औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत उन्हाळी सोयाबीन जोमात

औरंगाबाद : औरंगाबाद, जालना व बीड या जिल्ह्यात उन्हाळी सोयाबीन १०३४ हेक्‍टरवर घेण्यात आले आहे. जानेवारीत पेरणी झालेले सोयाबीन काही ठिकाणी, फुलात, कळी लागण्याच्या, शेंगापक्‍वतेच्या अवस्थेत आहे. पीक चांगलेच जोमात आहे.
Summer soybean flourishes in Aurangabad, Jalna, Beed districts
Summer soybean flourishes in Aurangabad, Jalna, Beed districts

औरंगाबाद : औरंगाबाद, जालना व बीड या जिल्ह्यात उन्हाळी सोयाबीन १०३४ हेक्‍टरवर घेण्यात आले आहे. जानेवारीत पेरणी झालेले सोयाबीन काही ठिकाणी, फुलात, कळी लागण्याच्या, शेंगा पक्‍वतेच्या अवस्थेत आहे. पीक चांगलेच जोमात आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्‍यात ५ हेक्‍टर, औरंगाबाद, १०, सिल्लोड १५, गंगापूर १०, कन्नड १०, फुलंब्री ५, पैठण ११ तर वैजापूर तालुक्‍यात १० हेक्‍टरवर उन्हाळी सोयाबीनचा ग्राम बीजोत्पादनाचा कार्यक्रम घेतला. सोयाबीनच्या क्षेत्रातून ३९५ क्‍विंटल उत्पादन अपेक्षित आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल हदगावकर यांनी दिली. 

जालना जिल्ह्यात ८५० हेक्‍टरवर उन्हाळी सोयाबीनचे प्रात्यक्षिके घेण्यात आली. त्यामध्ये जालना तालुक्‍यात ११० हेक्‍टर, बदनापूर ९८ हेक्‍टर, भोकरदन १२५ हेक्‍टर, जाफराबाद ११० हेक्‍टर, अंबड ९५ हेक्‍टर, घनसावंगी ११५ हेक्‍टर, मंठा ७५ हेक्‍टर, तर परतूर तालुक्‍यात १२२ हेक्‍टरवर सोयाबीन आहे.

जोडओळ पद्‌धत व बीबीएफने शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले. हेक्‍टरी ६५ किलो बियाण्यांचा वापर केल्यानंतर २२ क्‍विंटल प्रतिहेक्‍टरी उत्पादन अपेक्षित आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी दिली. 

बीड जिल्ह्यात १०८ हेक्‍टरवर उन्हाळी सोयाबीनचे पीक चांगलेच बहरात आहे, असे प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी डी. जी. मुळे यांनी दिली. 

तीन एकर उन्हाळी सोयाबीनचे क्षेत्र आहे. १८ जानेवारीला ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने १८ इंचावर पेरणी केली. वाद्या बनण्याच्या अवस्थेतील सोयाबीनचे पीक सध्या उत्तम आहे.

- सुरेश काळे, शेतकरी, वडिगोद्री. जि. जालना.

दोन एकरावर उन्हाळी सोयाबीन घेतले. एक एकरावर ९ इंच बाय ३ फुटावर लागवड १८ जानेवारीला केली. त्यासाठी १० किलो बियाणे लागले. दुसऱ्या एक एकरात ३ जानेवारीला बीबीएफने पेरणी करत एकरी १५ किलो बियाणे वापरले. पीक चांगलेच जोमात आहे.  - रणजित भांदरगे, दुधना काळेगाव, जि. जालना.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com