नवीन कृषी अवजारांसाठी उद्योजकांच्या सूचना ठरतील उपयुक्त : कुलगुरू डॉ. ढवण,

Suggestions of entrepreneurs for new agricultural implements will be helpful: VC Dhawan
Suggestions of entrepreneurs for new agricultural implements will be helpful: VC Dhawan

परभणी : ‘‘मजुरांच्या समस्येमुळे शेतीकामांसाठी अडचणी येत आहेत. शेती कामे वेळेवर करण्यासोबतच उत्पादन खर्च कमी करण्यासाठी कृषी यांत्रिकीकरणांवर भर देण्याची गरज आहे. कृषी अवाजारेनिर्मिती करणाऱ्या उद्योजकांनी नवनवीन यंत्रे विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्‍या सूचना उपयुक्त ठरतील,’’ असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी केले.

सोमवारी (ता. १०) कृषी यांत्रिकीकरण दिनानिमित्त सुधारित कृषी अवजारे व अपारंपरिक ऊर्जा साधने प्रदर्शन व प्रात्यक्षिक कार्यक्रम घेण्यात आला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वित प्रकल्पांतर्गत बैल शक्तीचा योग्य वापर योजनेतंर्गंत हा कार्यक्रम झाला.

संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, कुलसचिव रणजित पाटील, प्रगतिशील शेतकरी चंद्रकांत देशमुख वरपुडकर, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय खोडके, संशोधन अभियंता डॉ. स्मिता सोळंकी आदी उपस्थित होत्या. 

डॉ. ढवण म्हणाले, ‘‘शेतीतील मनुष्यबळ कमी होत आहे. मजुरांची समस्या आहे. त्यावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांच्या गरजेवर आधारित कृषी अवजारांचे संशोधन करणे आवश्यक आहे.’’ वरपुडकर म्हणाले, ‘‘रुंद वरंबा सरी पद्धतीने पेरणीसोबत शेतकऱ्यांनी सुधारित बियाण्यांचा वापर केल्यास उत्पादनात वाढ होते.’’ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com