agriculture news in marathi, sugarcane plantation area decrease due to drought, kolhapur, maharashtra | Agrowon

दुष्काळाने ऊस लागवडीत खोडा

राजकुमार चौगुले
गुरुवार, 16 मे 2019

सध्याचा उन्हाचा तडाखा जास्त असल्याने उसाला पाण्याचे नियोजन करणे आवश्‍यक आहे. पाणी पुरेसे मिळावे यासाठी विशेष करून सायंकाळच्या वेळेत पाणी द्यावे. वाढ समाधानाकारक असल्यास फवारणीचे नियोजन करावे. मुळांना फॉस्‍फाेरस जास्तीत जास्त मिळेल, या बेताने फवारणीचे नियोजन करावे. यामुळे मुळांची वाढ चांगली होते. पाणी नसल्यामुळे जमिनीतून खत देणे अशक्‍य असल्याचे फवारणीसाठी प्रयत्न आवश्‍यक आहेत. सध्या शेतकऱ्यांकडून पाणी व्यवस्थापनाबाबत आमच्याकडे विचारणा होत आहे. ठिबक व स्प्रींकलचा प्रभावी वापर आता गरजेची बनली आहे. 
-डॉ. अशोक पिसाळ, कृषी विद्यावेत्ता, कृषी महाविद्यालय, कोल्हापूर.

कोल्हापूर: राज्यात दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्याने याचा फटका आता उसाच्या पूर्व हंगामी व सुरू लागवडीला बसत आहे. सातत्याने चाळीशी पार केलेल्या पाऱ्यामुळे या कालावधीतील उसाला पाण्याचे नियोजन करणे अशक्‍य बनले आहे. पुरेसे पाणी न मिळाल्यास या हंगामातील लागवडी संकटात येण्याची शक्‍यता आहे. पाण्याच्या टंचाईमुळे राज्यात यंदा दोन्ही हंगामांतील ऊस लागवडीकडे शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. परिणामी, लागवडीत घट झाली आहे.  

राज्यात पश्‍चिम महाराष्ट्र वगळता अन्य ठिकाणी पूर्व हंगामी (आक्‍टोबर, नोव्हेंबरमध्ये होणारी लागवड) व सुरु (जानेवारी, फेब्रुवारीतील लागवड) अशा दोन हंगामांत जास्तीत जास्त ऊस लागवड होते. पश्‍चिम महाराष्ट्रात आडसाली (जुलै, ऑगस्ट) लागवड होते. पाण्याची शक्‍यता नसल्याने यंदा सुरु लागवडीला मोठे अडथळे आले. बहुतांशी राज्यात जानेवारीपासूनच पाणीटंचाई निर्माण झाली. फेब्रुवारी, मार्चमध्ये तर अनेक ठिकाणचे जलस्रोत आटले. याचा विपरीत परिणाम सुरु लागवडी घटण्यावर  झाला आहे.  राज्यातील पश्‍चिम महाराष्ट्र वगळता बहुतांशी भागातील शेतकऱ्यांनी यंदा ऊस लागवडीला फाटा दिला आहे. यामुळेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुरु लागवडी कमी झाल्या. याचा परिणाम हा येणाऱ्या गळीतावर नक्कीच होणार असल्याचे कारखाना सूत्रांनी सांगितले. 

ऊस जगविताना कसरत
तज्ज्ञांच्या मतानुसार पूर्व व सुरु हंगामातील ऊस सध्या तीन ते सहा महिने कालावधीचा आहे. ऊसवाढीच्या अवस्थेत असल्याने सध्या या उसाला जादा पाण्याची आवश्‍यकता आहे. या उसाला उशिरा फुटवे येऊन चालत नाही. सध्याच्याच कालावधीत फुटवे आले तरच वाढ चांगली होते. पण, अनेक ठिकाणी टंचाईची स्थिती निर्माण झाल्याने उसाला आवश्‍यक इतके पाणी देतानाही दमछाक होत आहे. जिथे पाण्याचे अत्यल्प साठे आहेत. तेथील उस पीक धोक्‍यात आले आहे. कमीतकमी पाण्यात या उसाचे कसे व्यवस्थापन करावे, यासाठी शेतकरी धडपडत आहेत. 

