उन्हाळी वरीचा प्रयोग यशस्वी होण्याच्या मार्गावर

कोल्हापूर: राज्यातला पहिलाच प्रयोग असलेली ‘उन्हाळी वरी’ आता फुलोरा अवस्थेतून दाणे भरण्याच्या स्वरूपात बहरून आली आहे. लोंब्या टपोऱ्या आणि लांबसडक आहेत. पावसाळी वरीच्या लोंबीपेक्षा दुप्पट आकाराची म्हणजे बारा ते पंधरा इंच लांब आणि दाण्याचा आकारही मोहरी एवढा आहे. पावसाळी वरीचा आकार साधारणपणे खसखशीच्या दाण्या एवढा असतो. पिसात्री (ता.पन्हाळा) येथील प्रयोगशील शेतकरी मिलिंद पाटील यांनी हा प्रयोग केला आहे.
उन्हाळी वरीचा प्रयोग यशस्वी होण्याच्या मार्गावर
उन्हाळी वरीचा प्रयोग यशस्वी होण्याच्या मार्गावर

कोल्हापूर : राज्यातला पहिलाच प्रयोग असलेली ‘उन्हाळी वरी’ आता फुलोरा अवस्थेतून दाणे भरण्याच्या स्वरूपात बहरून आली आहे. लोंब्या टपोऱ्या आणि लांबसडक आहेत. पावसाळी वरीच्या लोंबीपेक्षा दुप्पट आकाराची म्हणजे बारा ते पंधरा इंच लांब आणि दाण्याचा आकारही मोहरी एवढा आहे. पावसाळी वरीचा आकार साधारणपणे खसखशीच्या दाण्या एवढा असतो. पिसात्री (ता.पन्हाळा) येथील प्रयोगशील शेतकरी मिलिंद पाटील यांनी हा प्रयोग केला आहे. याबद्दल बोलताना मिलिंद पाटील यांनी सांगितले, ‘‘रोपवाटिकेत रोपांचे वय पस्तीस दिवसांचे असताना जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात मुख्य शेतात वरीची रोप लागण करण्यात आली, धड हिवाळा नाही धड उन्हाळा नाही असं विचित्र ऋतुमान असतानाही आणि त्यात मधूनच बनणारं ढगाळ वातावरण अशी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत या महत्वाकांक्षी प्रयोगासाठी सुरुवातीपासूनच राहिली.’’  श्री. पाटील म्हणाले,‘‘पन्नासाव्या दिवशी तर मुख्य  रोपे सव्वाफुटांची, फुटव्यांची संख्या सरासरी पाच-सहा आणि फुटव्यांची उंची मात्र चार इंच असे निराशाजनक चित्र दिसू लागले. भरीसभर म्हणून मुख्य रोपाला अवकाळी लोंबी पडू लागली. पहिलाच प्रयोग असल्यामुळे ह्या बद्दलच्या शंकाकुशंकांचे निराकरण करणारा आणि इतर पालनपोषणाचा अभ्यास उपलब्ध नव्हता. परिणामी पाण्याचे, खतांचे प्रमाण माहीत नाही, तरीही गेल्या वर्षीच्या उन्हाळी नाचणीच्या प्रयोग सहभागातून आलेले अनुभव गृहीतक मानून, घातीने पाणी, मिश्रखते, संजीवके, सूक्ष्म अन्नद्रव्ये, आणि ढगाळ वातावरणामुळे  संभाव्य किडी, रोग प्रादूर्भाव  लक्षात घेऊन वरीला जपण्याचा अटोकाट प्रयत्न केला. ह्या सगळ्यांच्या एकत्रित परिणामामुळे वरीने टिकाव धरला.’’  ‘‘एकूण शंभर दिवसांचे हे पीक आज सत्तर दिवसांचे आहे. प्रत्येक फुटव्याला साधारण एक फूट लांबीची लोंबी आहे काही लोंब्या पक्व झालेल्या आहेत तर काही अद्याप हिरव्या आहेत. चांगल्या उत्पादनाची आशा आहे. वरीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे दाणे भरून वाळून तयार झाले तरी ते सहजासहजी झडत नाहीत. त्यामुळे सर्व लोंब्या वाळून तयार झाल्यावरच कापणी केली तरी चालू शकते.या उत्पादित पिकाचा काही भाग बियाणे म्हणून नीट ठेवणीत साठवून ठेवला जाणार आहे, जेणेकरून नव्या वाटा धुंडाळणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल,’’ असे श्री. पाटील म्हणाले

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com