agriculture news in marathi, sugarcane plantation start, kolhapur, maharashtra | Agrowon

आडसाली ऊस लागवडीला कोल्हापूर जिल्ह्यात गती
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 18 जुलै 2019

गेल्या दहा ते बारा दिवसांपासून परिसरातील शेतकरी आडसाली ऊस लागवडीला प्राधान्य देत आहेत. मध्यंतरी कडक उन्हामुळे लागवडी खोळंबल्या होत्या. परंतु आता त्याला गती येत आहे.
- दिलीप जाधव, ऊस विकास अधिकारी, दत्त कारखाना, शिरोळ

कोल्हापूर  : जिल्ह्यात गेल्या पंधरवड्यात चांगला पाऊस झाल्याने आडसाली ऊस लागवडीने गती घेतली आहे. पाऊस वेळेत सुरू न झाल्याने लागवडी सुमारे महिनाभर खोळंबल्या होत्या. आता नव्याने लागवडीस प्रारंभ झाला आहे.

जिल्ह्यात विशेष करून पूर्व भागात आडसाली ऊस लागवडीला शेतकरी प्राधान्य देतात. उन्हाळी पिके काढल्यानंतर पावसाळा सुरू होईपर्यंत एखादा भाजीपाल्याचा प्लॉट करायचा किंवा रान मोकळे ठेवून आडसाली ऊस लागवड करायची अशी पद्धत साधारणपणे शेतकरी अवलंबतात. खरीप हंगामाच्या प्रारंभीच ऊस लागवड सुरू होते. परंतु यंदा जून महिना जवळपास कोरडाच गेला. जिल्ह्याच्या पूर्व भागात तर पाच - दहा टक्केही पाऊस झाला नाही. मे महिन्यातील वळवाच्या जोरावर शेतकरी शेत तयार करून आडसाली ऊस लागवड करतात. परंतु कडक उन्हाळा व लवकर पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांनी ऊस लागवड पुढे ढकलली होती.

पूर्व भागात संततधार नसला तरी बहूतांशी ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे मशागतीसाठी शेत तयार झाले. सध्या पाऊस थांबल्याने गडबड करून शेतकऱ्यांनी ऊस लागवडीला प्राधान्य दिले आहे. 

बियाणे बघणे, शेत तयार करून सऱ्या सोडणे या कामांमध्ये सध्या ऊस उत्पादक व्यस्त आहे. कोल्हापूरबरोबर शेजारील बेळगाव जिल्ह्यातही ऊस लागवडीला प्राधान्य दिले जात आहे. ऑगस्टच्या मध्यापर्यंत शेतकरी आडसाली ऊस लागवड पूर्ण करतील, अशी शक्‍यता कारखाना सूत्रांनी व्यक्त केली.
 

इतर ताज्या घडामोडी
वांग्यावरील शेंडा व फळे पोखरणाऱ्या...वांगी पिकामध्ये येणाऱ्या शेंडा व फळे पोखरणारी...
पूरस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापनसां गली, कोल्हापूर व कर्नाटक शेजारील काही भागांत...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...
सांगलीत गूळ ३३०० ते ४४०० रुपये...सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र...अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल...
सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज...मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस...
ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला...भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू...
मांडाखळीत संत्रा बागांत फळगळपरभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची...
रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेशसोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी...
कोल्हापुरात मोहीम स्वरूपात पंचनाम्यास...कोल्हापूर: महापुराच्या प्रलयानंतर आता...
सांगली जिल्हा बॅंकेच्या १२ शाखांचे...सांगली   ः महापुराचा फटका शेती आणि...
एकात्मिक शेती पद्धत वापरासाठी ‘कृषी’...मुंबई  : पीक उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे...
पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिके...कोल्हापूर   : पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत...
युतीतील अनेक जण आमच्या संपर्कात ः अजित...यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि...
मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शरद पवार...मुंबई  ः कोल्हापूर, सांगली, सातारा या...
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...