बीडमध्ये सव्वादोन दिवसाला एका शेतकऱ्याची आत्महत्या

कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलेला आहे. निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांना अनेकवेळा शासनाच्या दप्तरदिरंगाईचाही फटका सहन करावा लागतो. यामुळेच शेतकरी जगण्यापेक्षा मरण जवळ करतोय. जिल्ह्यात दर सव्वादोन दिवसाला एका शेतकऱ्याने मरणाला कवटाळल्याचे आकडेवारीवरून दिसते.
बीडमध्ये सव्वादोन दिवसाला एका शेतकऱ्याची आत्महत्या
बीडमध्ये सव्वादोन दिवसाला एका शेतकऱ्याची आत्महत्या

बीड : कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलेला आहे. निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांना अनेकवेळा शासनाच्या दप्तरदिरंगाईचाही फटका सहन करावा लागतो. यामुळेच शेतकरी जगण्यापेक्षा मरण जवळ करतोय. जिल्ह्यात दर सव्वादोन दिवसाला एका शेतकऱ्याने मरणाला कवटाळल्याचे आकडेवारीवरून दिसते.

जानेवारी ते नोव्हेंबर २०२० या ११ महिन्यांत तब्बल १६० शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची नोंद शासन दरबारी झाली आहे. यातील ६७ प्रकरणे प्रशासनाने निकाली काढली असून ५०  आत्महत्या मदतपात्र नसल्याचा शेरा मारला गेला आहे.

बीड जिल्ह्यात माजलगाव, मांजरा असे मोठे सिंचन प्रकल्प बोटावर मोजण्याऐवढेच आहे. गोदावरी, सिंदफणा नद्यांसह पैठणचा उजवा कालवा जिल्ह्यातील काही भागांतून गेलेला असला तरी वीज पुरवठा असेल याचीही खात्री नाही. त्यामुळे फळबागा, बागायती, भाजीपाला असे क्षेत्रही अत्यल्प आहे. नऊ लाखांवर शेतकरी संख्या असलेल्या जिल्ह्यातील बहुतांशी शेतकरी मोसमी शेतीवरच अवलंबून असतात.

दरम्यान, जिल्ह्यात कोरडा दुष्काळ अनेक वेळा तर ओला दुष्काळही अधूच मधून पिच्छा पुरवीत असतो. सरत्या खरीप हंगामात तर सुरुवातीला चांगला पाऊस झाला. पण सोयाबीनचे बियाणे बोगस निघाल्याने उगवणच झाली नाही. नंतर सलग तीन वेळा परतीच्या अतिवृष्टीने झोडपले आणि थोडेबहुत हाती आलेले पीकही वाया गेले. एकीकडे निसर्गाचे दुष्टचक्र असतानाच पुन्हा पंचनाम्यांत दिरंगाई, मदत  मिळण्यास उशीर अशीही आडकाठी शेतकऱ्यांसमोर असते. पिकलेले वेळेत विकण्यासाठी हमीभाव केंद्र लवकर सुरु होत नाहीत.

दरम्यान, या सगळ्या दुष्टचक्रामुळे आर्थिक विवंचनेतील शेतकरी मरणाकडे वळत असल्याचे चित्र आहे. मागच्या पाच वर्षांत मराठवाड्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्या. यंदाच्या सरत्या वर्षात तर दर सव्वादोन दिवसांनी एका शेतकऱ्याने मरण जवळ केले आहे. जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांत तब्बल १६० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद शासन दप्तरी झाली आहे. म्हणजे एक दिवस आड जाताच एक शेतकरी आत्महत्या झाल्याचे आकडेवारीतून दिसते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com