साताऱ्यात ३४४५ हेक्टरवर उन्हाळी पिकांची पेरणी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा  : जिल्ह्यात आतापर्यंत ३४४५ हेक्टरवर म्हणजेच ४६.३३ टक्के क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. यंदा सर्वाधिक क्षेत्रावर उन्हाळी भुईमुगाचा पेरा असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात उन्हाळी हंगामातील पिकांचे सरासरी क्षेत्र सुमारे ७४३६ हेक्‍टर आहे. यामध्ये सर्वाधिक ५२८० हेक्‍टरवर भुईमूग, तर उर्वरित क्षेत्रावर सूर्यफूल, मका व काही प्रमाणात चारा पिके घेतली जातात. पश्‍चिम भागातील तालुक्‍यांत पाण्याची उपलब्धतता असल्याने तेथील शेतकरी उन्हाळी पिकांची पेरणी करतात. सातारा, कऱ्हाड, जावली, पाटण, वाई, खंडाळा या तालुक्‍यांत भुईमुगाची, तर पूर्वेकडील दुष्काळी तालुक्‍यांत सूर्यफूल, मका व चारा पिके घेतली जातात. 

सध्या जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई असल्यामुळे पेरणीची कामे बंद होऊ लागली आहेत. यामुळे जिल्ह्यातील ५० टक्के क्षेत्र नापेर राहणार आहे. आतापर्यंत उन्हाळी पिकांची ३४४५ हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. यात भुईमुगाची सर्वाधिक १८३७, मकाची १६०८ हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. पाण्याची बचत, कमी तण तसेच चांगले उत्पादन मिळावे या दृष्टीने भुईमूग पिकासाठी काही शेतकरी ठिबक संच व मल्चिंग पेपरचा वापर करतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com