Agriculture news in marathi The sugarcane stands in the farm in Chapoli | Agrowon

रसवंतीसाठी लावलेला ऊस शेतातच उभा

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 14 एप्रिल 2020

फेब्रुवारी महिन्यापासून रसवंती व्यवसाय चांगला चालतो. मात्र, सध्या लॉकडाऊनमुळे रसवंती गृह बंद पडले. आता शेतातील उसाचे काय करायचे, हेच कळत नाही. उभ्या उसाकडे पाहिल्यावर डोळ्यात पाणी येत आहे. 
- नारायण काचे, रसवंतीगृह चालक शेतकरी 

चापोली, लातूर (प्रतिनिधी) : उन्हाळा सुरु झाला की रसवंतीगृहांवर दिवसभर गर्दी पहावयास मिळते. त्यामुळे येथील काही बेरोजगार तरुण दरवर्षी हा व्यवसाय सुरु करतात. मात्र, ‘कोरोना’चा देशात शिरकाव झाला आणि लाकडाऊन जाहीर झाला. त्यामुळे ग्रामीण भागातील रसवंतीसह इतर व्यवसाय बंद पडले. रसवंतीसाठी लागवड केलेला ऊस सध्या शेतातच उभा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. 

येथील नारायण काचे व त्याचे कुटुंबीय गेल्या पाच, सहा वर्षांपासून शेतात एक एकरवर उसाची लागवड करतात. ऊस कारखान्याला न देता त्याचे मूल्यवर्धन करून अधिक नफा मिळवण्यासाठी त्याचा रसवंतीसाठी ते उपयोग करतात. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जवळ महामार्गाशेजारील आमराईत त्यांनी स्वतःचे रसवंती गृह सुरु केले आहे. दाट सावली असल्याने प्रवाशी वाहने थांबवून ताज्या रसाचा आस्वाद घेत होते. चापोली येथील ग्रामस्थही सायंकाळच्या वेळेला रसाचा आस्वाद घेण्यासाठी येथे येतातच. मात्र, यंदा हंगाम सुरु होण्याअगोदरच पडला. 

काचे यांनी जून महिन्यात उसाची लागवड केली होती. यासाठी त्यांना साधारण ६० हजार रुपयांचा खर्च आला. त्यांना दरवर्षी फेब्रुवारी ते जून या पाच महिन्यात साधारण चार ते पाच लाखाचे उत्पन्न रसवंती गृहातून मिळते. नारायण स्वतः त्याचे वडील व दोन भाऊ काम तिथे करतात. मात्र लॉकडाऊनमुळे हा व्यवसाय बंद पडला आहे.

सध्या ऊस तोडणीस आला आहे. लॉकडाऊनमुळे आता उसाचे काय करायचे, असा एकच प्रश्न त्यांच्यासमोर आहे. काचे यांच्या प्रमाणेच शेतमालाचे मूल्यवर्धन करणाऱ्या असंख्य शेतकऱ्यांचे ‘कोरोना’मुळे आर्थिक गणितच बिघडल्याचे चित्र आहे. 

 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
नगर जिह्यात पावसाने पिकांचे अतोनात...नगर  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात...
सोनी गावामध्ये आहेत २८८ शेततळीसोनी (ता. मिरज,जि.सांगली) या गावात  कृषी...
कर्नाळा बँकेत ३६ ग्रामपंचायतींचे पैसे...मुंबई : ‘शेकाप’चे माजी आमदार विवेक पाटील यांच्या...
मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द...औरंगाबाद : मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी...
केंद्राच्या कांदा निर्यातबंदी विरोधात...नाशिक : केंद्र सरकारने कुणाचीही ओरड नसताना, अन्न...
औरंगाबादमधील नुकसानग्रस्त पिकांचे...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान...
खानदेशातील पपई पिकाला अतिपावसाचा फटकाजळगाव : खानदेशात पपई पिकाला अतिपावसाचा फटका बसला...
नांदेडमध्ये ३८ हजार हेक्टर पिकांचे...नांदेड : अतिवृष्टी व पूरामुळे जिल्ह्यातील ३८१...
‘म्हैसाळ’मधून पावणेदोन टीएमसी पाणी उचललेसांगली  ः कृष्णा नदीला आलेल्या पूराचे पाणी...
कांदा निर्यातबंदीविरूध्द कॉंग्रेसचे...रत्नागिरी : कांदा निर्यातीबाबतचा निर्णय...
मुसळधार पावसामुळे पिके भुईसपाटपुणे ः राज्यातील अनेक भागांत कमीअधिक स्वरूपात...
पानपिंपरी पिकाला विम्याचे कवच द्याअकोला ः जिल्ह्यात पानपिंपरी या वनौषधीवर्गीय...
सीमाभाग आणि बंदरातील कांदा सोडा; अन्यथा...नाशिक : टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शेजारील...
कोल्हापुरात ‘गोकूळ’चे दूध रोखण्याचा...कोल्हापूर : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या...
शरद पवार यांनी ऊसतोड कामगारांची कोंडी...नगर ः ऊसतोडणी कामगारांच्या तोडणी दरात वाढ करावी...
फळबाग लागवडीसाठी जमिनीची निवड महत्त्वाचीसामान्यपणे फळबागा अयशस्वी होण्यामध्ये किंवा...
बियाणासाठी घरचे सोयाबीन ठेवताना...बियाण्यासाठी निवड करण्यात आलेल्या प्लॉटमध्ये...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...
पुणे जिल्ह्यात दोन लाखावर शेतकऱ्यांना...पुणे : जिल्हा बॅंकेकडून खरीप हंगामासाठी गेल्या...