खोडवा पीक व्यवस्थापनातून चांगले उत्पादन ः शास्त्रज्ञ कटके

sugarcane production increase ः scientist Katake
sugarcane production increase ः scientist Katake

निरगुडसर, जि. पुणे ः खोडवा उसामध्ये पाचट कुजविणे, आंतरमशागत, खुरपणी, सेंद्रिय व रासायनिक खतांचा संतुवित वापर, पाणी नियोजन योग्य पद्धतीने केल्यास चांगले उत्पादन मिळते, असे मत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ प्रक्षेत्र प्रमुख एस. एस. कटके यांनी व्यक्त केले.

निरगुडसर (ता. आंबेगाव) येथील दत्तात्रय वळसे-पाटील कृषी फार्मवर भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आयोजित ऊस पीक चर्चासत्रांर्तगत ‘खोडवा पीक व्यवस्थापन’ कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी (ता. ११) करण्यात आले होते. या वेळी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ प्रक्षेत्र प्रमुख एस. एस. कटके व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ यू. एस. मंजुळ यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

या वेळी भीमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष माऊली गावडे, निरगुडेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव वळसे-पाटील, भीमाशंकरचे संचालक प्रदीप वळसे-पाटील, बाळासाहेब घुले, दादाभाऊ पोखरकर, दगडू शिंदे, शांताराम हिंगे, अक्षय काळे, बाबासाहेब खालकर, बाळासाहेब थोरात, माऊली अस्वारे, उत्तम थोरात, रामचंद्र ढोबळे, कल्पना गाढवे, मंदाकिनी हांडे, प्रमोद वळसे पाटील, सरपंच ऊर्मिला वळसे, उपसरपंच दादाभाऊ टाव्हरे, मुख्य शेतकी अधिकारी दिलीप कुरकुटे, ऊस विकास अधिकारी संदीप मोरडे व ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

या वेळी दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील कृषी फार्म कारखाना प्रक्षेत्रावरील चौदा उसांच्या जातींच्या लागवड केलेल्या पीक प्रात्यक्षिकाचे व शिवार फेरीचे आयोजन शेतकऱ्यांसाठी करण्यात आले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com