कोल्हापुरातील पश्‍चिम भागात ऊसतोडणी सुरू

कोल्हापुरातील पश्‍चिम भागात ऊसतोडणी सुरू
कोल्हापुरातील पश्‍चिम भागात ऊसतोडणी सुरू

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसतोडीसाठी १५ डिसेंबरची मुदत देऊन तोडणीला या कालावधीपर्यंत अडथळे आणणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे साखर कारखानदारांचा गळीत सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला. ‘स्वाभिमानी’च्या परिषदेनंतर जिल्ह्यातील पश्‍चिमेकडील काही कारखान्यांची ऊसतोडणी रविवारपासून (ता. २४) सुरू झाली. परंतु, पूर्वेकडील कारखान्यांच्या पट्ट्यात मात्र शांतताच होती.

ऊस परिषदेपूर्वी जिल्ह्यातील दोन ते तीन कारखान्यांनी तोडणी सुरू केली होती. परंतु ‘स्वाभिमानी’ने आंदोलन केल्यानंतर या कारखान्यांनीही तोडणी बंद ठेवली. शनिवारी ऊस परिषद झाल्यानंतर कारखान्यांनी गळिताची तयारी सुरू केली. ज्या कारखान्यांनी अद्याप गळीत हंगाम सुरू केलेला नाही, त्यांच्या तयारीला मात्र वेग आला आहे. येत्या दोन दिवसांत बहुतांशी साखर कारखाने सुरू होतील, अशी शक्‍यता आहे. पश्चिमेकडील साखर कारखान्यांनी अंदाज घेऊन रविवारी दुपारनंतर ऊसतोडणी सुरू करण्याला प्राधान्य दिले. 

‘स्वाभिमानी’ने पूरबाधित ऊस अगोदर तोडा, असा इशारा दिल्याने आता कारखान्यांना क्रमपाळीत बदल करून ऊस तोडावा लागणार आहे. यामुळे ऊसतोडणी सुरू होण्याचा मार्ग सुकर झाला असला, तरी पूरबाधित ऊस तोडणीवरून शेतकरी व कारखानदारांमध्ये काही काळ संघर्ष सुरू राहण्याची शक्‍यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com