agriculture news in marathi In suitable water in Marathwada 19% decline in two months | Agrowon

मराठवाड्यात उपयुक्‍त पाण्यात दोन महिन्यांत १९ टक्‍के घट

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 मार्च 2021

औरंगाबाद : मराठवाड्यातील प्रकल्पांमधील उपयुक्‍त पाणीसाठा झपाट्याने घटतो आहे. २२ जानेवारीअखेरच्या तुलनेत २२ मार्च अखेर ८७६ प्रकल्पांमधील उपयुक्‍त पाणीसाठा १९ टक्‍क्‍यांनी घटला आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील प्रकल्पांमधील उपयुक्‍त पाणीसाठा झपाट्याने घटतो आहे. २२ जानेवारीअखेरच्या तुलनेत २२ मार्च अखेर ८७६ प्रकल्पांमधील उपयुक्‍त पाणीसाठा १९ टक्‍क्‍यांनी घटला आहे,  अशी माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली. 

मराठवाड्यात मोठ्या, मध्यम, लघू प्रकल्पांसह गोदावरी, तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील बंधारे मिळून ८७६ प्रकल्प आहेत. या प्रकल्पांचा संकल्पित पाणीसाठा क्षमता ८१७९.७७ दलघमी इतकी आहे. २२ मार्चअखेरच्या अहवालानुसार मराठवाड्यातील प्रकल्पांमध्ये सरासरी ४६८१.७४ दलघमी उपयुक्‍त पाणी शिल्लक आहे. जो संकल्पित पाणीसाठ्याच्या तुलनेत ५७.२४ टक्‍केच आहे. हा उपयुक्‍त पाणीसाठा २२ जानेवारीअखेर ७६.५३ टक्‍के इतका होता. जवळपास १९. २९ टक्‍क्‍यांची घट उपयुक्‍त पाणीसाठ्यात नोंदली गेली आहे. 

२२ जानेवारीअखेर तसेच २२ मार्चअखेर प्रकल्पांत शिल्लक उपयुक्त पाणीसाठ्याचा विचार करता ११ मोठ्या प्रकल्पांतील उपयुक्‍त पाणीसाठा ८४.५४ टक्‍क्‍यांवरून ६७.७६ टक्‍यांवर आला. ७५ मध्यम प्रकल्पांतील उपयुक्‍त पाणीसाठा ७३.०८ टक्‍क्‍यांवरून ४९.७० टक्‍क्‍यांवर, ७५२ लघू प्रकल्पांतील पाणीसाठा ५५.२९ टक्‍क्‍यांवरून ३३.१६ टक्‍क्‍यांवर, गोदावरी नदीवरील १३ बंधाऱ्यांमधील उपयुक्‍त पाणीसाठा ६५.८२ टक्‍क्‍यांवरून ४५.३५ टक्‍क्‍यांवर, तर तेरणा, मांजरा, रेणा प्रकल्पांमधील उपयुक्‍त पाणीसाठा ९३.७३ टक्‍यांवरून २५.७० टक्‍क्‍यांवर येऊन पोचला. मराठवाड्यातील ७५२ लघू प्रकल्पात केवळ ३३ टक्‍केच उपयुक्‍त पाणी शिल्लक आहे.

हिंगोली जिल्ह्यातील २६ लघू प्रकल्पांत सर्वात कमी २१ टक्‍केच उपयुक्‍त पाणी आहे. त्यापाठोपाठ उस्मनाबादमधील २०५ प्रकल्पांत ३० टक्‍के, परभणीतील २२ प्रकल्पात ३२ टक्‍के, परभणीतील २२ प्रकल्पांत ३२ टक्‍के, जालन्यातील ५७ प्रकल्पांत ३३ टक्‍के, औरंगाबादमधील ९६ प्रकल्पांत ३५ टक्‍के, बीडमधील १२६ प्रकल्पांत ३५ टक्‍के, तर नांदेडमधील ८८ लघू प्रकल्पांत ३९ टक्‍केच उपयुक्‍त पाणी आहे. 

१३ लघू प्रकल्प कोरडे 

मराठवाड्यातील ७५२ लघू प्रकल्पांपैकी १३ लघू प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. त्यामध्ये औरंगाबादमधील ३, बीड व लातूरमधील प्रत्येकी ४, तर उस्मानाबादमधील २ लघू प्रकल्पांचा समावेश आहे. ८१ लघू व २ मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा जोत्याखाली आहे. त्यात औरंगाबादमधील ८, जालना ७, बीड २०, लातूर १५, उस्मानाबाद १९, नांदेड ७, परभणी २ तर हिंगोलीतील ३ लघू प्रकल्पांचा समावेश आहे.  जोत्याखालील मध्यम प्रकल्पांत लातूरमधील २ मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे.

 


इतर ताज्या घडामोडी
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...