डॉ. सुजय विखे पाटील आज भाजपात प्रवेश करणार

डॉ. सुजय विखे पाटील यांचा  आज  अखेर मुंबईत भाजप प्रवेश
डॉ. सुजय विखे पाटील यांचा आज अखेर मुंबईत भाजप प्रवेश

नगर : ज्येष्ठ काँग्रेसनेते व विधान सभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पूत्र डॉ. सुजय विखे पाटील यांच्या बहुचर्चित भाजप प्रवेशावर आज अखेर शिक्कामोर्तब झाले. सोमवारी (ता. ११) मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश होणार आहे. शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे उपाध्यक्षपद व पक्षाची नगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी डॉ. सुजय यांना बहाल करण्यात येणार आहे. आजोबा दिवंगत माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील, वडील राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष असलेल्या आई शालिनी विखे पाटील या तिघांच्याही तगड्या रेडीमेड नेटवर्कचा मोठ्या खुबीने उपयोग करून घेत सुजय यांनी गेल्या दोन-तीन वर्षांपासून नगर लोकसभा मतदारसंघातून खासदारकीची जोरदार तयारी चालविली आहे.  आघाडीच्या वाटपात राष्ट्रवादीच्या वाट्याला असलेली नगरची जागा काँग्रेसला मिळेल, असे गृहीत धरून त्यांनी मोर्चेबांधणी चालविली होती. तथापि, राष्ट्रवादीने ही जागा सोडण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह घेवून निवडणूक लढविण्याची तयारी दाखविली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक व  राज्यपातळीवरील काही मोजक्‍या नेत्यांनीही पक्षाने सुजय यांना उमेदवारी द्यावी, अशी गळ श्रेष्ठींना घातली. परंतु श्रेष्ठींनी सुजय यांना उमेदवारी देण्यास अनुकूलता दाखविली नाही. त्यामुळे संतापलेल्या डॉ. सुजय यांनी  शुक्रवारी (ता. 8) मुंबईत राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची भेट घेऊन मी आता तुमच्या पक्षाची उमेदवारी करणार नसल्याचे स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com