Agriculture News in Marathi Summer due to increased demand Towards onion price hike | Page 3 ||| Agrowon

मागणी वाढल्याने उन्हाळ  कांदा दरवाढीच्या दिशेने 

टीम अॅग्रोवन
रविवार, 3 ऑक्टोबर 2021

नाशिक जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत साठवलेल्या उन्हाळ कांद्याला अपेक्षित दर मिळत नव्हते. त्यामुळे शेतकरी कोंडीत सापडला होता. मात्र देशातील खरीप कांदा उत्पादक पट्ट्यात अतिवृष्टी व बुरशीजन्य रोगांमुळे नुकसान वाढल्याने हळूहळू सुरू होणारी आवक स्थानिक बाजारांमध्ये कमी होत आहे.

नाशिक : जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत साठवलेल्या उन्हाळ कांद्याला अपेक्षित दर मिळत नव्हते. त्यामुळे शेतकरी कोंडीत सापडला होता. मात्र देशातील खरीप कांदा उत्पादक पट्ट्यात अतिवृष्टी व बुरशीजन्य रोगांमुळे नुकसान वाढल्याने हळूहळू सुरू होणारी आवक स्थानिक बाजारांमध्ये कमी होत आहे. परिणामी राज्यातून मागणी वाढल्याने उन्हाळ कांदा दरवाढीच्या दिशेने आहे. 

           मागील वर्षीच्या रब्बी उन्हाळ कांदा लागवडी लागवडी दोन वर्षीच्या तुलनेत कमीच होत्या. त्यात अवकाळी, गारपिटीमुळे त्या अजूनच अडचणीत वाढल्या. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कांदा उत्पादन घेऊन चांगला माल साठवला; मात्र भाव मिळत नसल्याने तो काहींनी विकला तर काही शेतकऱ्यांनी राखून ठेवला. नंतरच्या काळात वातावरणीय बदलांमुळे कांद्याची सड वाढली. या पार्श्वभूमीवर दर व नुकसान या दोन्ही बाजूने शेतकरी कोंडीत सापडला. एकीकडे साठा कमी होत गेला. याच दरम्यान सप्टेंबर महिन्यात राजस्थान, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यातील कांदा पीक अडचणीत सापडले. त्यामुळे १५ सप्टेंबरपासून महाराष्ट्रातून मागणीत वाढ होऊन कांदा दरात सुधारणा होत आहे. 

       दक्षिण भारतात १५ ऑगस्टनंतर खरीप कांद्याची स्थानिक बाजारात आवक वाढत जाते. जवळपास १ हजार वाहनांमधून ही आवक होत असते. मात्र ही आवक सध्या २५ टक्क्यांवर आली आहे. तर गुजरात व राजस्थानमधील लागवडी बुरशीजन्य रोग व अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडल्या आहेत. त्यामुळे मागणी व पुरवठा हे समीकरण व्यस्त झाल्याने सध्या मदार राज्यातील नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा या भागांतील कांद्यावर आहे. 

संपूर्ण देशभरात पुरवठा व निर्यातीत सुधारणा होत आहे. त्यामुळे दरात मागे पडलेला उन्हाळ कांदा आता भाव खात आहे. राज्यातील नाशिक विभागात नाशिक, धुळे व जळगाव जिल्ह्यांतही अतिवृष्टी व बुरशीजन्य रोगांमुळे आगाप खरीप कांदा लागवडीचे मोठे नुकसान आहे. त्यामुळे आगामी उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे पुढील दोन महिने दर टिकून राहतील, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. 

नाशिक जिल्ह्यातील प्रमुख 
बाजारामधील सरसरी दर स्थिती 
बाजार समिती.....सप्टेंबर...ऑक्टोबर 
पिंपळगाव बसवंत...१६८०...२६०१ 
लासलगाव...१७७१...२४५० 
सटाणा...१६५०....२५५० 
चांदवड...१६३२...२४०० 
मनमाड...१५२५...२४०० 
उमराणे...१५५०...२५५० 

दरवाढीची प्रमुख कारणे: 
-अल्वर(राजस्थान) भागात बुरशीजन्य रोगामुळे लागवडी अडचणीत 
-गोंडल (गुजरात) भागात पाऊस व बुरशीजन्य रोगांमुळे लागवडीचे नुकसान 
-अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील आगाप खरीप कांदा आवक लांबणीवर 
-आंध्र प्रदेशमधील कर्नुल व तेलंगणामधील गडवाल, वानापट्टी भागात उत्पादकतेत मोठी घट 
-कर्नाटकमध्ये दर वर्षीच्या तुलनेत लागवडी कमी, त्यासह उत्पादकता कमी 

