agriculture news in marathi, Sujay Vikhe joins BJP, Shock to Congress | Agrowon

सुजय विखे भाजपमध्ये आले.. १० मिनिटांत उमेदवारीही मिळाली !

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 12 मार्च 2019

मुंबई : सुजय विखे हे भाजपचे नगरमधून उमेदवार असतील असे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. सुजय विखेंना घरात बंड करावा लागला याचा विचार व्हायला हवा, काही दिवसांनी घरच्यांनाही सुजय यांचा निर्णय योग्य वाटेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुजय विखेंच्या भाजपप्रवेशानंतर म्हटले आहे.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, गिरीष महाजन, राम शिंदे आणि नगर जिल्ह्यातील भाजपचे आजी-माजी आमदार उपस्थित होते.  

मुंबई : सुजय विखे हे भाजपचे नगरमधून उमेदवार असतील असे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. सुजय विखेंना घरात बंड करावा लागला याचा विचार व्हायला हवा, काही दिवसांनी घरच्यांनाही सुजय यांचा निर्णय योग्य वाटेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुजय विखेंच्या भाजपप्रवेशानंतर म्हटले आहे.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, गिरीष महाजन, राम शिंदे आणि नगर जिल्ह्यातील भाजपचे आजी-माजी आमदार उपस्थित होते.  

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित आज (ता. १२) सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांच्या प्रवेशाच्या चर्चा गाजत होत्या परंतु त्यांनी आज अधिकृत भाजप प्रवेश केला. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, यावेळी भाजपप्रणित युतीच्या केंद्रात २०१४ पेक्षा जास्त जागा येतील, महाराष्ट्रात ४८ पैकी ४५ जागा येतील असेही त्यांनी सांगितले.

त्याचबरोबर नगरच्या जागेसाठी सुजय विखे पाटील यांचं नाव भाजपच्या संसदीय मंडळाकडे पाठवणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आम्ही पक्षाकडे सुजय विखेंचं नाव पाठवू, ते त्याला होकार देतील, नगरमधील जागा रेकॉर्ड मताने येईल. डॉ. सुजय विखेंनी कोणतीही अट घातली नाही, सुजय यांच्या रुपाने महाराष्ट्राला चांगलं नेतृत्त्व मिळू शकतं असेही फडणवीस यावेळी म्हणाले. त्याचबरोबर, भाजपच्या सर्व आमदारांशी चर्चा करुन सुजय विखेंना भाजपमध्ये प्रवेश दिला असल्याचे स्पष्टीकरणही  मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

माझ्या संकटाच्या काळात मला आधार आणि आशीर्वाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यामुळे मी मुख्यमंत्री फडणवीस आणि सर्व आमदारांचे आभार मानतो. हा माझा व्यक्तिगत निर्णय असून मी हा निर्णय माझ्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध घेतला आहे. माझ्या आई वडिलांची या निर्णयाबाबत किती सहमती आहे हे मला माहित नाही. नगर जिल्ह्यात आमदारांच्या मदतीने भाजपच्या वाढीसाठी अहोरात्र प्रयत्न करेन नगरच्या लोकसभेच्या दोन्ही जागा युतीकडे राहतील असा विश्‍वास मी देतो. 

आपल्या भाषणात ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या सुरक्षिततेसाठी अनेक प्रभावी निर्णय घेतले आहेत. नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व हेच खरे नेतृत्व आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यातील वाटचालीसाठी भाजप हाच योग्य पक्ष आहे असे माझे आणि माझ्या युवक सहकाऱ्यांचे मत झाले आहे, त्यातूनच आम्ही भाजपप्रवेशाचा निर्णय घेतला. अतिशय सन्मानपूर्वक आणि मुलगा म्हणून मला नेत्यांनी मला पक्षात जागा दिली आहे. आमदार कर्डिले यांचे मला पाच वर्षापासून आशीर्वाद आहेत. अन्य आमदारांनाही विनंती आहे की मी मागे जे बोललो असेन ते विसरून आपला मुलगा मानून कुटुंबात सहभागी करून घ्यावे. 

यावेळी आमदार स्नेहलता कोल्हे, आमदार शिवाजी कर्डिले, मंत्री राम शिंदे, आमदार मोनिकाताई राजळे, मुरकुटे, बबनराव पाचपुते आणि नगर जिल्ह्यातील अनेक नेते उपस्थित होते. 


इतर ताज्या घडामोडी
पंकजा मुंडे यांच्या स्वाभिमान...बीड  : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या...
सांगलीत कांदा ३५०० ते १०१११ रुपये...सांगली : येथील विष्णू अण्णा पाटील फळे व भाजीपाला...
संपूर्ण कर्जमाफी, वीजबिलमाफीबाबत...सोलापूर ः एकापाठोपाठ एका नैसर्गिक आपत्तीने...
जंगलातील वणव्यांचाही वटवाघळांना होतो...वटवाघळांसाठी रहिवासाचा ऱ्हास, वातावरणातील...
जालना जिल्ह्यात रब्बी सिंचनाची वाट अवघडचजालना :  जायकवाडी प्रकल्पावरून...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत केळी...नांदेड : सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यातील पावसामुळे...
आटपाडीत तीनशे हेक्‍टरवर फुलणार डाळिंब...आटपाडी, जि. सांगली : पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड...
गांडूळ खतनिर्मितीस प्रोत्साहन द्या : डॉ...कोल्हापूर  : ‘‘शेतकऱ्यांनी जमिनीचा पोत...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीच्या ४०...बुलडाणा ः यंदाच्या हंगामात जिल्ह्यात रब्बीसाठी...
अधिकारी कार्यालयात घुसवल्या बैलजोड्याअमरावती ः वारंवार अर्ज, विनंत्या करूनसुद्धा पांदण...
नाशिक जिल्ह्यातील बंद उपसा जलसिंचन...नाशिक : जिल्ह्यात सन १९९५ ते २००० या कालावधीत...
सातारा जिल्ह्यात ऊसदराची कोंडी फोडणार...सातारा  ः साखर कारखान्यांची धुराडी पेटली...
प्रतिकूल हवामानामुळे पुणे जिल्ह्यात...पुणे  ः दर वाढल्याने पुणे जिल्ह्यातील अनेक...
प्रतिकूल हवामानाचा नगर जिल्ह्यातील गहू...नगर  ः जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून...
चंद्रपूर जिल्ह्यात ११ महिन्यांत ५०...चंद्रपूर  ः नापिकी, कर्जबाजारीपणा यातून...
हवामानाच्या पूर्व अंदाजासाठी पाषाण,...पुणे  ः पुणे शहरातील विविध ठिकाणी अनेकदा कमी...
बुलडाणा जिल्ह्याच्या भूजलपातळीत १.३९...बुलडाणा ः मागील काही वर्षांपासून जिल्हा सातत्याने...
पुण्यात १७ जानेवारीपासून पुष्प...पुणे  ः ॲग्री हार्टिकल्चर सोसायटी ऑफ...
नवी दिल्लीतील प्रदर्शनात जैविक खते,...पुणे  ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे...
शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील ऊस...कोल्हापूर : शिरोळ, हातकणंगले तालुक्यांतील...