नगर जिल्ह्यात चार हजार हेक्टरवर उन्हाळी पिके

नगर ः जिल्ह्यात उन्हाळी पिकांच्या पेरणीला सुरवात झाली आहे. आतापर्यंत बाजरी, भुईमूग, मूग, उडीद, तिळाची मिळून चार हजार ८३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
Summer crops on four thousand hectares in Nagar district
Summer crops on four thousand hectares in Nagar district

नगर ः जिल्ह्यात उन्हाळी पिकांच्या पेरणीला सुरवात झाली आहे. आतापर्यंत बाजरी, भुईमूग, मूग, उडीद, तिळाची मिळून चार हजार ८३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यंदा उन्हाळी पिकांचे क्षेत्र अधिक वाढण्याचा अंदाज आहे. याशिवाय उन्हाळी चारापिकांची हजार ६०४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. 

जिल्ह्यात यंदा पाण्याची बऱ्यापैकी उपलब्धता असल्याने शेतकरी उन्हाळी पिकांना प्राधान्य देताना दिसत आहेत. यावर्षी भुईमूग, बाजरीचे पीक अधिक असण्याची शक्यता दिसत आहे. आतापर्यंत नगर, पारनेर, श्रीगोंदा, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, संगमनेर तालुक्यात भुईमुगाची पेरणी झाली आहे. बाजरीची शेवगाव व पाथर्डी तालुक्यात पेरणी होत आहे. 

मुगाची शेवगावात, तर तिळाचीही शेवगाव पाथर्डीतच पेरणी झाली आहे. या शिवाय मक्याची साडेचार हजार, कडवळाची दोन हजार, लसूण घासाची १३०० हेक्टरवर लागवड झाली आहे. उन्हाळी पिकांचे सरासरी चार हजार चारशे हेक्टर क्षेत्र आहे. आतापर्यंत ९१ टक्के पेरणी झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com