Agriculture news in Marathi Summer crops flourish in Khandesh | Page 3 ||| Agrowon

खानदेशात उन्हाळी पिके जोमात

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 1 एप्रिल 2021

खानदेशात उन्हाळी पिकांमध्ये भुईमूग, बाजरी, तीळ ही पिके जोमात आहेत. तीळ पिकाची पेरणीदेखील यंदा काहीशी वाढली आहे. बाजरीची मळणी पुढील पंधरवड्यात सुरू होईल, अशी स्थिती आहे.

जळगाव ः खानदेशात उन्हाळी पिकांमध्ये भुईमूग, बाजरी, तीळ ही पिके जोमात आहेत. तीळ पिकाची पेरणीदेखील यंदा काहीशी वाढली आहे. बाजरीची मळणी पुढील पंधरवड्यात सुरू होईल, अशी स्थिती आहे. परंतु लॉकडाउन व कोरोनाच्या समस्येची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.

कांदा पिकाची लागवडही खानदेशात स्थिर होती. कांद्याची प्रतिकिलो साडेतीन हजार, चार हजार रुपये दराचे बियाणे शेतकऱ्यांनी खरेदी करून लागवड केली होती. खानदेशात सुमारे १५ हजार हेक्टरवर कांदा पीक आहे. यात अनेक भागात म्हणजेच धुळे, साक्री, चोपडा आदी तालुक्यात कांद्याची काढणी सुरू झाली आहे. परंतु कांदा पिकाचे दर कोरोनाच्या समस्येमुळे गेल्या १८ ते २० दिवसांत सतत कमी झाले आहेत. यामुळे कांदा उत्पादकांना पीक परवडणार नाही, अशी स्थिती तयार झाली आहे.

दुसरीकडे बाजरी पिकाची पेरणीदेखील स्थिर आहे. बाजरीला गेल्या वर्षी किमान १५०० व कमाल २०५० रुपये प्रतिक्विंटलला दर मिळाला होता. पण यंदा मळणीपूर्वीच लॉकडाउन व बाजार व्यवस्थेला फटका बसू लागल्याने बाजरीचे दरही दबावात येत आहेत. सध्या आवक फक्त व्यापाऱ्यांकडून होत आहे, पण दर १६०० ते १७०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत.

भुईमुगालाही गेल्या वर्षी लॉकडाउनमुळे फटका बसला होता. गेल्या वर्षी वाळविलेल्या भुईमूग शेंगांना प्रतिक्विंटल पाच हजार रुपये दर होता. यंदा किमान सात हजार रुपये प्रतिक्विंटलला दर मिळेल, अशी अपेक्षा होती. कारण बाजार समित्यासह पणन व्यवस्थेने गती, सुसूत्रता धरली होती. परंतु लॉकडाउनच्या भीतीने या शेंगांचा हंगामही नफा देणार नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. उन्हाळी पिकांमध्ये खानदेशात बाजरी अधिक असायची. पण यंदा भुईमूग, तीळ पिकाची पेरणी चांगली आहे. तापी, गिरणा, पांझरा नदीकाठच्या भागात हे पीक आहे.


इतर ताज्या घडामोडी
एकरकमी ‘एफआरपी’साठी ‘मिस कॉल’ मोहीमकोल्हापूर : केंद्र सरकारने ‘एफआरपी’चे तुकडे...
पीकविमा योजना शासनाने चालवावी : भारत...अकोला : हजारो कोटी रुपये कमाई करणाऱ्या...
खानदेशात केळी दरांवर दबावजळगाव : खानदेशात केळीची आवक गेल्या पाच-सहा...
कृषी कायद्यांबाबतचा अहवाल खुला करावा :...अकोला : केंद्र सरकारच्या कृषिविषयक कायद्यांना...
सागर खोतकडून ‘स्वाभिमानी’च्या...नेर्ले, जि. सांगली : आमदार सदाभाऊ खोत यांचा मुलगा...
जालन्यात रेशीम कोषाला उच्चांकी ५१...जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत...
खडसे, महाजन यांना सहकारात एकत्र...जळगाव : राज्याच्या राजकारणात माजी मंत्री एकनाथ...
फुंडकर फळबाग योजनेत शेतकऱ्यांचे ७५ लाख...नांदेड : रोजगार हमी योजनेत पात्र ठरु शकत नाहीत...
नाशिक बाजार समिती गैरव्यवहार प्रकरणी...नाशिक : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २६ ऑक्टोबर...
जमनालाल बजाज पुरस्कार बी. बी. ठोंबरे...लातूर : कौन्सिल फॉर फेअर बिझनेस प्रॅक्टिसकडून...
अज्ञाताने फवारले कांद्यावर तणनाशक; ...भुसावळ, जि. जळगाव : तळवेल (ता. भुसावळ) येथील...
पंजशीरवर तालिबानचा ताबा; गर्व्हनर...काबूल : अफगाणिस्तानातील सर्वात कठिण मानला...
शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या संपूर्ण...अकोला : शरद जोशी यांनी शेतकऱ्यांच्या पायातील सर्व...
काथ्या उद्योगवृद्धीसाठी सर्वतोपरी...सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात काथ्या उद्योग...
चांदूर बाजार तालुक्यात ४२ टक्‍क्‍यांनी...अमरावती : शेती कामाकरिता बैलांचा वापर होत...
शेतकऱ्यांची लूट थांबली पाहिजे : शरद पवारजुन्नर, जि. पुणे ः शेतीमालाला चांगला भाव देण्याची...
पाच मंगळवार शेती कामांना ब्रेक;...आर्णी, जि. यवतमाळ : ८५ वर्षांपूर्वी आलेल्या...
संत्रा उत्पादकांना शासनाने वाऱ्यावर...अमरावती : विदर्भातील मुख्य पीक असलेल्या संत्रा...
नागपूर जिल्हा परिषदेत ‘फाइल ट्रॅकर’नागपूर : ‘सरकारी काम आणि महिनाभर थांब’, असाच...
आंबा, काजू विम्यासाठी जुने निकष लागू...सिंधुदुर्गनगरी ः फळपीक विमा योजनेचे बदललेले निकष...