Agriculture news in marathi Summer onion in Nashik Demand increased; Rate improvement | Agrowon

नाशिकमध्ये उन्हाळ कांद्याची मागणी वाढली; दरात सुधारणा

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 12 ऑक्टोबर 2021

नाशिक: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत सप्ताहामध्ये उन्हाळ कांद्याची आवक वाढली आहे. गत सप्ताहात आवक १८,५१० क्विंटल झाली. आवकेत वाढ होऊनही मागणी असल्याने दरात सुधारणा दिसून आली.

नाशिक: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत सप्ताहामध्ये उन्हाळ कांद्याची आवक वाढली आहे. गत सप्ताहात आवक १८,५१० क्विंटल झाली. आवकेत वाढ होऊनही मागणी असल्याने दरात सुधारणा दिसून आली. त्यास प्रतिक्विंटल १,२०० ते ३,६०० मिळाला. तर सरासरी दर २,७०० रुपये राहिला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

बाजार आवारात लसणाची आवक २८३ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ३,००० ते ९,५०० तर सरासरी दर ७,२०० रुपये राहिला. बटाट्याची आवक ७,१८५ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ४५० ते १,४०० तर सरासरी दर ८०० रुपये राहिला. आल्याची आवक ५५२ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ४,००० ते ५,५०० तर सरासरी दर ४,५०० रुपये राहिला.

सप्ताहात भाजीपाल्याच्या आवकेनुसार चढ-उतार झाला. वालपापडी-घेवड्याची आवक ६,००८ क्विंटल झाली. वालपापडीला प्रतिक्विंटल ४,००० ते ५,५०० असा, तर सरासरी दर ४,७०० रुपये राहिला. घेवड्याला प्रतिक्विंटल २,००० ते ३,०००, तर सरासरी दर २,५०० रुपये राहिला. हिरव्या मिरचीची आवक ३१५ क्विंटल झाली. लवंगी मिरचीला प्रतिक्विंटल २,५०० ते ३,५०० रुपये, तर सरासरी दर ३,००० रुपये मिळाला. मागणी सर्वसाधारण असल्याने बाजारभाव स्थिर होते. वाटाण्याची आवक १६९ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १२,००० ते १४,००० तर सरासरी दर १३,००० रुपये राहिला. गाजराची आवक २,१४३ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २,००० ते ३,००० तर सरासरी दर २,५०० रुपये राहिला.

फळभाज्यांमध्ये टोमॅटोला २०० ते १,२०० तर सरासरी ६००, वांगी ४०० ते १,०००, तर सरासरी ७०० व फ्लॉवर १५० ते ४८०सरासरी ३७५ रुपये असे दर प्रति १४ किलोस मिळाले. कोबीला ८० ते ८०, तर सरासरी ५५ रुपये असे दर प्रति २० किलोस मिळाले. ढोबळी मिरचीला ३५० ते ६००, तर सरासरी दर ४५० रुपये असे दर प्रति ९ किलोस मिळाले.

वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये भोपळा १०० ते ३५५, तर सरासरी १७०,कारले १४० ते २१०, तर सरासरी १७०, गिलके ३२५ ते ४६५ तर सरासरी ४००,दोडका ३०० ते ४४० तर सरासरी दर ३७० रुपये असे प्रति १२ किलोस दर मिळाले. फळांमध्ये केळीची आवक १,४२० क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ८०० ते १,५००, तर सरासरी दर १,२५० रुपये मिळाला. डाळिंबाची आवक ९,४८१ क्विंटल झाली. मृदुला वाणास ४०० ते २०,००० तर सरासरी १०,००० रुपये दर मिळाला. 


इतर बाजारभाव बातम्या
सोलापुरात सिमला मिरची, वांगी, गवार तेजीतसोलापूर ः सोलापूर बाजार समितीच्या आवारात...
नाशिकमध्ये डाळिंब दरात सुधारणानाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शेवगा २००० रुपये प्रतिदहा किलोपुणे ः पुणे बाजार समितीमध्ये रविवारी (ता.२८)...
राज्यात कांदा ३०० ते ३५०० रुपये क्विंटलसोलापुरात क्विंटलला १००० ते ३५०० रुपये...
नाशिकमध्ये घेवड्याच्या आवकेत वाढ; दर...नाशिक : येथील बाजार समितीमध्ये वालपापडी-...
नगर येथे टोमॅटो, घेवडा दरात सुधारणानाशिक नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी बाजार...
बहुतांश भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे ः पुणे बाजार समितीमध्ये रविवारी (ता.२१)...
राज्यात भेंडी ६०० ते ४५०० रुपये क्विंटलऔरंगाबादमध्ये क्विंटलला २५०० ते ३००० रुपये...
सोलापुरात वांग्यांच्या, टोमॅटोच्या दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगर बाजार समितीत भाजीपाला आवक स्थिरनगरः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
औरंगाबादमध्ये मक्याला हमी दराच्या आतच दरऔरंगाबाद : येथील कृषी बाजार समितीमध्ये मक्याची...
नाशिकमध्ये डाळिंबांच्या दरात तेजी;आवक...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
पुण्यात भाजीपाल्यांचे दर स्थिर पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...
राज्यात लिंबे २५० ते २६०० रुपये क्विंटलअकोल्यात क्विंटलला ८०० ते १२०० रुपये अकोला ः...
नगरमध्ये टोमॅटो, वांगी, कारल्याला अधिक...नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
सोलापुरात गवार, भेंडी, हिरव्या...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कळमणा बाजार समितीत सोयाबीन ५७५० रुपयांवरनागपूर ः कळमणा बाजार समितीत सोयाबीन दरात घसरण...
हिरवी मिरची, कोबी, शेवगा दरांत वाढपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
केळी दरांवर दबाव वाढताचजळगाव ः खानदेशात केळी दरांवर दबाव वाढतच आहे....
सोयाबीनच्या दरात वाशीममध्ये सुधारणावाशीम : वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीत...