agriculture news in Marathi summer nachni experiment used in state Maharashtra | Page 2 ||| Agrowon

कोल्हापूरच्या उन्हाळी नाचणी प्रयोगाचे राज्यभरात अनुकरण 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 1 मार्च 2021

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात राज्यातला पहिला उन्हाळी नाचणी उत्पादनाचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता राज्यातील इतर जिल्ह्यांमधेही या प्रयोगाचे अनुकरण होत आहे.

कोल्हापूर/नगर : कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात राज्यातला पहिला उन्हाळी नाचणी उत्पादनाचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता राज्यातील इतर जिल्ह्यांमधेही या प्रयोगाचे अनुकरण होत आहे. नगर जिल्ह्यातील खडकी बुद्रुक (ता. अकोले) या गावात यंदा २३ आदिवासी शेतकऱ्यांच्या माध्यमातून साडेआठ एकरांहून अधिक क्षेत्रावर उन्हाळी नाचणी लागवडीची प्रात्यक्षिके प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येत आहेत. 

दोन वर्षांपूर्वी पन्हाळा (जि. कोल्हापूर) तालुक्यातील किसरुळ, बाजारभोगाव, काळजवडे, पिसात्री, हरपवडे, तांदूळवाडी या गावांमधील अठरा शेतकऱ्यांनी पंधरा एकर क्षेत्रावर उन्हाळी नाचणी उत्पादनाचा पहिला यशस्वी प्रयोग केला होता. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) यांच्या मदतीने हा प्रयोग यशस्वी केला होता. उन्हाळ्यात नाचणीचे उत्पादन कित्येक पटीने जास्त मिळते हे या प्रयोगांमुळे सिद्ध झाल्याने गेल्या दोन वर्षांत उन्हाळी नाचणी लागवडीकडे शेतकरी मोठ्या संख्येने वळत असल्याचे दिसून येते आहे. 

या प्रयोगातून प्रेरणा घेऊन खडकी बुद्रुक येथे हा प्रयोग राबविण्यात येत आहे. नगरचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, प्रकल्प उपसंचालक राजाराम गायकवाड यांनी विशेष पुढाकार घेतला. तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक बाळनाथ सोनावणे, कृषी पर्यवेक्षक भगवान वाकचौरे, कृषी सहायक शरद लोहकरे यांनी शेतकऱ्यांना तयार केले. क्रांतिवीर सेंद्रिय भात उत्पादक गटाने उत्साह दाखवल्याने उन्हाळी नाचणीचा प्रयोग राबवणे शक्य झाल्याचे तालुका कृषी अधिकारी गोसावी यांनी सांगितले.

नुकतीच उन्हाळी नाचणी प्रकल्पाला आमदार डॉ. किरण लहामटे यांनी भेट देऊन माहिती घेतली आणि या नवीन प्रयोगाचे कौतुक केले. या प्रयोगासाठी विभागीय कृषी संशोधन प्रकल्प कोल्हापूर येथील नाचणी पैदासकार डॉ. योगेश बन, गगनबावड्याचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक पराग परीट, मिलेट असोसिएशन कोल्हापूर यांचे मार्गदर्शन होत आहे. 

प्रतिक्रिया 
उन्हाळी नाचणीचा प्रयोग फायदेशीर ठरत असल्याचे लक्षात आले आहे. या पुढील काळात नाचणी उत्पादन ते प्रक्रिया अशी साखळी निर्माण करण्याचे प्रयत्न आहेत. 
- बाळनाथ सोनावणे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, अकोले, जि. नगर 

धान्य आणि चारा निर्मितीसाठी उन्हाळी नाचणी एक उत्तम पर्याय म्हणून पुढे येत आहे. मिलेट असोसिएशनच्या माध्यमातून व्यापक दृष्टिकोनातून यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मिलेट असोसिएशनच्या माध्यमातून राज्यातील पौष्टिक लघू तृणधान्य उत्पादक शेतकऱ्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 
- कृषिभूषण सर्जेराव पाटील, अध्यक्ष, मिलेट असोसिएशन कोल्हापूर 


इतर ताज्या घडामोडी
पाच दिवसांत तब्बल ५० टन काजू बी खरेदी सिंधुदुर्गनगरी ः फळपीक बागायतदार संघाने गेल्या...
वाढत्या तापमानातील द्राक्ष बागेतील...प्रत्येक भागात सध्याच्या परिस्थितीचा विचार करता...
नगर : पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग...नगर : नैसर्गिक संकटाने तसेच अन्य कारणाने...
`दहिगाव उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर...सोलापूर ः करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन...
पुणे बाजार समिती चक्राकार पद्धतीने सुरू...पुणे : कोरोना विषाणू बाधित रुग्णाच्या झपाट्याने...
देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरीसोलापूर ः देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरी...
पाण्याच्या उपलब्धतेमुळे उन्हाळी...पुणे : गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे...
हिंगोली ः सोयाबीनची अडीच लाख हेक्टरवर...हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८...
अमरावतीत खरिपाचे ७ लाख हेक्टर क्षेत्र...अमरावती : कृषी विभागाच्या खरीप हंगाम २०२१...
नाशिक बाजार समितीच्या ‘त्या’ याचिका...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती...
बियाणे, खते, कीटकनाशक नियंत्रणासाठी...नाशिक : खरीप हंगामात बियाणे पेरणीचा कालावधी...
औरंगाबाद जिल्हाभरात फळे, भाजीपाला थेट...औरंगाबाद : शहरासह जिल्हाभरात राबविल्या जात...
लातूर जिल्ह्यात त्रेचाळीस हजार क्विंटल...लातूर: जिल्ह्यात कार्यान्वित १६ केंद्रांवरून २७५९...
अवैध दारू विक्रेत्यांना शासकीय योजनांचा...चंद्रपूर : अवैध दारू विक्रीमुळे सामाजिक स्वास्थ्य...
ऑक्सिजन प्रकल्प उभारणीचा अधिकार...मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची...
फळाचे ‘प्रमोशन’, मूल्यवर्धन होण्याची...चिकू बागायतदार संघाच्या वतीने राज्यातील चिकू...
अकोला जिल्हा परिषदेत खांदेपालटाची चर्चा अकोला : जिल्हा परिषदेत सत्तारूढ असलेल्या वंचित...
प्रक्रिया उद्योगाला चालना देणारनारळ लागवडीचे क्षेत्र वाढविताना शेतकऱ्यांच्या...
सामूहिक प्रयत्नातून काजू उत्पादकांची...जागतिक बाजारपेठेत वैशिष्ट्यपूर्ण चव असलेल्या...
क्षेत्र वाढ, प्रक्रियेसाठी सरकारी...देशात पेरू लागवडीचे सुमारे तीन लाख हेक्टर आणि...