Agriculture news in Marathi, Sugarcane silt season will be prolonged in Satara district | Page 2 ||| Agrowon

सातारा जिल्ह्यात ऊस गाळप हंगाम लांबणार
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

सातारा ः अतिवृष्टी, परतीचा तसेच सध्या सुरू असलेल्या पावसाचा फटका इतर पिकांप्रमाणे ऊस पिकांलाही बसला आहे. पावसामुळे वाढीवर झालेला परिणाम, वाऱ्यामुळे पडलेला ऊस तसेच पिकात साचलेले पाणी यामुळे कारखान्यांकडून हंगामाची तयारी संथ गतीने सुरू आहे. पाऊस थांबल्यास डिसेंबरच्या सुरवातीस हंगाम सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

सातारा ः अतिवृष्टी, परतीचा तसेच सध्या सुरू असलेल्या पावसाचा फटका इतर पिकांप्रमाणे ऊस पिकांलाही बसला आहे. पावसामुळे वाढीवर झालेला परिणाम, वाऱ्यामुळे पडलेला ऊस तसेच पिकात साचलेले पाणी यामुळे कारखान्यांकडून हंगामाची तयारी संथ गतीने सुरू आहे. पाऊस थांबल्यास डिसेंबरच्या सुरवातीस हंगाम सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात आॅगस्टच्या सुरुवातीपासून सुरू झालेल्या अतिवृष्टीमुळे विविध पिकांसह ऊस पिकांची मोठी हानी झाली आहे. कराड, पाटण तालुक्यांसह सातारा, जावळी, वाई तालुक्यांतील नदीकाठच्या ऊस पिके पाण्याखाली राहिल्याने ऊस कुजल्याने वाढीवर परिणाम झाला आहे. या संकटातून बाहेर येत असतानाच परतीचा तसेच अवकाळी पाऊस सुरू असल्याने नोव्हेंबरमध्ये सुरू होणारा हंगाम डिसेंबरच्या सुरुवातीला सुरू होण्याची शक्यता आहे. 

अतिवृष्टीमुळे नद्यांना आलेल्या पुराने तसेच शेतात पाणी साचले होते. या महापुरात आलेल्या व नदीकाठचा ऊस दहा ते १२ दिवस पाण्याखाली राहिले होते. यामुळे अनेक ठिकाणचा ऊस कुजण्याबरोबरच वाढीवर परिणाम झाला आहे. सर्व कारखान्यांची वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्या आहेत. ऊसतोड मजुरांचे करार पूर्ण झाले असले तरी त्यांना अजूनही आणलेले नाही. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे शेतात पाणी कायम आहे. यामुळे ऊस पिकांची तोडणी व वाहतूक करणे शक्य नाही. परिणामी, कारखान्यांकडून हंगामाची कोणत्याही प्रकारची हालचाल केली जात नाही. 

साखर आयुक्तालयाकडून एक डिसेंबरपासून गाळप सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र सध्या परिस्थिती पाहता या तारखेला हंगाम सुरू होण्याची चिन्हे कमी दिसून येत आहेत. एकूणच इतर पिकांप्रमाणे उसाचेही या अति पावसाने नुकसान सुरू आहे. उसाचे नुकसान झाल्याने साखरेचे उत्पादनात मोठी घट होणार आहे. गाळप प्रारंभ एक महिना पुढे गेल्याने गाळपाचा कालावधी लांबणार आहे. कोल्हापूर, सांगली या दोन जिल्ह्यांतील ऊस खराब झाला असल्याने सातारा जिल्ह्यातून जास्त ऊस नेला जाण्याची शक्यता आहे. परिणामी गाळपाचे उद्दिष्ट गाळण्यासाठी उसाची पळवापळवी होणार आहे. 

वाढीव दर मिळण्याची शक्यता  
उसाचे झालेले नुकसान तसेच लागवडीच्या क्षेत्रात झालेली घट यामुळे गाळपास ऊस कमी पडणार आहे. या हंगामात अनेक कारखानदार उसासाठी शेतकऱ्यांच्या दारात जावे लागणार आहे. कारखान्यांला ऊस मिळावा यासाठी इतर कारखान्यांच्या तुलनेत जास्त दर द्यावा लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना जास्त दर मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.    
 

इतर ताज्या घडामोडी
कलिंगडांच्या जनुकीय प्रदेशांचा घेतला...आंतरराष्ट्रीय संशोधकांचा गट कलिंगडाच्या सात...
औरंगाबाद जिल्ह्यात मका खरेदीसाठी दहा...औरंगाबाद : मक्याला किमान आधारभूत किंमत मिळावी,...
सांगली जिल्ह्यात यंदा पावसाची ‘रेकॉर्ड...सांगली : जिल्ह्यात गेल्या २० वर्षातील सर्वाधिक...
युरिया ब्रिकेटची पन्हाळा तालुक्यात शंभर...कोल्हापूर : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन...
परभणीत साडेचार लाख हेक्टरवर पिके वायापरभणी : ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे...
शिरपूर उपबाजारात सोयाबीनची आवक वाढलीशिरपूर, जि. वाशीम  : सलग सुरू असलेला पाऊस...
पणन संचालकपदी कोणाची वर्णी लागणार?पुणे ः शेतमाल विपणनच्या ३०७ बाजार समित्या, ९००...
धक्कादायक ! कांदा नुकसानीच्या...नाशिक  : चालू वर्षी दुष्काळामुळे होरपळून...
अमरावती : रब्बी हंगाम क्षेत्रात होणार...अमरावती ः मॉन्सूनोत्तर पाऊस खरीप पिकांच्या मुळावर...
‘भातकुली’वर पाणीटंचाईचे सावटअमरावती  ः सुरुवातीला उघडीप त्यानंतर...
पुणे विभागात रब्बीचा चार लाख हेक्टरवर...पुणे  ः ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांत...
साताऱ्यात राष्ट्रीयीकृत बँकांकडून...सातारा ः अतिपावसाने शेती क्षेत्राचे कोट्यवधींचे...
पुणे बाजार समितीत ‘ई-नाम’ची अंमलबजावणी...पुणे :  शेतीमालाच्या ऑनलाइन लिलावांतून...
माण तालुक्यात पीक पंचनाम्यांमध्ये...दहिवडी, जि. सातारा  : पावसाने जोरदार तडाखा...
राज्यात अखेर राष्ट्रपती राजवटमुंबई ः चौदाव्या विधानसभेसाठी कोणत्याच...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस...कोल्हापूर  : यंदाच्या प्रतिकूल परिस्थितीच्या...
विमा प्रतिनिधी शोधताना शेतकऱ्यांची दमछाकयवतमाळ ः मॉन्सूनोत्तर पावसाने झालेल्या...
‘बुलबुल’ प्रभावित शेतकऱ्यांना मदत जाहीरभुवनेश्‍वर, ओडिशा:  राज्याला बुलबुल...
तण निर्मूलनातून तण व्यवस्थापनाकडेवास्तविक तण विज्ञानाचा संबंध विविध कृषी शाखांशी...
जळगावात कोबी १८०० ते ३००० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...