Agriculture news in Marathi Sugarcane should be included in the Prime Minister's Crop Insurance Scheme | Agrowon

पंतप्रधान पीकविमा योजनेत उसाचा समावेश करावा : सतेज पाटील

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 मे 2020

कोल्हापूर ः पंतप्रधान पीकविमा योजनेत ऊस या पिकाचा समावेश करावा. मात्र, या योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी ऐच्छिक विषय असावा, अशी मागणी पालकमंत्री सतेज पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

कोल्हापूर ः पंतप्रधान पीकविमा योजनेत ऊस या पिकाचा समावेश करावा. मात्र, या योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी ऐच्छिक विषय असावा, अशी मागणी पालकमंत्री सतेज पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यस्तरीय खरीप हंगाम पूर्व बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गुरुवारी (ता. २१) घेतली. या बैठकीत विविध विषयांचा आढावा त्यांनी घेतला. पालकमंत्री श्री. पाटील यावेळी ही मागणी केली.

ऊस तोड यंत्राचा कृषी यांत्रिकीकरण योजनेत अनुदानासाठी समावेश करावा. शेतकऱ्यांना युरिया खताचा सुरळीत पुरवठा होण्यासाठी संबंधित कंपन्यांना आदेश द्यावेत. पंतप्रधान पीकविमा योजनेत ऊस या पिकाचा समावेश करून त्यामध्ये सहभाग होण्यासाठी शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक विषय ठेवावा, अशी प्रमुख मागणीही पालकमंत्री श्री. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या व्हीसीला जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, महावितरणचे अधीक्षक अभियंता अंकुर कावळे उपस्थित होते.


इतर बातम्या
माया आणि छायेची पालवी पुन्हा फुलणार... नाशिक : हल्ली विकासकामांच्या नावाखाली मोठ्या...
नगर जिल्ह्यात ‘निसर्ग'चा शेतीपिकांना...नगर : कोकण आणि मुंबईला तडाखा देणारे निसर्ग...
दापोली, मंडणगडमध्ये बागांना फटकारत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा...
सिंधुदुर्गात पावसाचा जोर ओसरला सिंधुदुर्ग : जिल्ह्याला बुधवारी (ता.३) वादळी...
पुणे जिल्ह्यात ‘निसर्ग’चे थैमान पुणे : निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी (ता.३)...
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत फळबागांना...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...
नाशिक जिल्ह्यात चक्रीवादळामुळे...नाशिक : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात दुपारनंतर...
मॉन्सूनने कर्नाटक किनारपट्टी व्यापली;...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
‘निसर्ग’चा शेतीला मोठा तडाखापुणेः निसर्ग चक्रीवादळामुळे राज्याला वादळी...
कापसाची ३७१ लाख क्विंटल खरेदीनागपूर ः राज्यात आतापर्यंत कापसाची हमीभावाने ३७१....
पुणे जिल्ह्यात पॉलिहाऊसचे मोठे नुकसानपुणेः कोरोना टाळेबंदीमध्ये बाजार समित्यांसह...
कापूस नोंदणीला उद्यापर्यंत मुदतवाढअमरावती ः शासकीय हमीभाव योजनेअंतर्गंत कापूस...
राज्यात गुरांचे बाजार सुरु करण्याचे आदेशअकोला ः कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने...
संकटाच्या मालिका सोसून द्राक्ष हंगामाची...नाशिक: यंदा जिल्ह्यातील द्राक्ष हंगामावर सतत...
लॉकडाउनमध्ये गजबजली ई-चावडीपुणे: शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी सुरू करण्यात...
मॉन्सून कर्नाटकात दाखल, कारवार,...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
‘चक्रीवादळ’ ओसरले; खानदेशासह पश्‍चिम...पुणे : अरबी समुद्रात आलेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ...
जीवनावश्‍यक वस्तू कायदा, मुक्त शेतीमाल...नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत योजनेत जाहीर...
टोळधाड मध्यप्रदेशात, ड्रोन पोचला...नागपूर ः गेल्या दहा दिवसांपासून विदर्भातील...
एक लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले मुंबई: निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान होऊ नये...