सुहास दिवसे नवे कृषी आयुक्त; सच्चिंद्र प्रतापसिंह वखारचे एमडी

सुहास दिवसे नवे कृषी आयुक्त; सच्चिंद्र प्रतापसिंह वखारचे एमडी
सुहास दिवसे नवे कृषी आयुक्त; सच्चिंद्र प्रतापसिंह वखारचे एमडी

पुणे : राज्याच्या कृषी आयुक्तपदी वखार महामंडळाचे कार्यकरी संचालक एस. के. दिवसे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रतापसिंह यांची राज्य वखार महामंडळाच्या कार्यकारी संचालक पदी नियुक्ती करण्यात आली असून तत्काळ पदभार स्विकारण्याची सूचन अप्पर मुख्य सचिव (सेवा) यांनी केली आहे. अकोला जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी के. एस. पागेरे यांची मुंबई नियंत्रक सार्वजनिक पुरवठा आणि संचालक सार्वजनिक वितरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कोकण विभागाचे उपायुक्त एस. बी. वारभुवन यांची महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या सदस्य सचिवपदी नियुक्त करण्यात आली आहे. तसेच कोकण अतिरिक्त विभागीय आयुक्त एच. एस. सोनावणे यांची राज्य कृषीच्या सहसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

यवतमाळ जिल्हयात शेतकरी आत्महत्या नियंत्रणासाठी अनेक प्रभावी उपक्रम सचिंद्र प्रताप सिंह जिल्हाधिकारी असतानाच्या काळात राबविण्यात आले होते. त्याची दखल घेत यवतमाळ जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची थेट राज्याच्या कृषी आयुक्‍तपदी नियुक्‍ती करण्यात आली. या नियुक्‍तीला तीन वर्ष देखील झाली नसताना पुन्हा त्यांच्या बदलीचे आदेश निघाले आहेत. त्यांच्या जागेवर राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष सुहास दिवसे यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. सुहास दिवसे यांनी देखील विदर्भात काम केले असून ते भंडारा जिल्हाधिकारी होते. सुहास दिवसे हे कृषी पदवीधर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com