Agriculture news in marathi Of summer crops in Washim The tendency of farmers towards cultivation | Agrowon

वाशीममध्ये उन्हाळी पिकांच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 4 मार्च 2021

या वर्षी पाण्याची उपलब्धता असल्याने जिल्ह्यातील शेतकरी उन्हाळी पिकांच्या लागवडीसाठी पुढे आले आहेत. उन्हाळी मूग, भुईमूग, सोयाबीनची पेरणी यंदा मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

वाशीमः या वर्षी पाण्याची उपलब्धता असल्याने जिल्ह्यातील शेतकरी उन्हाळी पिकांच्या लागवडीसाठी पुढे आले आहेत. उन्हाळी मूग, भुईमूग, सोयाबीनची पेरणी यंदा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एकट्या रिसोड तालुक्यात उन्हाळी पिकांची सुमारे दोन हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड झाली आहे. 

यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना मूग, सोयाबीनपासून पुरेसे उत्पादन झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बीची लागवड केली. काही शेतकरी आता तुरीचे पीक काढून उन्हाळी पिकांचे नियोजन करीत आहेत. या वर्षी उन्हाळी पिकांच्या लागवडीमध्ये मोठी वाढ दिसून येत आहे. यामध्ये प्रामुख्याने उन्हाळी मूग व उन्हाळी भुईमूगाची पेरणी अधिक झाली आहे. उन्हाळी मुगाची पेरणी अजूनही चालू असून, उन्हाळी पिकाच्या क्षेत्रामध्ये अजूनही वाढ होणार आहे. 

यावर्षी पाण्याची उपलब्धता असल्यामुळे व खरिपाची पिके हातून गेल्यामुळे तालुक्‍यातील शेतकरी उन्हाळी पिकाकडे वळला आहे. रिसोडमध्ये उन्हाळी ज्वारी १६८ हेक्टर, मका ८३ हेक्टर, उन्हाळी मूग ४६०हेक्टर , उन्हाळी उडीद ९२.५ हेक्टर, सोयाबीन १८० हेक्टर, उन्हाळी तीळ १८ हेक्टर, उन्हाळी भुईमूग ५२७ हेक्टर तर भाजीपाला २२९ हेक्टर, उन्हाळी कांदा ३०९ हेक्टर, अशी या एकाच तालुक्यात २ हजार ७२ हेक्टरवर लागवड झाली आहे. उन्हाळी मुगाची पेरणी अद्यापही सुरू आहे. शेतकरी आणखी १५ दिवसांत अशा लागवडी करणार आहेत. 

सोयाबिन लागवडीवर कृषी विभागाचा भर 
खरिपातील सोयाबीनचा दर्जा खालावल्याने बियाण्यासाठी शेतकऱ्यांनी या वर्षी प्रथमच उन्हाळी सोयाबीनची पेरणी केली आहे. खरिपात सोयाबीन बियाणाचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कृषी विभागाकडून सोयाबीन पेरणीचे आवाहन करण्यात आले होते. त्याला शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. कृषी विभागाकडून उन्हाळी पिकांच्या व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्या जात आहे. 

प्रतिक्रिया
ज्या शेतकऱ्याकडे पाण्याची सुविधा आहे, त्यांनी उन्हाळी पिकांची पेरणी केली आहे. येत्या हंगामात सोयाबीन बियाण्याचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून उन्हाळी सोयाबीन व इतर पिकांबाबत कृषी विभागाने मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी १५ मार्चपर्यंतच उन्हाळी मुगाची पेरणी करावी. 
-काव्यश्री घोलप, तालुका कृषी अधिकारी, रिसोड 

 


इतर ताज्या घडामोडी
खरीप हंगामाच्या तोंडावर ...यवतमाळ : गेल्या दशकात जिल्ह्यातील शेतकरी कधी...
अमरावतीत शासकीय दूध योजनेच्या संकलनात ...अमरावती : कोरोनामुळे हॉटेल आणि दुग्धजन्य पदार्थ...
‘आंबेओहोळ’ची घळभरणी अंतिम टप्यात उत्तूर, जि. कोल्हापूर : आरदाळ-उत्तूर (ता. आजरा)...
म्हैसाळ योजनेतून सांगोल्यासाठी पाणी...सांगोला, जि. सोलापूर : सांगोला वितरिका क्रमांक...
सहा कारखान्यांनी उरकले गाळप; ९७ लाख ३८... सातारा : जिल्ह्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात...
खरिपासाठी नगरमध्ये साडेसहा लाख हेक्टर...पुणे नगर : नगर जिल्ह्यात यंदा खरिपासाठी यंदा ६...
परभणीतील शेतकऱ्यांना ८३ कोटींचा विमा...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत सन...
ग्रामसभा करणार तेंदुपत्याची विक्री गडचिरोली : पेसा (पंचायत एक्स्टेंशन टू शेडूल...
ग्रामीण रुग्णांसाठी जिल्हा परिषद...सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा...
कृषी पणन मंडळाकडून आॅनालाइन आंबा...पुणे ः कोरोना संकटातही आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या...
अखेर मोसंबी उत्पादकांना विमा परतावा...जालना : जिल्ह्यातील सहा हजारांवर मोसंबी...
राहीबाई पोपेरे यांची वनस्पती संरक्षण...नाशिक : भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण...
डाळिंब अंबिया बहरातील कीड- रोग...डाळिंब बागेत विविध कीड-रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या...
कोरोनाबाबत डाॅ. सिंग यांनी सूचवलेला...नांदेड : कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी माजी पंतप्रधान...
कोरोना व्हॅक्सिनसाठी वयाची अट शिथिल...कोल्हापूर : भाजीपाला, दूध उत्पादक तसेच...
पुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगामपुणे : शहरात कोरोना संसर्गामुळे लावण्यात आलेल्या...
गोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे ...चंद्रपूर : प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या...
पुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी...पुणे : गेल्या दीड महिन्यापासून उन्हाच्या झळा...
कोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन...नांदेड : जिल्हा मध्यवर्ती बँकेची आर्थिक परिस्थिती...
पालखेडच्या आवर्तनाने शेतीसह पिण्याच्या...येवला, जि. नाशिक : पालखेड डाव्या कालव्यातून...