agriculture news in marathi, summer crop sowing status, satara, maharashtra | Agrowon

सातारा जिल्ह्यात ३३६५ हेक्टरवर उन्हाळी पिकांची पेरणी
टीम अॅग्रोवन
रविवार, 21 एप्रिल 2019

सातारा  ः जिल्ह्यातील पूर्व भागात तीव्र पाणीटंचाईमुळे उन्हाळी पिके धोक्यात येऊ लागली आहे. गुरूवारअखेर (ता.१८) तीन हजार ३६५ हेक्‍टर म्हणजेच ४५.२२ टक्के क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. फलटण तालुक्‍यात सर्वाधिक ११२७ हेक्‍टर क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली असल्याची नोंद झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 

सातारा  ः जिल्ह्यातील पूर्व भागात तीव्र पाणीटंचाईमुळे उन्हाळी पिके धोक्यात येऊ लागली आहे. गुरूवारअखेर (ता.१८) तीन हजार ३६५ हेक्‍टर म्हणजेच ४५.२२ टक्के क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. फलटण तालुक्‍यात सर्वाधिक ११२७ हेक्‍टर क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली असल्याची नोंद झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 

अपुऱ्या पर्जन्यमानामुळे जिल्ह्यात डिसेंबर महिन्यापासून पाणीटंचाईच्या झळा सुरू झाल्या. याचा परिणाम उन्हाळी हंगामावर झाला असून एप्रिल महिना संपत आला असली तरी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ५० टक्क्यांपेक्षा कमी क्षेत्रावर पेरणी झाली आहे. कृषी विभागाकडून जिल्ह्यात ७४३६ हेक्‍टर क्षेत्र उन्हाळी पिकांच्या पेरणीसाठी निश्चित केले आहे. त्यापैकी गुरुवारअखेर (ता.१८) ३३६५ हेक्‍टर क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. यामध्ये फलटण तालुक्यातील सर्वाधिक ११२७ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. या तालुक्यात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जात असल्याने येथील शेतकऱ्यांनी चारा पिकांची लागवड केली आहे. 

या तालुक्यात ११२७ हेक्टर क्षेत्रापैकी ९१४ हेक्टर क्षेत्रावर मक्याची लागवड झाली आहे. पिकामध्ये उन्हाळी भुईमुगाची १७८९ तर मक्‍याची १५७५ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. 
जिल्ह्यातील माण, खटाव, कोरेगाव, खंडाळा व फलटण या तालुक्‍यांत तीव्र दुष्काळ असल्याने लागवड केलेली पिके धोक्यात आली आहे. 

पश्चिमेकडील तालुक्यात अनेक ठिकाणी पाणीटंचाईचा पेरणीवर परिणाम झालेला आहे. यामुळे या हंगामात ३५ ते ४० टक्के क्षेत्र नापेर राहण्याची शक्यता आहे. या पाणीटंचाईचा परिणाम उसाच्या क्षेत्रावर झालेला आहे. तुटलेला ऊस काढणीवर भर दिला जात आहे. 
 
तालुकानिहाय उन्हाळी पेरणी झालेली क्षेत्र (हेक्‍टरमध्ये) ः सातारा २०५, जावली १३०, पाटण २६२, कराड ६५०, कोरेगाव ३३८, खटाव ८०, माण १९५, फलटण ११२७, खंडाळा २३, वाई ३५५. 

इतर बातम्या
नगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर  ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...
नत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...
डाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर  : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव  ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
औरंगाबाद जिल्ह्यात पावसाअभावी टोमॅटोचे...औरंगाबाद :  जिल्ह्यातील टोमॅटोचे आगार...
अकोला जिल्ह्यातील पाच पशुवैद्यक दवाखाने...अकोला  ः जिल्हा परिषदेअंतर्गत चालविल्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ धरणे भरलीसिंधुदुर्ग : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २३...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक...
दसरा, दिवाळीसाठी चांदवड तालुक्यात...नाशिक  : चांदवड तालुक्यातील शेतकरी दसरा,...
नगर जिल्ह्यातील वाहून गेलेल्या...नगर : पुराच्या पाण्याने वाहून गेलेल्या जमिनीचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे...सिंधुदुर्ग   ः अतिवृष्टीचा भाजीपाला...
महापुराच्या स्थितीतही ‘त्यांनी’ तीन...नवेखेड, जि. सांगली  : मसुचिवाडी (ता....
वसंतराव नाईक यांनी आधुनिक तंत्रज्ञान...पुसद, जि. यवतमाळ   ः देशातील...
सरकारला खरीप, रब्बीतील फरक कळत नाही :...पैठण, जि. औरंगाबाद  : राज्यातील शेतकऱ्यांची...
पूरग्रस्त भागातील घरांच्या दुरुस्तीसाठी...मुंबई  : पूरग्रस्त ग्रामीण भागातील वाहून...
पीक नुकसानभरपाई नको; संपूर्ण कर्जमाफीच...कऱ्हाड, जि. सातारा   ः महापुराने हुती...
नगर जिल्ह्यात ४०५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर  ः जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाने...
पूरग्रस्तांना एक हेक्टरसाठी मिळणार...मुंबई : राज्यात विविध भागांत आलेल्या...
राज्याचा पाणीसाठा ६१ टक्क्यांवर;...पुणे : जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला...
‘दावणीची दौलत’ चाऱ्याअभावी खचली; दक्षिण...कोल्हापूर/ सांगली : बारमाही पाण्याने भरलेल्या...