खानदेशात रखडले ऊस गाळप

जळगाव : खानदेशात अनेक साखर कारखाने बंद आहेत. फक्त तीन साखर कारखाने सध्या सुरू आहेत. इतर कारखाने तांत्रिक व इतर कारणांमुळे बंद आहेत. रोज सुमारे साडेसात हजार टन ऊस गाळप सुरू आहे.
Sugarcane sifting in Khandesh
Sugarcane sifting in Khandesh

जळगाव : खानदेशात अनेक साखर कारखाने बंद आहेत. फक्त तीन साखर कारखाने सध्या सुरू आहेत. इतर कारखाने तांत्रिक व इतर कारणांमुळे बंद आहेत. रोज सुमारे साडेसात हजार टन ऊस गाळप सुरू आहे. 

नंदुरबार जिल्ह्यात उसाचे क्षेत्र १२ हजार हेक्टर आहे. यापाठोपाठ जळगाव जिल्ह्यात सुमारे नऊ हजार हेक्टरवर ऊस आहे. धुळ्यातही शिरपूर तालुक्यात ऊस चांगला   आहे. यंदा पीक जोमात आहे. परंतु, कारखाने उशिरा सुरू झाले. जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर तालुक्यातील मुक्ताई साखर कारखाना सुरू आहे.

या कारखान्यात रोज सुमारे २८०० टन ऊस गाळप सुरू आहे. जिल्ह्यातील न्हावी (ता.यावल) येथील मधुकर सहकारी साखर कारखाना, चहार्डी (ता.चोपडा) येथील चोपडा सहकारी साखर कारखाना सुरू होण्याची शक्यता धूसर आहे. तर, भोरस (ता.चाळीसगाव) येथील खासगी कारखाना अद्याप सुरू झालेला नाही. 

धुळे जिल्ह्यात शिरपूर येथे एक खासगी कारखाना सुरू झाला आहे. यात रोज ८०० टन ऊस गाळप होत आहे. यंदा प्रथमच शिरपुरात कारखाना सुरू झाला आहे. नंदुरबार जिल्ह्यात तीन कारखाने सुरू होतील. यातील पुरूषोत्तमनगर (ता.शहादा) येथील सातपुडा सहकारी साखर कारखाना सर्वप्रथम सुरू झाला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com