सातारा जिल्ह्यात ५१ टक्के क्षेत्रावर उन्हाळी पेरणी

Summer sowing on 51% area in Satara district
Summer sowing on 51% area in Satara district

सातारा ः जिल्ह्यात उन्हाळी पेरणी अंतिम टप्प्यांत आले आहे. दुष्काळी तालुक्यात पाण्याची उपलब्धता झाल्याने पेरणीचे क्षेत्र वाढले आहे. जिल्ह्यात गुरुवारअखेर तीन हजार ८६४ हेक्‍टर म्हणजेच ५१.९६ टक्के क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. यामध्ये उन्हाळी भुईमूग व मका पिकांची पेरणी झाली आहे. माण तालुक्‍यात सर्वाधिक १३७५ हेक्‍टर क्षेत्रावर उन्हाळी पेरणी झाली असल्याची नोंद झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

कृषी विभागाकडून जिल्ह्यात ७४३६ हेक्‍टर क्षेत्र उन्हाळी पिकांच्या पेरणीसाठी नियोजित करण्यात आले होते. त्यापैकी तीन हजार ८६४ हेक्‍टर म्हणजेच ५१.९६ टक्के क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. यामध्ये उन्हाळी भुईमुगाची १८६३ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे व मक्‍याची २००१ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. 

जिल्ह्यातील माण, खटाव, कोरेगाव, खंडाळा व फलटण या तालुक्‍यांत ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात दमदार पाऊस झाल्याने पाणीटंचाई कमी झाली आहे. तसेच उरमोडी धरणातील पाणी उपलब्ध असल्याने या तालुक्यात उन्हाळी पिके घेतली जात आहे. यामुळे या तालुक्यात पेरणी वाढली आहे. उन्हाळी पिकांबरोबर तरकारी पिके घेण्याकडे येथील शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. पश्चिम भागातील सातारा, कऱ्हाड, पाटण या तालुक्यात उन्हाळी पेरण्याची कामे मोठ्या प्रमाणात उरकली आहेत. 

उसात आंतरपीक म्हणूनही उन्हाळी पिके घेतली जात आहेत. रब्बी हंगामातील पिके काढणी सुरू असून सध्या हरभरा, रब्बी ज्वारीची काढणी सुरू आहे. चाऱ्याच्या दृष्टीने रब्बी ज्वारीच्या कडब्यांना महत्त्व आले आहे. पीक काढण्याअगोदर कडब्याचे आगाऊ उचल दिली जात आहे. या हंगामात कडब्याचे दर तेजीत राहण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com