agriculture news in Marathi summer onion arrival in market Maharashtra | Page 2 ||| Agrowon

उन्हाळ कांद्याची बाजारात ‘एन्ट्री’ 

मुकुंद पिंगळे
बुधवार, 24 फेब्रुवारी 2021

जिल्ह्यात रब्बी हंगामातील आगाप उन्हाळ कांद्याची आवक लासलगाव व पिंपळगाव बाजार समितीमध्ये सुरू झाली आहे.

नाशिक : जिल्ह्यात रब्बी हंगामातील आगाप उन्हाळ कांद्याची आवक लासलगाव व पिंपळगाव बाजार समितीमध्ये सुरू झाली आहे. दरवर्षी होणाऱ्या आवकेच्या कालावधीच्या दोन ते तीन आठवडे अगोदर कांदा दाखल झाला आहे. मात्र सध्या आवक अत्यंत कमी असून कांद्याला सरासरी ३६०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. 

जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव बसवंत या बाजार आवारात मार्चपासून हळूहळू नवीन उन्हाळ कांद्याची आवक सुरू होते. मात्र यंदा फेब्रुवारीच्या मध्यातच आवक सुरू झाली आहे. अतिवृष्टीमुळे लाल कांद्याच्या रोपवाटिका बाधित झाल्या. त्यामुळे घरगुती उन्हाळ कांद्याच्या बियाण्यांपासून शेतकऱ्यांनी रोपवाटिका हंगामपूर्व तयार केल्या. त्यामुळे नोव्हेंबर सुरुवातीला आगाप उन्हाळ कांद्याच्या लागवडी झाल्या. त्याचे उत्पादन हाती येत आहे. मात्र होणारी आवक अत्यंत कमी असून प्रतवारीमध्ये कांद्याचा अपेक्षित आकार झाला नसल्याचे दिसून येते. 

अतिवृष्टी, अवकाळी यासह रोगाचा प्रादुर्भाव असल्याने खरीप कांदा लागवडी बाधित झाल्याने उत्पादनात मोठी घट आहे. तर अवकाळीचा फटकाही उन्हाळ कांद्याला बसलेला आहे. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात उन्हाळ कांद्याची आवक होत असल्याने पुरवठ्याला थोडाफार आधार होत आहे. 

मिळणारा परतावा व्यवहार्य नाहीच... 
आगाप लागवडीमुळे उन्हाळ कांदा बाजारात येऊ लागला आहे. तर काही शेतकरी लॉककडाऊन होण्याच्या भीतीपोटी पक्व नसलेला माल आणत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अपेक्षित उत्पादन नाही. दर सध्या चांगले असले तरी वाढलेला उत्पादन व पीक संरक्षण खर्च, घटलेले एकरी उत्पादन व इंधन दरवाढीमुळे वाढलेला वाहतूक खर्च यामध्ये यामुळे मिळणारा परतावा व्यवहार्य नसल्याची स्थिती आहे. 

पिंपळगाव बसवंत येथे आवक मर्यादित 
पिंपळगाव बसवंत बाजार आवारात १३ फेब्रुवारीपासून आवक सुरू झाली आहे. सुरुवातीला १० क्विंटल आवक झाली होती. त्यास प्रतिक्विंटल ३५०० रुपये दर मिळाला होता. तर २० फेब्रुवारीला २५० क्विंटल आवक झाली. त्यास ३६५१ दर मिळाला. सोमवारी (ता.२२) ३२५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३९०० सरासरी दर मिळाला. 

बाजारातील आवकेची स्थिती 

  • उन्हाळ कांद्याला खरीप कांद्याप्रमाणे दर चांगला 
  • कांद्याचा आकार व प्रतवारी जेमतेम 
  • नियमित आवकेच्या तुलनेत आवक किरकोळ 
  • शेतकऱ्यांचा उत्पन्न, खर्चाचा ताळमेळ बसेना 

