उन्हाळ कांद्याची आवक घटली; दरात सुधारणा 

उन्हाळ कांद्याच्या मागील वर्षी मोठ्या प्रमाणावर लागवडी झाल्या. मात्र, उत्पादकता घटली. त्यातच दराच्या भीतीने ऑगस्टपर्यंत साठविलेला कांदा मोठ्या प्रमाणात विक्री झाला.
onion
onion

नाशिक: उन्हाळ कांद्याच्या मागील वर्षी मोठ्या प्रमाणावर लागवडी झाल्या. मात्र, उत्पादकता घटली. त्यातच दराच्या भीतीने ऑगस्टपर्यंत साठविलेला कांदा मोठ्या प्रमाणात विक्री झाला. त्यामुळे बाजारात कांद्याची आवक  घटली आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा साखळी विस्कळित झाल्याने कांद्याच्या दरात सुधारणा असून दराने ५ हजारांचा टप्पा ओलांडला असून ६ हजारांवर जाण्याची शक्यता आहे. 

ऑक्टोबरनंतर कांदा पुरवठ्याचे गणित प्रामुख्याने खरीप कांद्यावर अवलंबून असते. हा कांदा देशात अनेक राज्यांमध्ये लागवड होतो. मात्र अतिवृष्टीमुळे राज्यासह दक्षिणेकडील आंध्र प्रदेश, कर्नाटक तसेच मध्य प्रदेशातील नवीन लाल कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले. तर चाळीत पाठविलेला शिल्लक असलेल्या उन्हाळ कांद्याची मागणी देशांतर्गत वाढली आहे. त्यामुळे पुरवठ्याच्या तुलनेत देशांतर्गत मागणी वाढल्याने कांदा भाव खात असल्याची स्थिती आहे. 

गत सप्ताहात लासलगाव मुख्य बाजार आवारावर  उन्हाळ कांद्याची१७ हजार ८५४ क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान १००० तर कमाल ४८१२ तर सर्वसाधारण ४२१७ रुपये प्रती क्विंटल राहीले. ही आवक कमी आहे. यासह  जिल्ह्यातील प्रमुख बाजार समितीत आवक अत्यंत कमी होत असल्याचे चित्र आहे. यानंतर प्रमुख बाजार असलेल्या पिंपळगाव बसवंत, उमराने, देवळा, नामपूर, सटाणा, कळवण, येवला येथेही आवक कमीच होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. 

दरवाढीची प्रमुख कारणे 

  • उन्हाळ कांद्याची आवक कमी 
  • मागणी व पुरवठा साखळी विस्कळित 
  • आवक होत असलेल्या कांद्याची गुणवत्ता व टिकवणं क्षमता कमीच 
  • ऑक्टोबर मध्यावधीपासून होणारी खरीप कांद्याची आवक नगण्य 
  • देशातील खरीप कांदा लागवडी खराब झाल्याने पुरवठ्यावर ताण 
  • प्रतिक्रिया चालू वर्षी ८२ हजार हेक्टरवर खरीप कांद्याची लागवड आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ती दुपटीने वाढली आहे. तरी लागवडी अति पावसाने बाधित झाल्याने बाजारात खरीप  कांद्याच्या आवकेवर परिणाम असल्याने दरात पुढील महिन्यापर्यंत तेजी कायम राहण्याची स्थिती आहे.  - दीपक चव्हाण, शेतमाल बाजारभाव अभ्यासक  शेतकऱ्यांनी सुरुवातीला जो कांदा विकला त्यात गुणवत्तेच्या अडचणी होत्या. नंतरच्या टप्प्यात साठविलेला कांद्याची सड झाल्याने आवक घटली आहे. त्यात खरीप कांद्याची आवक नसल्याने ही दरवाढ कायम आहे.  - सुनील ठक्कर, कांदा व्यापारी, पिंपळगाव बसवंत  चालु वर्षी भाव नसल्याने टप्प्या टप्प्याने विक्री केली. मात्र नंतर सड वाढली. त्यामुळे कमी आवक व मागणी अधिक असल्याने दर सुधारले. आता भाव वाढत असल्याने टप्प्या टप्प्याने विक्री होत आहे.  -पंडित वाघ, कांदा उत्पादक, बार्डे, ता.कळवण 

    शनिवारी झालेली कांदा आवक व दर (रुपये/प्रतिक्विंटल)

    बाजार समिती आवक किमान कमाल सरासरी 
    पिंपळगाव बसवंत ४४९० २७०० ७०५१ ५६७१ 
    मनमाड ८५० १५०० ५२७५ ४८०० 
    चांदवड ३००० १९०० ६२५१ ५५०० 
    अभोणा, कळवण २५०० २००० ६००० ५५०  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com