली साथ रोखण्यासाठी...
देशाच्या सूत निर्यातीत मोठी घट जळगाव ः कोरोना व इतर संकटांमध्ये देशातील सूत...
मराठवाड्यात २६ टक्के पीककर्ज वितरणऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा राज्यात बंद...औरंगाबाद: कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या...
राज्यात पावसाला पोषक हवामानपुणे : राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्याने...
जलसंधारण,शिक्षण अन् कृषी विकासाचा रचला...सुदृढ, आत्मनिर्भर समाज घडविणे या उद्देशातून जळका...
दुग्ध व्यवसाय ठरतोय शेतीला आधारपनवेल येथील बांधकाम व्यावसायिक अनिल लक्ष्मण...
कृषी आयुक्त दिवसेंची बदली, गायकवाड...मुंबई : राज्य सरकारने शनिवारी महत्त्वपूर्ण...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांना आरोपी नव्हे...पुणे : राज्यात खते, बियाणे, कीटकनाशकांची विक्री...
आनंदाची पातळी बदलतेय उत्पन्नांनुसारआजच्या जगामध्ये सामाजिक आर्थिक निकषांमध्ये वेगाने...
शेती क्षेत्रातील बदल टप्याटप्याने...नागपूर ः शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कृषी...
राज्यात कृषी सेवा केंद्रांचा बंद सुरूपुणेः सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
औरंगाबाद जिल्ह्यातील थेट शेतमाल विक्री...औरंगाबाद : कोरोना संकटामुळे शेतकरी ते ग्राहक...
रुतलेले अर्थचक्राने विकासालाही ‘ब्रेक’''मूडी'' या पतमानांकन संस्थेने अलीकडेच आपला अहवाल...
बेलखेडा होणार संत्रा उत्पादक गावरिसोड, जि. वाशीम ः तालुक्यातील दोन हजार लोकसंख्या...