agriculture news in Marathi summer onion crop arrival in market Maharashtra | Agrowon

उन्हाळ कांद्याची आवक घटली; दरात सुधारणा 

टीम अॅग्रोवन
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

उन्हाळ कांद्याच्या मागील वर्षी मोठ्या प्रमाणावर लागवडी झाल्या. मात्र, उत्पादकता घटली. त्यातच दराच्या भीतीने ऑगस्टपर्यंत साठविलेला कांदा मोठ्या प्रमाणात विक्री झाला. 

नाशिक: उन्हाळ कांद्याच्या मागील वर्षी मोठ्या प्रमाणावर लागवडी झाल्या. मात्र, उत्पादकता घटली. त्यातच दराच्या भीतीने ऑगस्टपर्यंत साठविलेला कांदा मोठ्या प्रमाणात विक्री झाला. त्यामुळे बाजारात कांद्याची आवक  घटली आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा साखळी विस्कळित झाल्याने कांद्याच्या दरात सुधारणा असून दराने ५ हजारांचा टप्पा ओलांडला असून ६ हजारांवर जाण्याची शक्यता आहे. 

ऑक्टोबरनंतर कांदा पुरवठ्याचे गणित प्रामुख्याने खरीप कांद्यावर अवलंबून असते. हा कांदा देशात अनेक राज्यांमध्ये लागवड होतो. मात्र अतिवृष्टीमुळे राज्यासह दक्षिणेकडील आंध्र प्रदेश, कर्नाटक तसेच मध्य प्रदेशातील नवीन लाल कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले. तर चाळीत पाठविलेला शिल्लक असलेल्या उन्हाळ कांद्याची मागणी देशांतर्गत वाढली आहे. त्यामुळे पुरवठ्याच्या तुलनेत देशांतर्गत मागणी वाढल्याने कांदा भाव खात असल्याची स्थिती आहे. 

गत सप्ताहात लासलगाव मुख्य बाजार आवारावर  उन्हाळ कांद्याची१७ हजार ८५४ क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान १००० तर कमाल ४८१२ तर सर्वसाधारण ४२१७ रुपये प्रती क्विंटल राहीले. ही आवक कमी आहे. यासह  जिल्ह्यातील प्रमुख बाजार समितीत आवक अत्यंत कमी होत असल्याचे चित्र आहे. यानंतर प्रमुख बाजार असलेल्या पिंपळगाव बसवंत, उमराने, देवळा, नामपूर, सटाणा, कळवण, येवला येथेही आवक कमीच होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. 

दरवाढीची प्रमुख कारणे 

  • उन्हाळ कांद्याची आवक कमी 
  • मागणी व पुरवठा साखळी विस्कळित 
  • आवक होत असलेल्या कांद्याची गुणवत्ता व टिकवणं क्षमता कमीच 
  • ऑक्टोबर मध्यावधीपासून होणारी खरीप कांद्याची आवक नगण्य 
  • देशातील खरीप कांदा लागवडी खराब झाल्याने पुरवठ्यावर ताण 

प्रतिक्रिया
चालू वर्षी ८२ हजार हेक्टरवर खरीप कांद्याची लागवड आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ती दुपटीने वाढली आहे. तरी लागवडी अति पावसाने बाधित झाल्याने बाजारात खरीप  कांद्याच्या आवकेवर परिणाम असल्याने दरात पुढील महिन्यापर्यंत तेजी कायम राहण्याची स्थिती आहे. 
- दीपक चव्हाण, शेतमाल बाजारभाव अभ्यासक 

शेतकऱ्यांनी सुरुवातीला जो कांदा विकला त्यात गुणवत्तेच्या अडचणी होत्या. नंतरच्या टप्प्यात साठविलेला कांद्याची सड झाल्याने आवक घटली आहे. त्यात खरीप कांद्याची आवक नसल्याने ही दरवाढ कायम आहे. 
- सुनील ठक्कर, कांदा व्यापारी, पिंपळगाव बसवंत 

चालु वर्षी भाव नसल्याने टप्प्या टप्प्याने विक्री केली. मात्र नंतर सड वाढली. त्यामुळे कमी आवक व मागणी अधिक असल्याने दर सुधारले. आता भाव वाढत असल्याने टप्प्या टप्प्याने विक्री होत आहे. 
-पंडित वाघ, कांदा उत्पादक, बार्डे, ता.कळवण 

शनिवारी झालेली कांदा आवक व दर (रुपये/प्रतिक्विंटल)

बाजार समिती आवक किमान कमाल सरासरी 
पिंपळगाव बसवंत ४४९० २७०० ७०५१ ५६७१ 
मनमाड ८५० १५०० ५२७५ ४८०० 
चांदवड ३००० १९०० ६२५१ ५५०० 
अभोणा, कळवण २५०० २००० ६००० ५५०  

 


इतर बातम्या
इगतपुरी, सिन्नर तालुक्यात पावसामुळे...नाशिक : दसरा व दिवाळी सणाची बाजारपेठ समोर ठेऊन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा १७ हजार...सांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी...
खानदेशात दुष्काळी भागात मुबलक जलसाठा जळगाव ः खानदेशातील आवर्षप्रवण भागातील  ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात साडेसहा हजार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात परतीच्या पावसाने नुकसान...
सांगली जिल्ह्यात द्राक्षबागा...सांगली : गेल्या वर्षी झालेल्या अतिवष्टीमुळे...
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षाअकोला ः शासनाने शुक्रवारी (ता.२३) जाहीर...
‘पाटबंधारे’च्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे...नाशिक : गेल्या २५ वर्षांपासून बागलाण तालुक्यातील...
सातारा जिल्ह्यास पावसाने पुन्हा झोडपलेसातारा ः जिल्ह्यातील माण, खटाव, कऱ्हाड,...
पिंपळगावला आडत्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक: निफाड तालुक्यातील कारसूळ येथील शेतकरी...
अवजारे अनुदानाचे निकष वाढवलेपुणे : राज्यात कृषी अवजारे अनुदानासाठी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका...
बदल्या, मारहाण, लाचखोरीने गाजतेय राहुरी...पुणे: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आवारात...
कापूस, मका हमीभावाकडे दुर्लक्षः...जळगाव ः कापूस, मका हे राज्यात महत्त्वाचे पीक...
मॉन्सूनच्या माघारीस पोषक वातावरण पुणे : मॉन्सून दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्र व...
काही ठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कमी झाला...
व्यापाऱ्यांवरील कांदा साठा...पुणे/नाशिक: पुरवठा कमी असल्याने देशभरात कांद्याची...
वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निधन नाशिक: स्थानिक पातळीवरून थेट राज्याच्या राजकारणात...
पावसानं पांढऱ्या सोन्याची झाली माती !औरंगाबाद: यंदा पाऊस चांगला सांगितल्याने शेतीच्या...
चौथ्या बैठकीतही ऊसतोडणी दरवाढीवर तोडगा...नगर ः ऊसतोडणी मजुरांच्या तोडणी दरात वाढ करावी...
राज्यात पाऊस कमी होणारसोमवारपासून ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहणार...