Agriculture news in Marathi Summer crops flourish in Khandesh | Page 2 ||| Agrowon

खानदेशात उन्हाळी पिके जोमात

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 1 एप्रिल 2021

खानदेशात उन्हाळी पिकांमध्ये भुईमूग, बाजरी, तीळ ही पिके जोमात आहेत. तीळ पिकाची पेरणीदेखील यंदा काहीशी वाढली आहे. बाजरीची मळणी पुढील पंधरवड्यात सुरू होईल, अशी स्थिती आहे.

जळगाव ः खानदेशात उन्हाळी पिकांमध्ये भुईमूग, बाजरी, तीळ ही पिके जोमात आहेत. तीळ पिकाची पेरणीदेखील यंदा काहीशी वाढली आहे. बाजरीची मळणी पुढील पंधरवड्यात सुरू होईल, अशी स्थिती आहे. परंतु लॉकडाउन व कोरोनाच्या समस्येची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.

कांदा पिकाची लागवडही खानदेशात स्थिर होती. कांद्याची प्रतिकिलो साडेतीन हजार, चार हजार रुपये दराचे बियाणे शेतकऱ्यांनी खरेदी करून लागवड केली होती. खानदेशात सुमारे १५ हजार हेक्टरवर कांदा पीक आहे. यात अनेक भागात म्हणजेच धुळे, साक्री, चोपडा आदी तालुक्यात कांद्याची काढणी सुरू झाली आहे. परंतु कांदा पिकाचे दर कोरोनाच्या समस्येमुळे गेल्या १८ ते २० दिवसांत सतत कमी झाले आहेत. यामुळे कांदा उत्पादकांना पीक परवडणार नाही, अशी स्थिती तयार झाली आहे.

दुसरीकडे बाजरी पिकाची पेरणीदेखील स्थिर आहे. बाजरीला गेल्या वर्षी किमान १५०० व कमाल २०५० रुपये प्रतिक्विंटलला दर मिळाला होता. पण यंदा मळणीपूर्वीच लॉकडाउन व बाजार व्यवस्थेला फटका बसू लागल्याने बाजरीचे दरही दबावात येत आहेत. सध्या आवक फक्त व्यापाऱ्यांकडून होत आहे, पण दर १६०० ते १७०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत.

भुईमुगालाही गेल्या वर्षी लॉकडाउनमुळे फटका बसला होता. गेल्या वर्षी वाळविलेल्या भुईमूग शेंगांना प्रतिक्विंटल पाच हजार रुपये दर होता. यंदा किमान सात हजार रुपये प्रतिक्विंटलला दर मिळेल, अशी अपेक्षा होती. कारण बाजार समित्यासह पणन व्यवस्थेने गती, सुसूत्रता धरली होती. परंतु लॉकडाउनच्या भीतीने या शेंगांचा हंगामही नफा देणार नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. उन्हाळी पिकांमध्ये खानदेशात बाजरी अधिक असायची. पण यंदा भुईमूग, तीळ पिकाची पेरणी चांगली आहे. तापी, गिरणा, पांझरा नदीकाठच्या भागात हे पीक आहे.


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात कापसाची आठ लाख हेक्टरवर लागवडजळगाव ः  खानदेशात कापूस प्रमुख पीक आहे. यंदा...
भीमा-नीरा नदी काठांवरील गावांनी सतर्क...सोलापूर : ‘‘भीमा-नीरा खोऱ्यात होत असलेल्या...
मराठवाड्यात पाऊस कायम; जोर कमीऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. २३)...
नाशिक जिल्ह्यात खासगी पशुसेवकांचे काम...येवला : खासगी पशुसेवक ग्रामीण भागात मोठ्या...
मुगावर ‘लिफ क्रिंकल’ प्रादुर्भावअकोला : गेल्या हंगामात लिफ क्रिंकल विषाणूजन्य...
परभणी जिल्ह्यात मोठ्या, मध्यम...परभणी ः पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला....
लिंबूवर्गीय पिकातील आंबिया बहर फळगळ...सद्यःस्थितीत आंबिया बहराची फळे ही विकसनशील...
नीरा देवघर धरणक्षेत्रात सर्वाधिक २५५...पुणे : कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पश्चिम पट्यात...
‘एफआरपी’ वाटपात राज्याची आघाडी : शेखर...पुणे ः साखर उद्योगाचा गाळप हंगाम यंदा आव्हानात्मक...
विमा लाभापासून शेतकऱ्यांना वंचित...नगर : नैसर्गिक आपत्ती, अन्य कारणाने नुकसान होऊनही...
साताऱ्यात पावसाचा जोर कमी झालासातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट...
केळी उत्पादकांना वादळ नुकसानभरपाईची...अकोला : जिल्ह्यात अकोट तालुक्यात १५ मे २०२० रोजी...
अतिवृष्टिग्रस्तांना अन्नधान्य,...नाशिक : आपत्तीग्रस्त आणि पूरग्रस्तांना मदत म्हणून...
हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा...महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होत असून, उत्तर...
मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...
औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...
नांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...
खानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...
अतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...
चिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...