परभणी ः ‘‘परभणी जिल्हा परिषदेच्या यंदाच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात कृषी तसेच पशुसंवर्धन
अॅग्रो विशेष
उन्हाळ कांद्याची बाजारात ‘एन्ट्री’
जिल्ह्यात रब्बी हंगामातील आगाप उन्हाळ कांद्याची आवक लासलगाव व पिंपळगाव बाजार समितीमध्ये सुरू झाली आहे.
नाशिक : जिल्ह्यात रब्बी हंगामातील आगाप उन्हाळ कांद्याची आवक लासलगाव व पिंपळगाव बाजार समितीमध्ये सुरू झाली आहे. दरवर्षी होणाऱ्या आवकेच्या कालावधीच्या दोन ते तीन आठवडे अगोदर कांदा दाखल झाला आहे. मात्र सध्या आवक अत्यंत कमी असून कांद्याला सरासरी ३६०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे.
जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव बसवंत या बाजार आवारात मार्चपासून हळूहळू नवीन उन्हाळ कांद्याची आवक सुरू होते. मात्र यंदा फेब्रुवारीच्या मध्यातच आवक सुरू झाली आहे. अतिवृष्टीमुळे लाल कांद्याच्या रोपवाटिका बाधित झाल्या. त्यामुळे घरगुती उन्हाळ कांद्याच्या बियाण्यांपासून शेतकऱ्यांनी रोपवाटिका हंगामपूर्व तयार केल्या. त्यामुळे नोव्हेंबर सुरुवातीला आगाप उन्हाळ कांद्याच्या लागवडी झाल्या. त्याचे उत्पादन हाती येत आहे. मात्र होणारी आवक अत्यंत कमी असून प्रतवारीमध्ये कांद्याचा अपेक्षित आकार झाला नसल्याचे दिसून येते.
अतिवृष्टी, अवकाळी यासह रोगाचा प्रादुर्भाव असल्याने खरीप कांदा लागवडी बाधित झाल्याने उत्पादनात मोठी घट आहे. तर अवकाळीचा फटकाही उन्हाळ कांद्याला बसलेला आहे. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात उन्हाळ कांद्याची आवक होत असल्याने पुरवठ्याला थोडाफार आधार होत आहे.
मिळणारा परतावा व्यवहार्य नाहीच...
आगाप लागवडीमुळे उन्हाळ कांदा बाजारात येऊ लागला आहे. तर काही शेतकरी लॉककडाऊन होण्याच्या भीतीपोटी पक्व नसलेला माल आणत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अपेक्षित उत्पादन नाही. दर सध्या चांगले असले तरी वाढलेला उत्पादन व पीक संरक्षण खर्च, घटलेले एकरी उत्पादन व इंधन दरवाढीमुळे वाढलेला वाहतूक खर्च यामध्ये यामुळे मिळणारा परतावा व्यवहार्य नसल्याची स्थिती आहे.
पिंपळगाव बसवंत येथे आवक मर्यादित
पिंपळगाव बसवंत बाजार आवारात १३ फेब्रुवारीपासून आवक सुरू झाली आहे. सुरुवातीला १० क्विंटल आवक झाली होती. त्यास प्रतिक्विंटल ३५०० रुपये दर मिळाला होता. तर २० फेब्रुवारीला २५० क्विंटल आवक झाली. त्यास ३६५१ दर मिळाला. सोमवारी (ता.२२) ३२५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३९०० सरासरी दर मिळाला.
बाजारातील आवकेची स्थिती
- उन्हाळ कांद्याला खरीप कांद्याप्रमाणे दर चांगला
- कांद्याचा आकार व प्रतवारी जेमतेम
- नियमित आवकेच्या तुलनेत आवक किरकोळ
- शेतकऱ्यांचा उत्पन्न, खर्चाचा ताळमेळ बसेना
लासलगाव बाजार समितीत दराची स्थिती
दिनांक | आवक | किमान | कमाल | सरासरी |
१६ फेब्रुवारी | ४९० | २००१ | ४०११ | ३५०० |
१७ फेब्रुवारी | ६६० | १००० | ४२४१ | ३५७० |
१८ फेब्रुवारी | ५९८ | १५०० | ४०८५ | ३५५१ |
१९ फेब्रुवारी | १६६ | ३४५२ | ४२०१ | ४००० |
२० फेब्रुवारी | ५४४ | १६०१ | ४११२ | ३८०१ |
२२ फेब्रुवारी | ११०० | ११०० | ४२२० | ३७५० |
२३ फेब्रुवारी | २०० | २१०० | ३८९० | ३६०० |
प्रतिक्रिया
सध्या देशांतर्गत मागणी असल्याने दर मिळतो आहे. मात्र निर्यातीसाठी अपेक्षित आकार, प्रतवारी व दरात सुधारणा असल्याने असल्याने निर्यात सध्या कमीच आहे.
- मनोज जैन, कांदा व्यापारी व निर्यातदार, लासलगाव, जि. नाशिक
लाल कांद्याची रोपे खराब झाल्याने काहींनी लवकर उन्हाळ कांद्याचे रोपे टाकून लागवडी केल्या. त्यामुळे सध्या लवकर कांदा बाजारात येत आहे. मात्र आवक अत्यंत कमी आहे.
- नरेंद्र वाढवणे, सचिव, बाजार समिती, लासलगाव, जि. नाशिक
- 1 of 674
- ››