Agriculture news in Marathi Sugarcane workers stranded in Solapur will go to their native village | Agrowon

सोलापुरात अडकलेले ऊसतोड कामगार जाणार मूळगावी 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 एप्रिल 2020

सोलापूर ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनमुळे जिल्ह्यातील साखर कारखान्यावर अडकून पडलेल्या कामगारांना त्यांच्या मूळगावी पाठवण्याची प्रशासनाने प्रक्रिया सुरू केली आहेत. सुमारे २५०० एवढे कामगार जिल्ह्यात अडकले असून, त्यात सर्वाधिक १४७६ कामगार माळशिरस तालुक्यात आहेत. 

सोलापूर ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनमुळे जिल्ह्यातील साखर कारखान्यावर अडकून पडलेल्या कामगारांना त्यांच्या मूळगावी पाठवण्याची प्रशासनाने प्रक्रिया सुरू केली आहेत. सुमारे २५०० एवढे कामगार जिल्ह्यात अडकले असून, त्यात सर्वाधिक १४७६ कामगार माळशिरस तालुक्यात आहेत. 

जिल्ह्यात सर्वाधिक ३३ साखर कारखाने आहेत. त्यापैकी यंदा ८ ते १० कारखानेच सुरू राहिले. पण कोरोनामुळे जाहीर झालेल्या लाॅकडाऊनमुळे कारखान्याच्या कामामध्ये अडथळे आलेच. पण ऊसतोडही थांबली. परिणामी, राज्याच्या विविध भागातून आलेले ऊसतोड कामगारही अडकले. राज्य शासनाने नुकताच यासंबंधी आदेश काढून या कामगारांना त्यांच्या मूळगावी पाठवण्याचे आदेश दिले आहेत. 

त्यानुसार प्रशासन व्यवस्था करीत आहे. सुमारे २५०० कामगार जिल्ह्यात अडकले आहेत. त्यात मंगळवेढा तालुक्यात ४८, सांगोला १९९, माळशिरस १४७६, करमाळा ३६७, माढा २५०, पंढरपूर १६४ ऊसतोड कामगार आहेत. याशिवाय इतर राज्यातील स्थलांतरित मजूरही सोलापुरात अडकले आहेत, त्यांचा निर्णय शासन व प्रशासनस्तरावर कधी घेणार हा प्रश्न प्रलंबितच आहे. सध्या त्या-त्या जिल्हाधिकाऱ्यांशी प्रशासनाचे बोलणे सुरू आहे. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना त्यांची गावनिहाय यादी सादर केली जात आहे. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी मिळताच या सर्व मजुरांना त्यांच्या मूळगावी पाठविण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. 

कामगारांची व्यवस्था चोख 
जिल्ह्यात अडकलेल्या ऊसतोड कामगारामध्ये बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, नगर, जालना, औरंगाबाद, नाशिक, धुळे, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यातील कामगारांचा समावेश आहे. त्या-त्या कारखान्यावर तसेच अन्य ठिकाणी या सर्व कामगारांची निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांना तशी अडचण नाही, पण मूळगावी पाठवण्याची त्यांची मागणी लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला आहे. 


इतर ताज्या घडामोडी
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
राज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...