agriculture news in Marathi sugarcane planting up in Sangali Maharashtra | Agrowon

सांगली जिल्ह्यात ऊस लागवडीत वाढ

टीम अॅग्रोवन
रविवार, 24 मे 2020

गतवर्षी झालेल्या अतिवृष्टी आणि महापूराने जिल्ह्यातील उसाच्या क्षेत्रात घट होणार अशी शक्‍यता साखर कारखान्यांनी व्यक्त केली होती, मात्र जिल्ह्यात ९८ हजार ७९० हेक्‍टरवर ऊस लागवड झाली आहे.

सांगली ः गतवर्षी झालेल्या अतिवृष्टी आणि महापूराने जिल्ह्यातील उसाच्या क्षेत्रात घट होणार अशी शक्‍यता साखर कारखान्यांनी व्यक्त केली होती, मात्र जिल्ह्यात ९८ हजार ७९० हेक्‍टरवर ऊस लागवड झाली आहे. गतवर्षी ९५ हजार ८२७ हेक्‍टरक्षेत्रावर ऊस होता. म्हणजेच २ हजार ३६३ हेक्‍टरने ऊस क्षेत्रात वाढ झाली आहे. मात्र, आडसाली ऊसाच्या क्षेत्रात घट आहे. 

जिल्ह्यात वाळवा, पलूस, कडेगाव, मिरज, शिराळा, यासह दुष्काळी पट्ट्‌यात उसाची लागवड मोठ्या प्रमाणात होते. जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात देखील उपसा सिंचन योजनचे पाणी पोहोचल्याने या भागात सुध्दा ऊस लागवडीचे प्रमाण काही अंशी वाढलेले पहावयास मिळते आहे. जिल्ह्यात गेल्या तीन वर्षाचा आढावा पाहिला तर दरवर्षी पाच ते सहा हजार हेक्‍टरने उसाच्या क्षेत्रात वाढ होत आहे. गेल्यावर्षी ९५ हजार हेक्‍टरवर ऊसाचे क्षेत्र होते. त्यामुळे गाळपाची स्पर्धा अटळ होती.

परंतु, कृष्णा आणि वारणा नदीला ऑगस्ट महिन्यात महापूर आला, त्यामुळे साखर कारखाने उशीरा सुरु झाले. त्याच दरम्यान, वाळवा, मिरज, आणि पलूससह कडेगाव तालुक्‍यात जूलै ऑगस्ट मध्ये आडसाली उसाची लागवड होते. परंतू आडसाली ऊसाची लागवड झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पूर्व, सुरु हंगामात लागवड कऱण्यास प्राधान्य दिले. तसेच खोडवा क्षेत्रात देखील वाढ झाली. 

आडसाली उसाच्या क्षेत्रात घट 
ऊस पट्ट्यात जुलै ते ऑगस्ट महिन्यात ऊस लागवड प्रामुख्याने केली जाते. त्यानुसार शेतकऱ्यांनी लागवडीसाठी शेती तयार करुन ठेवली होती. परंतू या दरम्यान, महापूर आणि अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचले. परिमाणी शेतात साचलेले पाणी कमी होण्यासाठी महिन्याचा काळ गेला. त्यामुळे आडसाली उसाची लागवड करण्याचे नियोजन कोलमडल्याने आडसाली क्षेत्रात घट आली. 

हंगामनिहाय ऊस लागवड (हेक्‍टरमध्ये) 

हंगाम लागवड
आडसाली ३०,८१० 
पूर्व हंगामी २१,९७२
सुरु १२,३८१ 
खोडवा ३३,६२३ 
एकूण ९८,७९० 

वर्षनिहाय ऊस लागवड (हेक्टरमध्ये) 

वर्ष लागवड 
२०१७-१८ ८०,४४९ 
२०१८-१९ ८९,९१८ 
२०१९-२० ९५,८२७ 
२०२०-२१ ९८,७९० 

 


इतर ताज्या घडामोडी
शैक्षणिक वर्ष जूनपासूनच : मुख्यमंत्री...मुंबई : ‘‘शिक्षण हे जीवनावश्यक आहे ते...
राज्यात नवे २४८७ रुग्ण; सध्या ३४,४८०...मुंबई : राज्यात आज दिवसभरात २४८७ नवीन रुग्णांचे...
परवानगी नसलेल्या एचटीबीटी बियाण्यांचा...अमरावती ः घरपोच बियाणे वाटपाच्या माध्यमातून...
लोकांना पूर धोक्‍याची जाणीव करुन द्या ः...भंडारा ः वैनगंगा नदी तसेच इतर नदीकाठावरील खोलगट...
गोंधळी शिवारात ६२ हजारांचा एचटीबीटी...यवतमाळ ः कृषी विभागाच्या पथकाने अमरावती, यवतमाळ...
प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील यंत्रमाग...मालेगाव, जि. नाशिक : ‘‘लॉकडाऊनमुळे यंत्रमागाची...
टोळधाड प्रादुर्भावग्रस्त क्षेत्राला...भंडारा ः भंडारा जिल्ह्यातील टोळधाड...
शेतकऱ्यांनी डिजिटल व्यासपीठाचा वापर...पुणे ः कोरोनामुळे शेतीक्षेत्राचे चित्र बदलणार आहे...
नांदेड जिल्ह्यात पाच हजारावर...नांदेड : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत...
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे ७ जूनला...अकोला ः कोरोनामुळे उद्योगधंदे, व्यापार, शेती,...
‘कुकडी’चे उन्हाळी आवर्तन सहा जूनला...नगर : ‘कुकडी’च्या उन्हाळी आवर्तनासाठी पुणे येथे...
नगर अर्बन बॅंकेला चाळीस लाखांचा दंडनगर : नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेला रिझर्व्ह...
नांदेडमधील कापूस संशोधन केंद्रात...नांदेड : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
‘सोयाबीन लागवड तंत्रज्ञान व प्रक्रिये’...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
दोन वाहनांतील कापूस घेण्याचे आदेश द्या...परभणी : भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) मानवत...
दुग्ध व्यवसायाने घराला आधारशेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय पूर्वीपासूनच...
पंतप्रधान मोदी यांच्याकडून संशोधक...नाशिक : जिल्ह्यातील वऱ्हाणे (ता.बागलाण) येथील...
ग्रामविकास विभागामार्फत मोफत आर्सेनिक...कोल्हापूर  : नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती...
कापसाच्या वाती करून शासनाची आरती...अमरावती  ः पूर्व विदर्भातील पांढऱ्या...
एचटीबीटीबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा...नागपूर  ः एचटीबीटीचा विषय केंद्र सरकारच्या...