agriculture news in Marathi summer crop sowing up by 14 percent Maharashtra | Agrowon

उन्हाळी पीक लागवडीत १४ टक्क्यांनी वाढ 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 21 एप्रिल 2020

यंदा उन्हाळी पिकांच्या लागवडीत गेल्या वर्षीच्या तुलनेत १४ टकक्यांनी वाढ झाली आहे. आतापर्यंत ५२.७८ लाख हेक्टरवर उन्हाळी पिकांची लागवड झाली आहे.

नवी दिल्ली: लॉकडाऊनमधून शेतीकामांना सुट मिळाल्याने रब्बी पिकांची काढणी आणि उन्हाळी पिकांची लागवड करणे शतकऱ्यांना शक्य झाले. मात्र, यंदा उन्हाळी पिकांच्या लागवडीत गेल्या वर्षीच्या तुलनेत १४ टकक्यांनी वाढ झाली आहे. आतापर्यंत ५२.७८ लाख हेक्टरवर उन्हाळी पिकांची लागवड झाली आहे. गेल्यावर्षी याच काळात ३८.६४ लाख हेक्टरवर लागवड होती. 

देशात यंदा मॉन्सूनच्या काळात सरासरीपेक्षा १४ टक्के अधिक पाऊस झाल्याने उन्हाळी पिकांच्या लागवडीसाठी मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यातच कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे सर्व व्यवहार आणि कामे ठप्प झाली होती. परंतु केंद्र आणि राज्य सरकारांनी शेतीकामांना लॉकडाऊनमधून सुट दिल्याने रब्बी पिकांची काढणी करणे शक्य झाले. रब्बीचे क्षेत्र रिकामे झाल्याने उन्हाळी पिकांची लागवड झाली. 

देशात रब्बीत १६१ लाख हेक्टरवर कडधान्याची लागवड झाली होती. हरभरा, तूर, उरद, मूग आणि वाटाणा पिकांची काढणी पुर्ण केली आहे. उसाची ५४.२९ लाख हेक्टरवर लागवड होती. त्यापैकी महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि पंजाबमध्ये उसाची काढणी पुर्ण झाली आहे.

रब्बीत भाताची २८ लाख हेक्टरवर लागवड होती. त्यापैकी आंध्र प्रदेश, आसाम, छत्तीसगड, गुजरात, कर्नाटक, केरळ, ओडिशा, तामिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा आणि पश्‍चिम बंगालमध्ये भाताची काढणी अंतिम टप्प्यात आहे. तेलबिया पिकांचीही काढणी अनेक राज्यांमध्ये पुर्ण झाली आहे. 

गहू काढणीला वेग 
देशात रब्बी हंगामात ३१० लाख हेक्टरवर गव्हाची लागवड झाली होती. त्यापैकी ६३ ते ६७ टक्के पिकांची काढणी झाली आहे. मध्य प्रदेशात ९० ते ९५ टक्के, राजस्थान ८० ते ८५ टक्के, उत्तर प्रदेश ६० ते ६५ टक्के, हरियानात ३० ते ३५ टक्के आणि पंजाबमध्ये १० ते १५ टक्के पिकाची काढणी झाली आहे. 


इतर ताज्या घडामोडी
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...