Agriculture news in Marathi Summer season of 'Kukdi' to be released on June 6: Rohit Pawar | Agrowon

‘कुकडी’चे उन्हाळी आवर्तन सहा जूनला सुटणार : रोहित पवार

टीम अॅग्रोवन
सोमवार, 1 जून 2020

नगर : ‘कुकडी’च्या उन्हाळी आवर्तनासाठी पुणे येथे झालेल्या बैठकीत येत्या सहा जून रोजी ‘कुकडी’चे उन्हाळी आवर्तन सुटणार असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली. उन्हाळी आवर्तनाच्या नियोजनासाठी शुक्रवारी पुणे येथील सिंचन भवनात बैठक आयोजित करण्यात आली होती.

नगर : ‘कुकडी’च्या उन्हाळी आवर्तनासाठी पुणे येथे झालेल्या बैठकीत येत्या सहा जून रोजी ‘कुकडी’चे उन्हाळी आवर्तन सुटणार असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली. उन्हाळी आवर्तनाच्या नियोजनासाठी शुक्रवारी पुणे येथील सिंचन भवनात बैठक आयोजित करण्यात आली होती.

पुणे येथे झालेल्या बैठकीसाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील, जलसंपदा विभागाचे सचिव राजेंद्र पवार, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक खलील अन्सारी, कुकडी सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता हनुमंत धुमाळ, कुकडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे, कुकडी वितरण बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रामदास जगताप, आमदार रोहित पवार, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष घनश्‍याम शेलार, उपस्थित होते.

उन्हाळी आवर्तनासाठी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. त्यानंतर पाणी नियोजनासाठी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बैठक होणार असल्याचे सांगितले. त्याच अनुषंगाने ही बैठक पार पडली. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी येत्या सहा तारखेला आवर्तने सोडण्यात येणार असल्याची माहिती दिली.

‘कुकडी’वर अवलंबून असलेल्या सर्वच तालुक्‍यांना समान पाणीवाटप व्हावे, असा रोहित पवार यांचा वारंवार आग्रह होता. घाणीच्या विळख्यात असलेल्या चाऱ्यांची दुरुस्ती करण्यात आली. कुकडी अस्तरीकरणाचा प्रश्नही काही प्रमाणात मार्गी लागला. पाण्याचे समान वाटप व्हावे, म्हणून स्वयंचलित मीटर बसवण्यात आले.

 


इतर ताज्या घडामोडी
वऱ्हाडातील शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे अधिक...अकोला ः खरिपातील पेरण्या अंतिम टप्प्यात पोचल्या...
औरंगाबादमध्ये निम्म्याच शेतकऱ्यांची मका...औरंगाबाद  : जिल्ह्यात आधारभूत किमतीने भरड...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील १२४ मंडळांत...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील...
औरंगाबाद जिल्ह्यात आठवड्यात १५१ खत कृषी...औरंगाबाद : ‘‘कृषी विभाग व जिल्हा परिषद...
दुभत्या जनावरांच्या किमतीतही चाळीस...नगर ः दुधाचे दर कमी-जास्ती झाले की दुभत्या...
रत्नागिरीत नऊ हजार हेक्टरवर फळबाग...रत्नागिरी  ः कोरोनाच्या सावटातही जिल्ह्यात...
हमाल, मापाडी तोलणारांचे प्रश्‍न सोडवा ः...पुणे ः राज्यातील अनेक भागांत हमाल तोलाईदारांना...
खते, बी- बियाणे विक्रेत्यांची दुकाने...कोल्हापूर : निकृष्ट बियाणे प्रकरणी बियाणे...
‘सारथी’ बंद होणार नाही, आठ कोटींचा निधी...मुंबई : राज्य सरकारने मराठी तरुणांच्या व्यावसायिक...
फळपीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी की कंपन्...नगर : नवीन निकषांप्रमाणे फळपीक विमा योजनेचा लाभ...
वऱ्हाडातील अडीच हजारांवर कृषी...अकोला ः कृषी विक्रेत्यांच्या विविध मागण्यांसाठी...
हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत ७१.२० टक्के...हिंगोली : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात बुधवार...
पीकपद्धतीमधील बदल अधिक लाभदायक ः...अकोला ः रासायनिक खतांचा अवाजवी वापर, मशागतीच्या...
सोलापूर जिल्ह्याच्या वाट्याला ५६७ कोटी...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
यवतमाळ जिल्ह्यात कर्जमुक्तीसाठी...यवतमाळ : महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेतील...
सोयाबीनची पेरणी खानदेशात वाढलीजळगाव  ः खानदेशात तेलबियांमध्ये सोयाबीनचे...
सोलापुरात निकृष्ट सोयाबीन...सोलापूर  ः जिल्ह्यात निकृष्ठ सोयाबीनबाबत...
बागलाण तालुक्यात खत पुरवठा करून पिळवणूक...सटाणा, जि. नाशिक : बागलाण तालुक्यात गेल्या...
शेतकऱ्यांच्या प्रश्नी रयत क्रांती...नाशिक : खरिपाच्या तोंडावर सध्या शेती कामांना वेग...
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेला दोन...मुंबई: मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम...