ऊस वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करा ः साखर आयुक्त

sugarcane vehicles Follow the traffic rules
sugarcane vehicles Follow the traffic rules

पुणे ः चालू वर्षी पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन जवळपास एक महिला उलटला आहे. हंगामात कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात राष्ट्रीय व इतर मार्गावरून कारखान्याला लागणारा ऊस, ट्रक, बैलगाडी, ट्रॅक्टर व इतर वाहनाद्वारे उसाची वाहतूक केली जाते. वाहतूक करत असताना वाहनधारक बेशिस्तपणे वाहतूक व नियम न पाळल्यामुळे अनेकांचा बळी जातो. त्यामुळे कारखान्यांच्या परिसरामध्ये वाहतुकीमध्ये अपघात होऊ नयेत म्हणून नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी साखर कारखान्यांना दिले आहेत.

श्री. गायकवाड म्हणाले, की साखर कारखान्यांच्या गळीत सुरू होऊन एक ते दीड महिना झालेला आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर, ट्रेलर व इतर वाहनचालकांनी वाहन चालवताना मिळालेल्या परवान्याची (लायसन्स) मूळ प्रत जवळ ठेवलीच पाहिले. ऊस वाहतूक करताना ट्रॅक्टरचे एकावेळी दोन पेक्षा जास्त ट्रेलरने वाहतूक करू नये. ट्रेलर, वाहनाची एकत्रित लांबी अठरा मीटरपेक्षा जास्त असता कामा नये. ऊस वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांच्या पाठीमागील बाजूस चार बाय चारचे रिफ्लेक्टेड बोर्ड बसविणे गरजेचे आहे. ऊस वाहतूक करताना ट्रॅक्टर, ट्रेलर, बैलगाडी वाहनांना महामार्गावरून जात असताना ज्या मार्गावर सर्व्हिस रोड आहे, तेथे सर्व्हिस रोडचा वापर करण्यासाठी कारखान्यांनी सूचना दिल्या पाहिजेत. ऊस वाहन नेत असताना ट्रॅक्टरचालकाने वेगमर्यादा पाळावी, अशा कडक सूचना सर्व कारखान्यांना दिल्या आहेत.

शेतकरी संघटनेकडून काटामारीच्या तक्रारी  गळीत हंगामामध्ये साखर कारखान्याकडून वजनकाटा मारला जात असल्याच्या तक्रारी शेतकरी व शेतकरी संघटनेकडून साखर आयुक्तालयाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, म्हणून त्यावर नियंत्रण आणण्यासाठी साखर कारखान्यांच्या वजन काटे तपासणीसाठी भरारी पथकांची स्थापना करण्यात यावे. असे लेखी पत्र राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना साखर आयुक्तालयाने दिले आहेत. भरारी पथकांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रतिनिधी हे प्रमुख असणार आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाचे प्रतिनिधी, प्रादेशिक सहसंचालक कार्यालयातील प्रतिनिधी, शेतकरी प्रतिनिधी व जिल्हा वैधमापन शास्त्र अधिकारी सदस्य सचिव पथकांमध्ये समाविष्ट असणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com