agriculture news in marathi, sugarcane rate increase for fodder, nagar, maharashtra | Agrowon

तिसगाव उपबाजारात चाऱ्यासाठी उसाला प्रतिटन १५०० रुपये भाव
टीम अॅग्रोवन
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

तिसगाव, जि. नगर  : पाथर्डी तालुक्‍यात चाऱ्याची टंचाई निर्माण झालेली आहे. तसेच, पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाल्यामुळे उसाची आता चाऱ्यासाठी विक्री होऊ लागली आहे. बीड जिल्ह्यातून तिसगाव उपबाजारात ऊस विक्रीस आणला जात आहे.उसाला प्रतिटन १५०० रुपये भाव मिळत आहे.

तिसगाव, जि. नगर  : पाथर्डी तालुक्‍यात चाऱ्याची टंचाई निर्माण झालेली आहे. तसेच, पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाल्यामुळे उसाची आता चाऱ्यासाठी विक्री होऊ लागली आहे. बीड जिल्ह्यातून तिसगाव उपबाजारात ऊस विक्रीस आणला जात आहे.उसाला प्रतिटन १५०० रुपये भाव मिळत आहे.

नगर जिल्ह्यात यंदा पुरेसा पाऊस नाही. त्यामुळे या वर्षी विहिरींनी ऑक्‍टोबरमध्येच तळ गाठला आहे. परिणामी, उसासाठी पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच पाऊस नसलेल्या भागात ऊस जगवण्याचा प्रयत्न सुरू असताना हुमणीचा उसावर प्रादुर्भाव झाला आहे. साखर कारखाने सुरू होण्यास अवधी असल्याने पाण्याअभावी ऊस जळून जाण्यापेक्षा शेतकरी चाऱ्यासाठी त्याची विक्री करीत आहेत.
तिसगाव परिसराबरोबरच मराठवाड्यात अशीच परिस्थिती असल्याने बीड जिल्ह्यातील शिरूर, गेवराई, बीड तालुका या भागांतून चाऱ्यासाठी ऊस तिसगावच्या उपबाजारात विक्रीस येत आहे.

‘‘पाऊस चांगला नसल्याने भूजल पातळी खालावलेली आहे. उसाला पाणी देता येत नसल्यामुळे ऊस विक्रीस आणला आहे,’’ असे वंजारवाडी (जि. बीड) येथील ऊस उत्पादक सूरज कुटे यांनी सांगितले.
 ‘पाऊस नसल्याने ऊसउत्पादक शेतकरी अडचणीत आले असून, शासनाने अनुदानाच्या स्वरूपात आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी तीसगाव येथील युवक कार्यकर्ते भाऊसाहेब लवांडे यांनी केली आहे.

इतर अॅग्रो विशेष
`चांद्रयान २' चंद्राच्या कक्षेत दाखलनवी दिल्ली ः भारताची महत्त्वाकांक्षी...
मराठवाड्यात २७ टक्केच पीक कर्जवाटपऔरंगाबाद : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना...
राज्य बँकेची ३५ हजार कोटींची उलाढालमुंबई : अहवाल वर्षात इतिहासात ३५,४४० कोटी इतकी...
नाशिक जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी...नाशिक  : चालू खरीप हंगामात मका पिकावर मोठ्या...
`अतिपावसाने होत्याचं नव्हतं झालं`; पुणे...पुणे ः शेतकरी पाणीटंचाईच्या संकटातून सावरण्याचा...
अपघात विमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील...मुंबई: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा...
राज्यात पूरप्रवण क्षेत्राबाबत संशयकल्लोळपुणे : कृष्णा व गोदावरी नदीच्या खोऱ्यात सतत पूर...
भाजीपाल्याचे आगार उद्ध्वस्तकोल्हापूर/सांगली : ज्या जिल्ह्यांनी संपूर्ण...
‘शेती तिथे रस्ता’ उपक्रमासह...सातारा जिल्ह्यातील पाटण हा डोंगराळ तालुका म्हणून...
कृत्रिम पावसासाठी अखेर विमान उडाले; ३८...औरंगाबाद  : कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी...
पुरामुळे मका पिकाला फटकानवी दिल्ली  ः महाराष्ट्र आणि कर्नाटकात मका...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाज पुणे : कमाल तापमानात वाढ होत असतानाच, बुधवारी (ता...
मंदीचा मारगेल्या वर्षभरापासून आर्थिक मंदीचे चटके देशाला बसत...
समस्यांच्या गर्तेत हरवलेली शेतीकाही वर्षांपूर्वी उत्तम शेती असण्याची अनेक कारणे...
शेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे  : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...
वारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...
मार्केट केंद्रित शेडनेटची उत्कृष्ठ शेती अभ्यासवृत्ती, कायम नवे शिकण्याची आस, बाजारपेठांचा...
जालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...