agriculture news in marathi, Sukanu Committe warns government on farmers issues | Agrowon

...अन्यथा १ मार्चपासून असहकार आंदोलन : सुकाणू समिती

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 डिसेंबर 2017

औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांबाबत जानेवारीमध्ये पुन्हा एकदा शासन व प्रशासन स्तरावर जाब विचारला जाईल. त्यानंतरही शासनाने ठोस पावले न उचलल्यास २० जानेवारीपासून राज्यभर जागर व त्यानंतर १ मार्चपासून शेतकऱ्यांचे पुन्हा असहकार आंदोलन राज्यभर छेडण्याचा निर्णय शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीच्या बैठकीत शुक्रवारी (ता. २२) घेण्यात आला.

औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांबाबत जानेवारीमध्ये पुन्हा एकदा शासन व प्रशासन स्तरावर जाब विचारला जाईल. त्यानंतरही शासनाने ठोस पावले न उचलल्यास २० जानेवारीपासून राज्यभर जागर व त्यानंतर १ मार्चपासून शेतकऱ्यांचे पुन्हा असहकार आंदोलन राज्यभर छेडण्याचा निर्णय शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीच्या बैठकीत शुक्रवारी (ता. २२) घेण्यात आला.

नाशिकमध्ये गठीत झालेल्या सुकाणू समितीचे सदस्य व शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी औरंगबादेतील सुभेदारी विश्रामगृहात झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांना याविषयी माहिती दिली. सरसकट कर्जमुक्‍ती व पुन्हा शेतकरी कर्जाच्या खाईत ढकलला जाऊ नये, यासाठी उत्पादन खर्च अधिक ५० टक्‍के नफा मिळवून देणारे शेतमालाचे दर असावे, या प्रश्नावर सुकाणू समितीशी जोडलेल्या संघटनांच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा व प्रतिनिधींचा या बैठकीत समावेश होता. यामध्ये नामदेव गावडे, किशोर ढमाले, प्रतिभा शिंदे, कालिदास आपेट, सचिन धोंडे, बाळासाहेब पठारे, गणेश जगताप, करण जायकर, शिवाजीराव नांदखिले, एच. एम. देसरडा, संजय पाटील घाटणीकर, ॲड. बन्सी सातपुते, बाबा अरगडे, विलास कदम, जगन्नाथ कोरडे, नारायण टेकाळे, राजेंद्र टेकाळे, ॲड. भगवान भोजने, दत्ता कदम, अनंत शिंदे, बाळासाहेब वाळके, अनंत शिंदे, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष नीलेश बारगळ, संजय सावंत आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. 

या बैठकीत सुकाणू समितीच्या विस्ताराच्या अनुषंगाने मंथन झाले. सरसकट कर्जमुक्‍ती, वीजबिल, शेतमालाचा हमीभाव, दूध तसेच ऊसदराबाबत विचारविनिमय होऊन त्यासाठीच्या लढ्याची रणनिती ठरविण्यात आली. बैठकीत झालेल्या चिंतनाअंती रघुनाथदादा पाटील म्हणाले, शासन आदेश काढते, मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. मुंबई विद्यापीठाचे निकाल ऑनलाइन जाहीर करू न शकलेल्या शासनाने शेतकऱ्यांना मात्र कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरायला लावलेच, सोबतच बोंड अळीने नुकसान झाले तरी ऑनलाइन अर्ज भरा, मूग, उडीद, सोयाबीन विकायचं तरी ऑनलाइन अर्ज भरण्यास सांगते आहे. ऑनलाइन अर्जातही अटी शर्ती टाकून शेतकऱ्यांना आधार मिळूच नाही अशी भूमिका शासनाने घेतल्याचा आरोप श्री. पाटील यांनी केला. तसेच दीड लाखाच्या कर्जमाफीवर सुकाणू समिती समाधानी नाही, यावर आमचे एकमत झाले आहे. शेतकऱ्यांच्या सरसकट सर्व कर्जमुक्‍तीची सुकाणू समितीची भूमिका असल्याचे ते म्हणाले. या बैठकीत मराठवाड्यातून आलेल्या विविध भागातील प्रतिनिधींनी आपली भूमिका मांडली.


इतर अॅग्रो विशेष
कहर ‘कोरोना’चाकोरोना विषाणूच्या वाढत्या उद्रेकाने जगभर दहशतीचे...
नदी संवर्धनाचा केरळचा आदर्शकेरळ हे भारताच्या दक्षिण टोकाचे एक राज्य. अरबी...
शेतमजुराच्या मुलीने पटकावला ‘शिवछत्रपती...अकोला ः प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर एका खेड्यातील...
साडेआठ हजार कोटी खर्चूनही 'जलयुक्त' फेल...मुंबई : फडणवीस सरकारची महत्त्वाकांक्षी जलयुक्त...
पीक विमा योजना यापुढे ऐच्छिक; केंद्र...नवी दिल्ली : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा...
राज्यात तापमानात चढ-उतार शक्यपुणे : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
सेंद्रिय धान्य महोत्सवातून हक्काची...तीन-चार वर्षांपासून कृषी विभागातर्फे पुणे येथे...
प्रयोगशीलतेने घडविली समृद्धी..अवर्षणग्रस्त कर्जत तालुक्यातील पाटेगाव (जि. नगर)...
राज्यासह देशात शिवजयंती उत्साहात साजरीपुणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी...
शिवरायांची भविष्यवेधी ध्येयधोरणेछत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने रयतेचा राजा...
आपणच आपला करावा उद्धारशेती फायद्याची करायची असेल, तर शेतकऱ्यांनी एकत्र...
हवामानबदलाशी लढण्यासाठी एक हजार कोटी...पुणे ः जागतिक हवामानबदलाची समस्या संपूर्ण जगासमोर...
राज्यात उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : राज्यात कमाल तापमानात मोठी वाढ झाल्याने...
कापसाचे ६४७ कोटींचे चुकारे थकीतअमरावती ः बाजारात दर कोसळल्याने महाराष्ट्र राज्य...
‘पणन’ची कापूस खरेदी उच्चांकी दिशेनेऔरंगाबाद : महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन...
शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीत ८५ स्वराज्यरथ...पुणे : ‘‘पुण्यात शिवजयंती महोत्सव समितीतर्फे आज...
सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षकाची...औरंगाबाद शहरापासून सुमारे बारा किलोमीटरवर...
कापूस उद्योगाचे चीनमध्ये पाच हजार कोटी...जळगाव ः देशातील सूत व कापूस गाठींचा मोठा खरेदीदार...
हमीदराने खरेदीसाठी तुरीचे संपूर्ण...वाशीम ः तुरीचे स्वतंत्रपणे पीक घेण्याची पद्धत...
पंधरा लाख कापूस गाठींची खानदेशातील...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...