कारंजालाड, जि.
बातम्या
नांदेड : साडेतेरा हजार हेक्टरवर उन्हाळी पेरणी
नांदेड : जिल्ह्यात २०१९ च्या उन्हाळी हंगामात १३ हजार ९८८ हेक्टरवर पेरणी झाली. ज्वारी, मका तसेच चारा पिकांच्या क्षेत्रात वाढ झाली. भुईमूग, तीळ, सूर्यफूल या गळीत धान्य पिकांचे क्षेत्र कमी झाले, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे यंदाचे पेरणी क्षेत्र कृषी विभागाने नुकतेच अंतिम केले. जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र ६ हजार २४० हेक्टर असून, यंदा १३ हजार ९८८ हेक्टरवर (२२४.१७ टक्के) पेरणी झाली. जिल्ह्यातील मुखेड, देगलूर हे दुष्काळग्रस्त तालुके वगळता अन्य तालुक्यांत उन्हाळी पेरणी क्षेत्रात मोठी वाढ झाली.

इसापूर येथील ऊर्ध्व पैनगंगा धरणाच्या कालव्याच्या आवर्तनामुळे अर्धापूर, मुदखेड, नांदेड या तालुक्यांत लोहा तालुक्यातील गोदावरी नदीकाठचा भाग, कंधार तालुक्यांतील मन्याड नदी काठच्या भागात सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले. त्यामुळे उन्हाळी पेरणी क्षेत्रात वाढ झाली.
दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी अन्नधान्य आणि चारापीक म्हणून ज्वारीला प्राधान्य दिले. मक्याचे क्षेत्र वाढले आहे. एकुण उन्हाळी पेरणी क्षेत्रापैकी अर्ध्याहून अधिक क्षेत्र ज्वारीचे आहे. भुईमूग, तीळ, सूर्यफूल या गळीत धान्य पिकांच्या क्षेत्रात घट झाली. एकूण २ हजार ८५२ हेक्टरवर पेरणी झाली. किनवट तालुक्यात उन्हाळी पिकाचे पेरणी क्षेत्र सर्वाधिक ३ हजार ५७४ हेक्टर आहे. देगलूर तालुक्यात सर्वांत कमी ८० हेक्टर एवढे उन्हाळी पिकांचे क्षेत्र आहे.
पीकनिहाय पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)
पीक | क्षेत्र |
ज्वारी | ७१७९ |
मका | २८५२ |
तांदूळ | २३४ |
भुईमूग | २८८३ |
तीळ | ८०८ |
सूर्यफूल | ३१ |
- 1 of 915
- ››