लासलगाव बाजार समितीत दराची स्थिती

दिनांक आवक किमान कमाल सरासरी
१६ फेब्रुवारी ४९० २००१ ४०११ ३५०० 
१७ फेब्रुवारी ६६० १००० ४२४१ ३५७० 
१८ फेब्रुवारी ५९८ १५०० ४०८५ ३५५१ 
१९ फेब्रुवारी १६६ ३४५२ ४२०१ ४००० 
२० फेब्रुवारी ५४४ १६०१ ४११२ ३८०१ 
२२ फेब्रुवारी ११०० ११०० ४२२० ३७५०
२३ फेब्रुवारी २०० २१०० ३८९० ३६०० 

प्रतिक्रिया 
सध्या देशांतर्गत मागणी असल्याने दर मिळतो आहे. मात्र निर्यातीसाठी अपेक्षित आकार, प्रतवारी व दरात सुधारणा असल्याने असल्याने निर्यात सध्या कमीच आहे. 
- मनोज जैन, कांदा व्यापारी व निर्यातदार, लासलगाव, जि. नाशिक 

लाल कांद्याची रोपे खराब झाल्याने काहींनी लवकर उन्हाळ कांद्याचे रोपे टाकून लागवडी केल्या. त्यामुळे सध्या लवकर कांदा बाजारात येत आहे. मात्र आवक अत्यंत कमी आहे. 
- नरेंद्र वाढवणे, सचिव, बाजार समिती, लासलगाव, जि. नाशिक 


इतर अॅग्रो विशेष
चैत्री यात्राही यंदा प्रतिकात्मक...सोलापूर ः कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍...
अवजारे उद्योगावर मंदीचे ढग पुणेः राज्यात पाच अब्ज रुपयांची उलाढाल करणाऱ्या...
फळे, भाजीपाला थेट पणन परवान्याला ६...पुणे ः कोरोना टाळेबंदीत शेतीमालाचे नुकसान होऊ नये...
देशाची साखर उत्पादनात उच्चांकी झेप कोल्हापूर ः साखर उत्पादनात देशाची घोडदौड ३०० लाख...
क्यूआर कोड रोखणार हापूसमधील भेसळ रत्नागिरी ः बाजारपेठेमध्ये ‘हापूस’ची कर्नाटक...
जालन्यात वर्षभरात ४२९ टन रेशीम कोष...जालना : येथे प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात...
राज्यात उन्हाचा चटका वाढणार पुणे : आठवडाभर पूर्वमोसमी पावसाने धुमाकूळ...
भाजीपाला विकण्याचे शेतकऱ्यांपुढे आव्हान...कोल्हापूर : ‘ब्रेक द चेन’च्या नवीन...
आठवडी बाजारांचे नेटवर्क उभारत यशस्वी...पुणे येथील नरेंद्र पवार व चार मित्रांनी एकत्र...
धान्य प्रक्रियेतून ‘संत तेजस्वी’ ची...शेतकरी गटापासून वाटचाल करीत देऊळगावमाळी (जि....
कोविडला नैसर्गिक आपत्ती घोषित करा ः...मुंबई ः राज्यातल्या ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्‍...
उन्हाळी काकडीने उंचावले धामणखेलचे...बाजारपेठेची मागणी ओळखून धामणखेल (ता. जुन्नर. जि....
कडवंचीचे द्राक्ष आगार तोट्यात जालना : जिल्ह्यातील द्राक्षाचे आगार म्हणून ओळख...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारांनी...पुणे : गेल्या चार ते पाच दिवसांपासून मध्य...
सोयाबीन बियाणे वाहतुकीसाठी अट पुणे : सोयाबीन बियाणे उत्पादक कंपन्यांनी वाहतूक...
काळ्या गव्हाच्या लागवडीची...नाशिक : काळ्या गव्हामध्ये पौष्टिकता, औषधी गुणधर्म...
सांगलीत बेदाण्याचे सौदे पंधरा दिवस बंदच सांगली ः कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने सांगली...
विदर्भात आज पावसाची शक्यता पुणे : मागील आठ दिवसांपासून वादळी पावसाने अनेक...
आवारात गर्दी नियंत्रणासाठी प्रभावी...पुणे : ‘ब्रेक द चेन’ मोहिमेअंतर्गत कोरोना...
पुणे बाजार समिती शनिवार-रविवार बंद; इतर...पुणे : पुणे बाजार समिती सोमवार ते शुक्रवार...