‘वसाका’ला उसाचे टिपरू तोडू देणार नाही, ऊस उत्पादक संघर्ष समितीचा इशारा

Sugarcane will not break, warning of sugarcane growers committee
Sugarcane will not break, warning of sugarcane growers committee

नाशिक : ‘‘नाशिक जिल्ह्यातील कादवा व द्वारकाधीश या कारखान्याचा अपवाद वगळता इतर साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांना किमान आधारभूत किंमत न दिल्यामुळे ऊस उत्पादकांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे वसंतदादा साखर कारखान्याला दिलेल्या उसाची बाकी रक्कम मिळत नाही तोपर्यंत उसाचे टिपरू तोडू दिले जाणार नाही,’’ असा इशारा नाशिक जिल्ह्यातील ऊस उत्पादक संघर्ष समितीने दिला आहे. 

देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील वसंतदादा सहकारी साखर कारखान्याला ऊस पुरवठा केला. हा कारखाना धाराशीव साखर करखान्याने भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी घेतला आहे. त्यास ऊस पुरवठादारांनी ऊस दिला. त्यापोटी फक्त २००० रुपये अदा केलेले आहे. उर्वरित ३७१ रुपये बाकी असून ते अद्यापही अदा केले नाही. याच कारणाने जो पर्यंत थकित आहेत. ही रक्कम मिळण्यासाठी ऊस उत्पादकांनी मोठा संघर्ष केला होता.

साखर आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागितली होती. त्यानुसार धाराशिव कारखाना प्रशासनावर कार्यवाही करत साखर व मळी जप्त करून उस उत्पादकांना ऊस बिल अदा केले होते. बाकी असलेले ऊस बिल अदा करत नाही तोपर्यंत वसाकाला उसाचे टिपरूही तोडू दिले जाणार नाही, असा निर्धार ऊस उत्पादक संघर्ष समितीने व्यक्त केला आहे. याबाबत ऊस उत्पादक संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रभाकर पाटील व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदस्य कुबेर जाधव यांनी माहिती दिली. 

ऊस परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन

येत्या २३ तारखेला महाराष्ट्रातील ऊस दरासंर्दभात महत्त्वाची परिषद स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आयोजित केली आहे. महाराष्ट्रातील चारही विभागातील सहकारी खासगी कारखान्यांना ऊस उत्पादकांना किमान आधारभूत किंमतही काही अपवाद वगळता अदा केलेली नाही, उत्तर महाराष्ट्रातील अनेक कारखान्यांनी एफआरपी पूर्ण अदा केलेली नाही. फक्त १८०० ते २००० फक्त अदा करून ऊस उत्पादंकाच्या तोंडाला काळे फासले आहे. यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्ह्यातील ऊस उत्पादक संघर्ष समितीने केले आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com