पुणे विभागात सुरू उसाची लागवड थंडावली

ऊस लागवड
ऊस लागवड
पुणे : यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे ऊस लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. पुणे विभागात डिसेंबरपासून सुरू उसाच्या लागवडीस प्रारंभ झाला होता. आता सुरू उसाचा हंगाम संपत आला आहे. येत्या उन्हाळ्यात पाणीटंचाई भासण्याची शक्‍यता लक्षात घेत अनेक शेतकऱ्यांनी लागवडी न करण्याचा निर्णय घेतल्याने सुरू उसाची लागवड थंडावल्याचे दिसून येत आहे. 
 
दर वर्षी शेतकरी मोठ्या प्रमाणात आडसाली, पूर्व हंगामी आणि सुरू उसाच्या लागवडी करतात. विभागात ऊस लागवडीचे एकूण सरासरी क्षेत्र चार लाख १३ हजार ५८० हेक्‍टर आहे. त्यापैकी आत्तापर्यंत एकूण तीन लाख १४ हजार १८० हेक्‍टरवर लागवड झाली असल्याचे चित्र आहे.
 
यंदा जुलै-ऑगस्ट या कालावधीत आडसाली उसाची एकूण ९२ हजार ३२० हेक्‍टरवर लागवड झाली आहे. ऑक्‍टोबर-नोव्हेबर महिन्यात पूर्वहंगामी उसाची एक लाख १३ हजार १० हेक्‍टरवर लागवड झाली. डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत सुरू उसाचे ४० हजार १७० हेक्‍टर, तर खोडव्याचे ६८ हजार ६८० हेक्‍टर क्षेत्र शेतकऱ्यांनी ठेवले आहे. 
 
यंदा विभागातील नगर जिल्ह्यात श्रीगोंदा, राहुरी, राहाता तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड केली आहेत. नगर, पारनेर, पाथर्डी तालुके ऊस लागवडी पासून दूर आहेत. पुणे जिल्ह्यातील शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात, तर पश्‍चिम पट्ट्यातील भोर, मावळ, मुळशी, वेल्हा तालुके या तालुक्‍यात अल्प क्षेत्रावर ऊस लागवड झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातही दक्षिण सोलापूर, मोहोळ, माढा, करमाळा, पंढरपूर, माळशिरस ही तालुके प्रामुख्याने ऊस लागवडीत आघाडीवर आहेत.
जिल्हानिहाय ऊस लागवड क्षेत्र (हेक्टर)
जिल्हा सरासरी क्षेत्र लागवड क्षेत्र
नगर १,२१,१८० ७०,३१० 
पुणे १,३०,६३० १,०७,६२० 
सोलापूर १,६१,७७० १,३६,२५०
एकूण    ४,१३,५८० ३,१४,१८०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com