मोसमी पावसावर हंगाम अवलंबून
पश्‍चिम महाराष्ट्रात जूनपासून आडसाली लागवडीची तयारी सुरू होते. परंतु जर पाऊस वेळेत झाला नाही तर या लागवडीही पुढे जातील अशी भीती कारखाना प्रतिनिधींनी व्यक्त केली. नदीच्या पाण्याव्यतिरिक्त जे शेतकरी विहिरी व कूपनलिकांच्या पाण्यावर अवलंबून आहेत. त्या स्रोताची पातळीही खाली जात असल्याने आडसाली हंगामात किती लागवडी होतील याबाबत साशंकता आहे. सध्या बऱ्यापैकी वाढ झालेल्या आडसाली लागवडीलाही पाणी जादा प्रमाणात लागत आहे. यामुळे पुरेसा पाऊस झाल्यावरच शेतकरी नव्या आडसाली लागणीसाठी विचार करतील. जर वेळेत पाऊस नाही झाला तर सध्या उभा असणाऱ्या आडसाली उसावर उत्पादन घटीचा परिणाम होर्इलच पण नव्या लागणीही थांबतील. अशी भीती कारखाना प्रतिनिधींनी व्यक्त केली. 
 


इतर बातम्या
शेतकरीभिमुख संशोधनावर भर : कुलगुरू डॉ....अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
नगर जिल्ह्यामध्ये कमी पाण्यावरील फळझाडे...नगर : पाच वर्षांपासून दुष्काळाशी सामना करताना...
लेखी आश्वासनानंतर बाजार समिती...नाशिक : शासनाने जाहीर केलेला महाभाई भत्ता मिळावा...
लातूर विभागात सूक्ष्म सिंचनातील ११...नांदेड : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत यंदा...
खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यातजळगाव ः खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे....
सातारा : अधिकृत विक्रेत्यांकडून...सातारा : बाजार समितीच्या आवारातील...
ग्रामीण पर्यटन विकासाचा ‘शिवनेरी...पुणे ः गड किल्ल्यांच्या पर्यटनाच्या माध्यमातून...
हवामानबदलाशी लढण्यासाठी एक हजार कोटी...पुणे ः जागतिक हवामानबदलाची समस्या संपूर्ण जगासमोर...
‘एफएसएसएआय’च्या नव्या ‘सीईओ’विषयी...पुणे: भारतीय अन्न सुरक्षितता व मानके...
राज्यात उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : राज्यात कमाल तापमानात मोठी वाढ झाल्याने...
कापसाचे ६४७ कोटींचे चुकारे थकीतअमरावती ः बाजारात दर कोसळल्याने महाराष्ट्र राज्य...
‘म्हैसाळ’मधून पाणी सोडण्याच्या हालचालीसांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पाणी...
पीकविमा र‍कमेसाठी शेतकऱ्यांचा रास्ता...अमरावती  ः पीकविम्याची रक्‍कम कर्ज खात्यात...
‘पणन’ची कापूस खरेदी उच्चांकी दिशेनेऔरंगाबाद : महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन...
शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीत ८५ स्वराज्यरथ...पुणे : ‘‘पुण्यात शिवजयंती महोत्सव समितीतर्फे आज...
बिबट्या दिसल्याने ग्रामस्थांत दहशतअमरावती  ः गावशिवारात एकाच आठवड्यात दोनदा...
पिंपळनेरला कांदा मार्केट दोन मार्चला...पिंपळनेर, जि. धुळे : शेतीमाल विक्रीनंतर...
महिला बचत गट आर्थिक प्रगतीचा मार्ग ः...सोलापूर  ः  महिला बचतगट हे ग्रामीण...
जळगाव जिल्ह्यात रब्बीचा पेरा १७१ टक्केजळगाव  ः रब्बी हंगामातील उत्पादनाची...
वीज बिले न भरण्याचा ‘स्वाभिमानी’चा...सातारा  ः जावळवाडी (ता. सातारा) येथील मुख्य...