प्रतिक्रिया 

कांद्याची मागणी वाढल्याने दरात सुधारणा झाली आहे. इतर खरीप कांदा उत्पादक पट्ट्यात नुकसान वाढल्याने त्या-त्या ठिकाणी मागणीप्रमाणे पुरवठा होऊ शकेल, अशी स्थिती नाही. त्यात महाराष्ट्रात आगाप खरीप कांद्याचे नुकसान वाढल्याने आवक कमी होण्याची चिन्हे आहेत. सध्या बाजारात उन्हाळ कांद्याची आवक होत असली तरी मागणी वाढल्याने पुरवठा वाढला आहे. दरात सुधारणा होत आहे. पुढील दोन महिने अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. 
-खंडूकाका देवरे, अध्यक्ष-नाशिक कांदा व्यापारी असोशिएशन  

सर्व कांद्याचे गणित मागणी पुरवठ्यावर असते. या परिस्थितीत नवीन पिक व्यवस्थित येईल, असे चित्र होते. मात्र अतिवृष्टी व रोगामुळे देशभरात कांदा उत्पादक भागात नुकसान आहे. त्यामुळे आवक सर्वसाधारण अन् मागणी वाढल्याने दरात वाढ होत आहे. देशावर व निर्यातीत मागणी वाढती आहे. 
-मनोज जैन, कांदा व्यापारी व निर्यातदार, लासलगाव, जि. नाशिक  

 
 


इतर ताज्या घडामोडी
सांगलीत दोन महिन्यांत डीएपीचा रॅक आलाच...सांगली : जिल्ह्यात रब्बी हंगामाची पेरणी ५२...
जिल्हा बॅंक निवडणुकीतून खासदार...सांगली ः जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या पंचवार्षिक...
सांगली मार्केट यार्डात हळद-गूळ...सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
खानदेशात कापसाच्या खेडा खरेदी दरात वाढजळगाव : खानदेशात कापसाची किमान ८६०० व कमाल ९२००...
तमिळनाडूला पावसाने झोडपले..चेन्नई : तमिळनाडूत चेन्नईसह अनेक जिल्ह्यात...
एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच; सरकारकडून...मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये...
‘आत्मा’ कर्मचाऱ्यांची पगार कपातीविरोधात...नागपूर : केंद्र सरकारनेच नव्या मार्गदर्शक...
तेलंगणातून भाताचे खरेदीसाठी मुख्यमंत्री...हैदराबाद : केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात...
२०२० मध्ये व्यापाऱ्यांच्या आत्महत्या...नवी दिल्ली : गेली दोन वर्षे कोरोनाचा विळखा...
सांगलीच्या परवान्यावर कर्नाटकात परस्पर...सांगली : येथील वसंतदादा मार्केट यार्डातील संतगोळ...
सिंधुदुर्गात पाऊस सुरूच, शेतकऱ्यांच्या...सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गात गेल्या सहा-सात...
लखीमपूर खेरी हिंसाचार : माजी...नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील...
मत्स्यपालनामध्ये खाद्याचा योग्य वापर...माशांच्या वाढीसाठी सकस व प्रथिनयुक्त आहाराची गरज...
वातावरण बदलाविरुद्ध क्रांतीच्या तीन दिशाभारताच्या उत्तर भागामधील सर्वांत जास्त...
हिरवी मिरची, कोबी, शेवगा दरांत वाढपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
कंटेनर्सची टंचाई पुढील वर्षीही...पुणे : चालू वर्षीत शेतीमालासह इतर वस्तूंच्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊससिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्याच्या काही भागांत शनिवारी...
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा तीस टक्के...रत्नागिरी ः दिवाळीत पडलेल्या मुसळधार पावसामुळे...
नाशिकमध्ये अवकाळीमुळे भात पिकांचे मोठे...नाशिक : ऐन दिवाळीच्या सणाला हवामान विभागाने...
गडचिरोलीत कृषिपंपांना २४ तास वीजपुरवठा...गडचिरोली ः वीज वितरणचे वरिष्ठ अधिकारी कृषिपंपाला...