नगर, नाशिकमधील १५ साखर कारखान्यांकडून २२ लाख टनावर गाळप

Sugarcane sluggish at 22 lakh tonnes from 15 sugar factories in Nagar, Nashik
Sugarcane sluggish at 22 lakh tonnes from 15 sugar factories in Nagar, Nashik

नगर : नाशिक विभागामध्ये यंदा आतापर्यंत १५ साखर कारखान्यांनी सुमारे २२ लाख १८ हजार ६२५ मेट्रीक टन उसाचे गाळप केले असून आतापर्यंत २० लाख ३५ हजार ७५५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.

नगर, नाशिक जिल्ह्यांमध्ये यंदा ऊसटंचाईचा मोठा फटका बसला असून विभागातील तब्बल सतरा कारखाने बंद आहेत. ऊस गाळप आणि साखर उत्पादनात खासगी कारखान्याचाच बोलबाला आहे. सर्वाधिक ऊस गाळप आणि साखर उत्पादन अंबालिका, गंगामाई कारखान्याने केले आहे.  

नगर, नाशिक जिल्ह्यांमध्ये गेल्यावर्षी दुष्काळाचा तर यंदा अतीपावसाचा फटका बसला. दोन वर्षांपासून टंचाईला समारे जावे लागले. शिवाय हुमनी आळी अतीवृष्टी व अन्य कारणाने उसाचा आणि साखर कारखान्याचा जिल्हा म्हणून राज्यात ओळख असलेल्या नगरमध्ये  ऊसाच्या क्षेत्रात मोठी घट झाली. नगर जिल्ह्यामध्ये सहकारी आणि खासगी मिळून सुमारे २३ तर नाशिक जिल्ह्यामध्ये नऊ असे ३२ साखर कारखाने आहेत. गेल्या दोन वर्षांत झालेल्या ऊसक्षेत्राच्या घटीचा कारखान्याच्या गाळप हंगामावर परिणाम झाला आहे. त्यामुळे यंदा नगर जिल्ह्यामध्ये २३ पैकी १० कारखाने बंद आहेत तर नाशिक जिल्ह्यामध्ये नऊपैकी सात कारखाने बंद आहेत.

विभागात आतापर्यंत सुरू असलेल्या १५ साखर कारखान्यांनी सुमारे २२ लाख १८ हजार ६२५ मेट्रीक टन उसाचे गाळप केले असून आतापर्यंत २० लाख ३५ हजार ७५५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. त्यात नगर जिल्ह्यामध्ये २० लाख लाख २७ हजार ६०४ टन उसाचे गाळप केले असून १८ लाख ४२ हजार २१० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. आतापर्यंत अंबालिका कारखान्याने सर्वाधिक ४,११,८६० उसाचे गाळप आणि ३,६३,१५० क्विंटल साखरेचे गाळप केले आहे. गंगामाई कारखान्याने  २,७२,१८० टन उसाचे तर २,४३,३०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. 

उसाचे गाळप, (टन) कंसात साखरचे उत्पादन (क्विंटल)  

संजीवनी ः १,३५,७९८ (१,१६,९७५), शंकरराव काळे ः १,३२,८८५ (१,२८,५००), अशोक ः १,०५,२९० (९२,९००), डॉ. विठ्ठलराव विखे पाटील प्रवरा ः १,१९,७५० (१,१५,४००) भाऊसाहेब थोरात ः २,६३,१५० (२,५३,०५०), ज्ञानेश्वर ः २,३३,५५५ (२,१३,७००), वृद्धेश्वर ः ५७,३४० (४३९५०), मुळा ः १,१३,३२० (९६,२००),  अगस्ती ः १२६०१९ (१२६७१०), क्रांतीशुगर पारनेर ः ४२,९४५ (४२०२५), अंबालिका (राशीन) ः ४,११,८६० (३,६३,१५०), गंगामाई ः २,७२,१८० (२,४३,३००), युटेक शुगर नगर ः ११,७२० (६,२५०) कादवा (नाशिक) ः ५९,५०५ (६३,८७५), द्वारकाधीश ः १,३१,५१५ (१,२९,७७०)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com