agriculture news in Marathi, Suhas Diwase says, mix crop should be taken in emergency, Maharashtra | Agrowon

आपत्कालीन परिस्थितीत मिश्र पिके घ्याः सुहास दिवसे
टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 जुलै 2019

पुणे ः यंदा चांगल्या पावसाची प्रतीक्षा होती, तरीही राज्यातील अनेक भागांत अजूनही जोरदार पाऊस झालेला नाही. काही भागांत पावसाने ओढ दिली आहे. यामुळे अनेक भागांत पेरण्या होऊ शकल्या नाहीत. खरीप हंगामात शेतकऱ्यांनी येत्या ३१ जुलैपर्यंत पेरणी करावयाची असल्यास कृषी विद्यापीठांच्या शिफारशीप्रमाणे मिश्र पिके घेण्यात यावीत, असे आवाहन कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी केले. 

पुणे ः यंदा चांगल्या पावसाची प्रतीक्षा होती, तरीही राज्यातील अनेक भागांत अजूनही जोरदार पाऊस झालेला नाही. काही भागांत पावसाने ओढ दिली आहे. यामुळे अनेक भागांत पेरण्या होऊ शकल्या नाहीत. खरीप हंगामात शेतकऱ्यांनी येत्या ३१ जुलैपर्यंत पेरणी करावयाची असल्यास कृषी विद्यापीठांच्या शिफारशीप्रमाणे मिश्र पिके घेण्यात यावीत, असे आवाहन कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी केले. 

आपत्कालीन पीक नियोजनाबाबत कृषी आयुक्त दिवसे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी आयुक्तालयात सोमवारी (ता. २२) बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये आयसीएआर वरिष्ठ शास्त्रज्ञ के. व्ही. राव, डॉ. के. गोपीनाथ, कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. जाधव, डॉ. आसेवार, कृषी संचालक विजय घावटे, प्रक्रिया व नियोजन विभागाचे संचालक, अनिल बनसोडे, विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल आदि उपस्थित होते. या बैठकीमध्ये सध्याचे पाऊसमान व पीक परिस्थितीबाबत जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला. त्यानुसार पुढील काळात पेरणी करण्याबाबत पुढीलप्रमाणे संदेश देण्यात आला आहे.

श्री. दिवसे म्हणाले की, की येत्या दोन ते चार दिवसांत हवामान विभागाने चांगल्या पावसाचा अंदाज दिला आहे. या कालावधीत चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. तरीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास शेतकऱ्यांनी संकरीत  बाजरी, सूर्यफुल, सोयाबीन अधिक तूर, बाजरी अधिक तूर, एरंडी अधिक धने अशी मिश्र पिके घ्यावीत.
 
तसेच एक ते १५ ऑगस्ट या दरम्यान एरंडी, तीळ, संकरीत बाजरी, रागी, सूर्यफुल, एरंडी अधिक धने अशी मिश्र पिके घ्यावीत. तर १६ ते ३१ ऑगस्ट दरम्यान पेरणी करावयाची असल्यास संकरीत बाजरी, सूर्यफुल, तूर व एरंडी अधिक धने अशी मिश्र पिके घ्यावीत. तसेच यापुढील कालावधीत कापूस, ज्वारी, भुईमूग या पिकाची पेरणी करू नये. ज्या ठिकाणी पेरणी झाली आहे. पण पावसाने ओढ दिली आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी कोळपणी करावी. तसेच पाणी उपलब्ध असल्यास संरक्षित पाणी द्यावे.

इतर अॅग्रो विशेष
बागलाण तालुक्यात पूर्वहंगामी...नाशिक ः पूर्वहंगामी अर्ली द्राक्ष उत्पादनासाठी...
नांदेड, परभणी जिल्ह्यात गुलाबी बोंड...परभणी: परभणी, नांदेड जिल्ह्यांतील बीटी कपाशीवरील...
राज्यात पावसाची उघडीपपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला मुसळधार...
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील ऊस...कोल्हापूर : साखर कारखाने म्हटले की सर्वांच्या...
परभणी दुग्धशाळेतील संकलनात सव्वादोन लाख...परभणीः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील...
आवळा प्रक्रिया उद्योगातून बनविली ओळखजाचकवस्ती (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील सुमन...
फळबागेतून शेती केली किफायतशीरकनका बुद्रुक (ता. मेहकर, जि. बुलडाणा) शिवारात...
युवा शेतकऱ्याने केले यशस्वी ब्रॉयलर...लातूर जिल्ह्यातील हडोळती येथील महेश गोजेवाड या...
मराठवाड्यातील खरिपावर संकटाचे ढग गडदऔरंगाबाद : गेल्या हंगामात दुष्काळाने पिचलेल्या...
दक्षिण महाराष्ट्रात उसाचे वैभव लयालाकोल्हापूर/सांगली : पंचगंगा, कृष्णा, वारणा,...
तीन लाखाची लाच घेताना नाशिक बाजार...नाशिक: नाशिक  कृषी उत्पन्न बाजार...
कातळावर लिली; तर टायरमध्ये फुलला...रत्नागिरी जिल्ह्यातील मेर्वी येथील प्रगतिशील...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यतापुणे ः पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब...
कोल्हापूरमध्ये पुरात घट, धरणातून विसर्ग...कोल्हापूर  : जिल्ह्यातील पुराची परिस्थिती...
ग्लायफोसेट तणनाशक कर्करोगकारक नाही :...वॉश्‍गिंटन : ग्लायफोसेट हे तणनाशक मानवास कर्करोग...
ऑगस्ट महिन्यातही पाणीटंचाई कायम; २ हजार...पुणे : पावसाने दमदार हजेरी लावल्याने कोकण,...
पिंपळगावकरांनी भाजीपाला शेतीतून साधली... बीड जिल्ह्यात अहमदनगर- अहमदपूर राज्य...