Agriculture news in Marathi Sugarcane should be paid at a rate of Rs four thousand ः Raghunath patil | Agrowon

उसाला प्रतिटन चार हजार रुपये दर द्यावा

टीम अॅग्रोवन
शनिवार, 7 डिसेंबर 2019

सातारा : ‘‘उसाला प्रतिटन चार हजार रुपये द्या, दोन कारखान्यांतील अंतराची अट रद्द करा यासह विविध मागण्यांसाठी सांगली येथील शेतकरी हुतात्मा स्मृती परिषद आयोजित केली आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. राज्यातील महाविकास आघाडीने किमान समान कार्यक्रमात संपूर्ण व सरसकट कर्जमाफी करण्याचे आश्‍वासन दिले असून, त्यांनी यू टर्न घेतल्यास त्यांना घरी जावे लागेल,’’ असा इशारा शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी दिला. 

सातारा : ‘‘उसाला प्रतिटन चार हजार रुपये द्या, दोन कारखान्यांतील अंतराची अट रद्द करा यासह विविध मागण्यांसाठी सांगली येथील शेतकरी हुतात्मा स्मृती परिषद आयोजित केली आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. राज्यातील महाविकास आघाडीने किमान समान कार्यक्रमात संपूर्ण व सरसकट कर्जमाफी करण्याचे आश्‍वासन दिले असून, त्यांनी यू टर्न घेतल्यास त्यांना घरी जावे लागेल,’’ असा इशारा शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी दिला. 

सांगली येथील बाजार समितीलगतच्या कल्पतरू मंगल कार्यालयात ता. १२ रोजी दुपारी एक ते सायंकाळी सहा यावेळेत शेतकरी परिषद आयोजित केली आहे. त्याबाबत माहिती देताना ते येथे पत्रकार परिषदेत म्हणाले, ‘‘सरकार बदलले तरी धोरण बदलत नाहीत. राज्यात आघाडी सरकार असून, या पक्षांनी जाहीरमान्यांत सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती. त्यांनी ती पूर्ण करावी. सरकारचे धोरण शेतकऱ्यांचे मरण होत आहे. आयात जास्त होत असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनांना भाव मिळत नाही. परिणामी त्यांना आत्महत्या करावी लागते.’’ 

आपत्ती निवारण कायद्यात दुष्काळ, महापुराचा समावेश करून जिरायत शेतीला एकरी ५० हजार रुपये, बागायत शेतीला एक लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी. गोवंश हत्या बंदी, वन्य जीव संरक्षण, पाळीव प्राण्यांशी निर्दयी वागणूक, आवश्‍यक वस्तू कायदा, भूसंपादन, कमाल जमीन धारणा आदी शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत. सरसकट सर्व शेतकऱ्यांना सर्व कर्जातून वीजबिलातून मुक्‍त करा. शेतकऱ्यांना बाजाराचे, तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. शेतीमाल निर्यात बंदी उठवा, शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिटचे अनुदान मिळाले पाहिजे, आदीसह विविध मागण्यांबाबत परिषदेत चर्चा होणार आहे.

शेट्टींना शेतीतील काही कळत नाही 
राजू शेट्टींना कृषिमंत्री पद मिळण्याबाबत विचारले असता श्री. पाटील म्हणाले, ‘‘त्यांनी देशाचे कृषिमंत्री व्हावे. त्यांना शेतीतील काही कळत नाही. त्यांना कळत असते, तर शरद जोशी यांना त्यांनी सोडले नसते. शेतीतील न कळणारेच कृषिमंत्री होत असतात. केवळ सरकारची धोरणे पुढे नेण्याचे काम करतात.’’ 
 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ४३ हजार...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सांगोल्यात डाळिंब व्यापाऱ्याला पुन्हा...सांगोला, जि. सोलापूर : सांगोल्यातील एका...
विजेबाबतच्या समस्या निकाली काढा : डॉ....बुलडाणा  : विजेच्या बाबत नागरिकांना अनेक...
चाळीसगाव : किसान सन्मानच्या लाभापासून...चाळीसगाव, जि. जळगाव ः शासनाकडून राबविण्यात...
जिल्हा परिषदांचे तलाव मासेमारीसाठी खुले...मुंबई : राज्यातील ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा...
खानदेशात तूर नोंदणीला प्रतिसादजळगाव  ः जिल्ह्यात तूर नोंदणीसंबंधी १०...
नागपूर जिल्ह्यात रब्बीच्या क्षेत्रात...नागपूर : मॉन्सूनोत्तर पावसाने खरीप पिकाचे चांगलेच...
मागासवर्गीयांपर्यंत फडणवीस सरकारच्या...मुंबई: राज्यात गत सरकारच्या कार्यकाळात...
सिंचन प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी निधी...मुंबई : जलसंपदा विभागाचे प्रलंबित प्रकल्प पूर्ण...
औरंगाबादेत पाणीप्रश्‍नावर भाजपचे उद्या...औरंगाबाद : नेहमी दुष्काळाशी सामना करणाऱ्या...
कापूस दर ५१०० वर स्थिर, खेडा खरेदी वाढलीजळगाव  ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
पलटी नांगर योजनेसाठीचा निधी अपुरा जळगाव  ः जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे...
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बॅंकांचे...जळगाव  ः महाविकास आघाडीने जाहीर केलेली...
जामनेरातील टेक्स्टाइल पार्क रखडलेजळगाव ः खानदेशातील कापसावर अधिकाधिक प्रक्रिया...
पुणे जिल्हा परिषद कृषी सभापतिपदी...पुणे : जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य...
पुणे बाजार समितीत कांद्याची विक्रमी ३२५...पुणे ः नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिक...
नियोजनात हिवरे बाजार देशाचे मॉडेल ः डॉ...नगर ः हिवरे बाजार हे दूरदृष्टी नियोजनाचे देशाचे...
वऱ्हाडात रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...अकोला  ः यंदा वऱ्हाडात रब्बीची लागवड बुलडाणा...
राज्यात आर. आर. पाटील स्मार्ट ग्राम...मुंबई : ग्रामविकास विभागामार्फत राज्यात कै. आर....
हृदयविकारामुळे होणारे मृत्यू...मुंबई : हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्याच्या...